Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

वजन कमी करण्यासाठी काही विचित्र युक्त्या


कमी कष्ट घेऊन आपले वजन कमी झालेले कोणाला आवडणार. कोणते कष्ट घेतल्या शिवाय वजन कमी होणे हे अशक्य असले तरी काही अश्या युक्त्या आहेत विचित्र वाटतील पण त्या तुम्हांला  वजन कमी करायला उत्तेजन देतील.

१. डायनींग रुम मध्ये /जेवायला बसत असलेल्या खोलीत आरसा लावा.

स्वतःला बघत जेवण करणे किंवा खाण्याने आपण किती खात आहोत आपले किती वजन वाढत आहे, याची सतत जाणीव होत राहते. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की आरश्या समोर बसून खाल्याने तुम्ही नेहमी खाता त्यापेक्षा ३३% कमी खाता.

२.खायला घेतलेल्या पदार्थांचे  फोटो काढा. 

हो हे खरं आहे. इतर वेळी आपण पदार्थांचे फोटो काढणाऱ्यांना आपण नावं  ठेवतो,पण याबाबतीमध्ये जर खायला घेण्यापूर्वी फोटो काढल्यास फोटो काढताना आपण विचार करतो की  खरंच  मी हे खाऊ शकते/शकतो का? आणि हे खरंच  खाणे गरजेचे आहे का असा विचार एकदा तरी मनात येतो आणि त्यामुळे कमी खाल्ले जाते. 

३. वेफर्स, चॉकलेट पॅक गोष्टी ताटात /ताटलीत घेवून खा 

वेफर्स, चॉकेलट किंवा चिवडा असे अबर -चबर खाणे हे नेहमी ताटलीत घेऊन खा, त्यामुळे तुम्ही किती खाता हे तुमच्या लक्षात येईल,आणि हे खाणे किती अनावश्यक आहे याची जाणीव तुम्हांला  होईल आणि या गोष्टी खाण्याचे प्रमाण कमी होईल 

४. व्हॅनिलाचा सुगंध 

बहुतांश लोकांना जेवणानंतर काहीतरी गोड  खाण्याची सवय असते किंवा गोड खाण्याची इच्छा होते.अश्यावेळी व्हॅनिला इसेन्स असणारी मेणबत्ती जर लावली तर किंवा अश्या प्रकारचा सुगंध येईल अशी काळजी घेतली तर  गोड खाल्याचा  भास होईल आणि गोड खाल्ले  जाणारा नाही. एका अभ्यासात असे समोर आले आहे की या युक्तीच्या  आधारे  १५० व्यक्तींनी आपले ३ ते ४ किलो वजन कमी केले आहे

५. सफरचंद आणि पेपरमिंट 

तुम्हांला  विश्वास बसणार नाही पण सफरचंद, पेपरमिंट, केळे  अश्या फळ आणि अश्या पदार्थांचा नुसता सुगंध घेऊन आपण तो पदार्थ न खाता तो पदार्थ खाल्याच्या  आभास निर्माण करून देखील काही लोकांनी आपले ५ ते ७ किलो वजन कमी केलं आहे 

६. निळा रंग 

निळ्या रंगाचा वापर तुम्ही आत्ता पर्यंत कोणत्याही प्रकारचे फास्ट फूडची च्या ठिकाणी नुसता निळा रंग वापरल्याचे माहिती आहे का ? तर नाही . कारण संशोधनात असे आढळून आले आहे की  निळा रंग  हा खाण्याची इच्छा कमी करतो किंवा तो पदार्थ कमी आकर्षक बनवतो. आणि या उलट लाल ,नारंगी, पिवळा हे रंग पदार्थ जास्त आकर्षक बनवतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon