Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

झटपट वजन कमी करताय...पण अगोदर त्याचे दुष्परिणाम वाचून घ्या.....


वाढलेलं वजन अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. अनेक प्रयत्न करून देखील काही केल्या वजन कमी होत नाही. बदलेली जीवनशैली, सतत एका जागेवर बैठेकाम यामुळे वजन भराभर वाढते. व्यायाम करणे किंवा योग्य डायट करून देखील वजन कमी होत नाही. झटपट वजन कमी करण्यासाठी अनेक गोळ्या - औषध वापरली जातात. त्यामुळे झटपट वजन कमी देखील होते. गोळ्या - औषधे वापरून वजन कमी केल्यामुळे काही काळात वजन पुन्हा वाढते. पण झटपट वजन कमी करण्यासाठी जे झटपट उपाय केले जातात त्याच्यामुळे उदभवणारे आजार मात्र दीर्घकाळ राहणारे असतात. आज आपण वजन कमी करण्याच्या नादात जे दुष्परिणाम उध्दभवतात ते पाहणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी लागणारी औषधे

झटपट वजन कमी करण्यासाठी ज्या गोळ्या औषधे बनविले जातात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स वापरले जाते. जे आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करतात. त्यामुळे आपल्या शरीरातील चयापचन क्रिया खूप जलद होते. त्यामुळे शरीरातील कॅलरीज खूप वेगाने घटतात.

वेट लॉस्ट बेल्ट चा वापर

वजन कमी करण्यासाठी गोळ्या - औषधासोबतच चरबी कमी करण्यासाठी वेट लॉस्ट बेल्ट देखील वापरला जातो. जो आपल्या पोटाभोवती गुंडाळला जातो. पोटावर गुंडाळल्यानंतर तो बेल्ट पोटावरील भागावरच काम करतो.

म्हणून या बेल्टमुळे पोटाच्या भागातील उष्णता फार वाढते. पोटाजवळील भागातील चयापचन क्रिया एकदम वाढून जाते. सुरुवातीला झटपट वजन कमी होताना होणारा आनंद नंतर उध्दभवणाऱ्या आजारामुळे अधिक वेदनादाई होतो. एकदम वजन कमी करण्याच्या नादात काही आजार पुढील प्रमाणे उदभवू शकतात.

१ ) ऍलर्जी 

चरबी कमी करण्यासाठी ज्या गोळ्या वापरल्या जातात त्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या बरोबरच गोळ्यातील काही घटक शरीरात वेगळे नवीन घटक निर्माण करतात त्यामुळे ऍलर्जी होण्याची देखील दाट शक्यता निर्माण होते. गोळ्या शरीरात असंतुलित घटक निर्माण करतात ते शरीराला सुयोग्य नसतात. तुम्ही जेव्हा एखादी गोळी घेता तेव्हा तुम्हाला त्या गोळीची ऍलर्जी होण्याची दाट शक्यता निर्माण होते. वारंवार पोट खराब होणे, शरीरातील उष्णता वाढणे, अंगाला खाज सुटणे, यासारख्या ऍलर्जी होऊ शकतात. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी जर कोणत्याही प्रकारच्या गोळ्या वापरत असाल तर त्या गोळीपासून कोणतीच ऍलर्जी होणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. नाहीतर आयुष्यभर त्याचे परिणाम शरीरावर पडू शकतात.

२ ) चरबी कमी करणे हृदयासाठी ठरू शकते धोकादायक 

 चरबी कमी करण्यासाठी जर तुम्ही गोळ्या वापरत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. गोळ्या वापरल्यामुळे हृदयविकाराचा त्रास मागे लागू शकतो. चरबी कमी करणाऱ्या गोळ्या शरीरात मोठ्याप्रमाणात उष्णता निर्माण करतात त्यामुळे तुम्हाला ह्र्दयविकाराचा तीव्र झटका देखील येऊ शकतो. या गोळ्यांमध्ये बिटर ऑरेंज हा विघातक पदार्थ असतो जो ह्र्दयविकारास कारणीभूत ठरतो.

3 ) धोकादायक घटक 

चरबी कमी करणाऱ्या उत्पादनामध्ये धोकादायक घटक असतात. चरबी कमी करणाऱ्या गोळ्या ह्या शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करतात. जसे की गोळ्यांमध्ये बिटर ऑरेंज हा विघातक पदार्थ असतो जो ह्र्दयविकारास कारणीभूत ठरतो. चरबी कमी करणाऱ्या गोळ्यामुळे रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. याबरोबरच सतत शिंका येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

४ ) निद्रानाश 

 निद्रानाश म्हणजे नैसर्गिक दैनंदिन जीवनचक्रामध्ये वेळेवर झोपे न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, झोपेची वेळ पूर्ण झाली तरी सुद्धा झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणे. चरबी कमी करण्यासाठी ज्या गोळ्या वापरल्या जातात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असते ज्यामुळे शरीराचे चयापचन बदलते. जर आपल्याला रोज गोळी घेण्याची सवय लागली तर नंतर गोळी न घेता झोप लागत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणत निद्रानाश होऊ शकतो. आपल्या आयुष्यात झोपेला खूप महत्व आहे जर झोप पूर्ण झाली नाही तर आपला मेंदू उत्तमरीत्या काम करत नाही.

५ ) वागण्यातील बदल 

 चरबी कमी करण्याच्या गोळ्या खात असल्यामुळे अनेकवेळा आपल्या स्वभावात बदल होतात. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या गोळ्या खात असतो तेव्हा आपल्या शारीरिक व मानसिक अवस्थेत मोठे बदल होत असतात. काही गोळ्यामुळे स्वभाव चीडचीडा होतो. निद्रानाशामुळे थकवा जाणवतो, मूड बदलत राहतात, रक्तदाब वाढतो, मनावर एक प्रकारचे दडपण येते. यासारखे अनेक बदल चरबी कमी करणाऱ्या गोळ्यामुळे दिसून येतात.

६ ) अतिरिक्त चरबी कमी करण्यामुळे नवीन समस्यांना आमंत्रण  

जर चरबी कमी करण्याचा अधिक अट्टहास केला तर मानसिक संतुलन देखील बिघडू शकते.

गोळ्यांच्या अतिरिक्त डोसमुळे मानसिक व शारीरिक अवस्थेमध्ये मोठे बदल होऊ शकतात. विविध औषधामध्ये अनेक हानिकारक रसायने व पदार्थ असतात. जे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतात. काही लोकांना तर गोळ्यांची इतकी सवय होते की जर एक दिवस जरी गोळी घेतली नाहीतर त्यांना अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे झटपट वजन कमी करण्याच्या नादात आपल्या आरोग्यास काही धोका तर नाहीना यांचा विचार करावा.

उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे आजार असलेल्यांनी कोणतीही औषधे स्वतच्या मनाने घेऊ नयेत. या आजारांसाठी सुरू असलेल्या औषधांसोबत नेमक्या कोणते औषधे योग्य ठरतील, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon