Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

ह्या हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी ह्या गोष्टी करा !!!

तुमचा आवडता ऋतू कुठला असे विचारताच बहुतेकांचे उत्तर 'हिवाळा' असेच येते कारण या दिवसांत पावसाळ्यासारखा गुलाबी गारवा असतो पण चिखल आणि चिकचिक नसते,सूर्यदर्शन होते पण उन्हाळ्या सारखे ऊन हैराण करत नाही,हो ना? या ऋतूमध्ये सर्वांनाच हवेत गारठा असतांना ऊबदार पांघरुणात लपेटून घरातच रहावेसे वाटते.हे वाचून तुम्हाला वाटेल असे सुस्त राहिल्यामुळे व्यायाम कमी,वजन घटने कमी आणि शेवटी अर्थातच वजन वाढणे असा प्रकार होत असेल पण खरे तर असे अजिबात नाही.

वाढलेले वजन घटवण्यासाठी हिवाळा हा अगदी योग्य ऋतू आहे असे आम्ही का सांगत आहोत हे जाणून घेण्याआधी या दिवसांत आपल्या शरीरातील मेद कसे कार्य करते हे पाहूया. आपल्या शरीरात 'पांढरे मेद' आणि 'तपकिरी मेद' असे दोन प्रकारचे मेद असतात. यांपैकी तपकिरी मेद हे जन्मापासून आपल्या शरीरात असते जे थंड किंवा कमी तापमानात शरीराला उष्ण ठेवण्याचे कार्य करते आणि हानिकारक नसते.तसेच वजन वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पांढऱ्या मेदाला प्रतिरोध करते.

हिवाळ्यातील बोचऱ्या थंडीपासून शरीराचे संरक्षण करणे आवश्यक असते आणि शरीराला उष्ण ठेवण्यासाठी जास्तीच्या मेदाचे ज्वलन होत असते. म्हणजेच,तुमचे शरीर नैसर्गिकपणे मेदाचे ज्वलन, पावसाळा किंवा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त प्रमाणात करते. माष्टरीच विद्यापीठाकडून केलेल्या एका अभ्यासानुसार,सौम्य थंड वातावरणात असतांना शरीरातील मेदाचे ज्वलन ३ ते ३०% पर्यंत अधिक होते.

आपल्यापैकी काही लोकांना हा ऋतू आवडत नसेल कारण गारठून टाकणाऱ्या थंडीमध्ये नाईलाजाने एकाच जागी गुरफटून "काही लोकांना ही थंडी का आवडत असावी,असा विचार करत बसावे लागते. आता हे वाचा-एका तासाच्या हलक्या व्यायामाने जेवढी चरबी कमी होईल तेवढीच शरीर थरथरवणाऱ्या थंडीत १५ मिनिटे राहिलात तर होऊ शकते! तुमचा विश्वास बसत नाहीये ना,पण हे खरे आहे...

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि याची सुरुवात उन्हाळ्यात करण्याचा विचार करत असाल (कारण,उन्हाळ्यात अधिक घाम येत असल्यानेहि शरीरातील मेद कमी होते ) तर पुन्हा विचार करा,याच हिवाळ्यात व्यायामाला सुरुवात करा आणि कमी घाम गाळून अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा बांधा मिळावा!!

आता आम्ही तुम्हाला सांगतोय कि या ऋतू मध्ये थकवणारे व्यायाम न करताही तुम्ही वजन घटवू शकाल पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही.गरमागरम भजी आणि जिलेबी थंडीत खाण्याची मजा काही औरच असते पण तुमच्या जिभेला थोडासा आवर घाला.सोबतच सकाळी लवकर उठून चालायला जा (सुरुवातीचे काही दिवस हे कठीण कर्म वाटेल पण थोड्या दिवसांनंतर सकारात्मक परिणाम पाहून तुम्हाला हायसे वाटेल. ) फक्त कल्पना करा,जर केवळ गारव्यात राहण्याने खूप कॅलरीज खर्च होत असतील तर व्यायामाने तुमच्या शरीराला कित्ती सकारात्मक आणि आश्चर्यकारक फायदे होतील.!!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon