Link copied!
Sign in / Sign up
59
Shares

वैवाहिक जीवनात समागमात येणारे अडथळे

 

आपले जेव्हा लग्न होते त्यानंतर काम, कामाच्या ठिकाणचे ताण, मुले आणि इतर अनेक गोष्टींमुळे मनाप्रमाणे गोष्टी घडतातच असे नाही. जगात अशी एकही जोडी नाही ज्यांना लग्नानंतरच्या आयुष्यात ह्या आव्हानांना सामोरे जावे लागले नाही. लग्नानंतर तुम्ही दोन्ही एकमेकांच्या किती जवळ आहात. आणि फक्त लैंगिक जवळीक नसते तर ती भावनिकही असते. आणि जर असे दोन्ही भावनांचे नाते तुमच्यात तयार झालेच नाही तर लग्न फक्त एक कायदेशीर करार होऊन जाईल.

१) लग्न झाल्यावर घराची जबाबदारी आल्यावर दोन्ही त्यात व्यस्त होऊन जातात. वेळ देणे दोघांना जमत नाही. आणि जरी वेळ असला तरी आपल्या जोडीदाराच्या जवळ जाण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर राहण्यासाठी  मुश्किल होते. थोडासा वेळ स्वतःसाठी मिळाला तरीही तेव्हा त्या काळात जवळीक साधण्याऐवजी आरामालाच पसंती दिली जाते.

२) ज्या व्यक्तीबरोबर उर्वरित आयुष्य घालवणार आहात तो कदाचित पहिल्यांदा एकत्र आलात होतात तेवढा तो आकर्षक वाटत नाही. एकमेकांबरोबर असताना काही वेगळे औत्सुक्य न वाटणे ही भावना फार काही वेगळी नाही. आकर्षण असणे किंवा एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्यासाठी स्वतःकडूनही काही प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या जोडीदारासाठी म्हणून छान कपडे करा, तयार व्हा, त्याच्याबरोबर उगाच बाहेर जा आणि एकत्र थोडा का होईना पण उत्तम वेळ घालवा.

यात खूप महत्त्वाची गोष्ट ही की आपल्या जोडीदाराकडे आकर्षित होत नसाल याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही असा नक्कीच होत नाही.

३) लग्न ही विश्वास आणि निष्ठा ह्या दोन गोष्टीवर उभी असणारी संस्था आहे. केवळ शारिरीक विश्वासघात नाही नव्हे तर भावनिक विश्वासघात ह्या गोष्टीही फार महत्त्वाच्या असतात. आपला जोडीदार कदाचित अप्रामाणिक आहे असे वाटत असेल तर त्याच्याशी संवाद साधा. आपल्याच मनात कटुता ठेवली किंवा मनातच खाल्ले तर मात्र गोष्टी अधिकच वाईट स्वरुप घेतील.

४) पुर्वीचा उत्साह आणि ताजेपणा आता राहिला नसेल. कदाचित आता जोडीदाराकडून फुले, भेटवस्तू किंवा कौतुक कशाचाच वर्षाव होत नसेल. कदाचित कोणत्याही बहाण्याशिवाय किंवा दिखाव्याशिवायही आपण एकमेकांना चांगले ओळखायला लागलो असू. पण प्रेमालाप किंवा कामक्रीडेचा अभावापायी अरसिकता किंवा उदासीनता निर्माण करेल आणि तीच पुढच्या क्रियांना झाकोळून टाकेल.

५) एकदा मुले झाल्यानंतर स्त्रियांना आपल्या जोडीदाराबरोबर नवऱ्याबरोबर घालवण्यासाठी कमीत कमी वेळ मिळत असल्याचे लक्षात येते. कारण मुलांची काळजी घेण्यातच खूप वेळ आणि उर्जा खर्च होते आणि झोपेची वेळ होते तोपर्यंत स्त्रिया खूप जास्त दमतात किंवा थकून जातात.

६) आठवड्यातून एक दिवस रात्र ठरवून नियोजन करुन सुट्टी घ्या त्या नियोजनामध्ये कोणत्याही गोष्टीने खंड पडणार नाही किंवा ते रद्द होणार नाही याची काळजी घ्या. ज्या दिवशी सुट्टी घ्यायची असेल बाळाला सांभाळायला एखादी व्यक्ती नेमा किंवा बाळाला त्याच्या आजीआजोबांकडे ठेवा.

७) सुसंवादाचा अभाव आणि गैरसमज या दोन्ही गोष्टी उभयतांमध्ये दरी निर्माण करण्यास कारणीभूत होतात. आपल्या इच्छा आणि कल्पना बोलून दाखवा. ज्या कोणत्या गोष्टींची चिंता वाटते किंवा भीती वाटते त्या सर्व आपल्या नवऱ्याशी मनमोकळेपणे बोला. नवरा एक समजूतदार व्यक्ती असू शकतो मात्र आपल्या मनातील लहान सहान गोष्ट समजण्यासाठी मात्र त्यांच्याकडे अलौकिक

८) टीव्ही किंवा चित्रपटांमध्ये पाहतो अगदी तस्सेच आकर्षण किंवा प्रेमळ क्षण अनुभवले नसतील. वास्तव आयुष्यातील लैंगिक संबंध असुखावह, अस्वस्थता आणणारे, अस्तावस्त असा असेल. मात्र यामुळे प्रयत्न करण्यापासून परावृत्त होऊ नका. आपल्या जोडीदाराच्या या संदर्भातील आवडी निवडी समजून घेण्यास कदाचित वेळ लागेल आणि एकदा या गोष्टी कळल्या की अस्वस्थता न येता लैंगिक संबंध आनंदी आणि सुखकर होतील.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon