Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

वैवाहिक जीवनातील समस्या कश्या सोडवाल ?

 

ज्यावेळी        तुम्ही वैवाहिक आयुष्य सुरु करता त्यावेळी अनेक समस्या येण्याची शक्यता असते. तुमचा विवाह हा ठरवून केला असेल किंवा प्रेम विवाह असेल तरी वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या येतात. याला कारण वेगवेगळ्या भावना ,वेगवेगळ्या विचारसरणी किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, कुटूंबातील एखादी व्यक्ती असे काहीही कारण असू शकते.पण या समस्या आल्यावर या मुळे नात्यावर परिणाम होऊ ना देता या सोडवायच्या कश्या यावर भर देणे आवश्यक असते. 

१. समस्येबद्दल एकमेकांशी बोला. 

एकेमकांशी समस्येबद्दल बोला, त्या समस्ये विषयी बोलणे टाळू नका राग मनात धरून बोलणे टाळले तर समस्या सुटणार तर नाही अजून वाढत जाईल. आपली मते मांडा पण लादू नका. वैवाहिक नात्यामध्ये मान -अपमान ठेऊ नका मी का आधी बोलू त्याने / तिने बोलायाला हवे असे करू नका अश्याने समस्या अजून वाढत जाईल आणि जोडीदार बोलत असेल तर त्याचे बोलणेऍड मध्ये थांबवू नका. यामुळे समस्येवर तोडगा निघण्यास मदत होईल. 

२. ठरलेल्या गोष्टी अमलात आणा.

समस्येबाबत नुसते बोलून किंवा त्याच्यावर चर्चा करून समस्या सुटत नाहीत, त्यामुळे या चर्चामधून समस्या सोडवण्यासाठी मार्ग काढला असेल तर त्यावर कमी करणे, किंवा त्याबाबत ठरल्याप्रमाणे करणे. त्या गोष्टी अमलात आणणे तेव्हढेच  आवश्यक असते. 

३. दोघांनी मिळून समस्या सोडावा. 

समस्या सोडवताना एक व्यक्तीनेच आपले मत मांडणे, किंवा मी म्हणतोय तसेच व्हायला हवे असा हट्ट धरणे समस्या सुटण्यापेक्षा वाढवेल त्यामुळे समस्या सोडवताना दोघांच्या मतांचा विचार करणे आवश्यक असते.

४. एकमेकांचे ऐकून घ्या.

नात्यातील समस्या सोडवताना जोडीदार काय म्हणतो, किंवा तो देत असलेले  स्पष्टीकरण ऐकून घ्या. त्यावर विचार करा. एकमेकांचे म्हणे ऐकून घ्या. 

५. एकमेकांकडे आणि समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

सुरवातीला छोटी असणारी समस्या जर वेळीच सोडवली नाही तर ती गंभीर स्वरूप धारण करते आणि त्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो त्यामुळे सुरवातीला छोट्या असणाऱ्या समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याआधी सोडावा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon