Link copied!
Sign in / Sign up
34
Shares

वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी या सामान्य गोष्टी आवश्यक असतात

ठरवून समागम करता येत नाही. त्यासाठी तसे वातावरण आणि दोघांच्या मनाची आणि शाररिक तयारी असायला लागते. दोघांना समागमाचा आनंद घेता यावा यासाठी काही सामान्य गोष्टी आवश्यक असतात. या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. एकांत

समागमासाठी स्त्री-पुरुषाला एकांताची नितांत गरज असते. सध्याची कुटूंब पद्धतीत घरात फारशी माणसे नसतात असल्याने बऱ्यापैकी एकांत मिळतो. परंतु फोन लॅपटॉप हे आजकाल दोघांना एकांत मिळू देत नाही त्यामुळे याबाबतीत दोघांनी रात्री झोपायच्या आधी काही वेळ एकमेकांसाठी राखून ठेवावा. या वेळात कदाचित कामेच्छा निर्माण होण्याची शक्यता असते.

२. एकमेकांच्या आवडी जाणून घ्या.

समागमाच्या बाबतीत प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या काही कल्पना असतात. त्या एकमेकांनी जाणून घेऊन काही अंशी तरी पूर्ण करायचा प्रयत्न करावा.

३. दोघांचा मूड

स्त्री पेक्षा पुरुषाची कामेच्छा अधिक असते त्यामुळे पुरुष याबाबतीत अधिक आतुर आणि तयार असतात मात्र स्त्री नेहमी स्त्रियांना मूडमध्ये यायला वेळ लागतो त्यामुळे दोघांचा मूड बघून या गोष्टींची तयारी करावी.

४.चिंता बेडरूम बाहेर ठेवाव्या

बेडरूममध्ये येतांना सर्व चिंता-विवंचना-समस्या दाराबाहेरच सोडून येण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मनात अनेक किंतु शंका आणि चिंता असताना समागमाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाजूला सारूनसमागमाचा आनंद घ्यावा

५. स्वच्छता

सेक्स करण्यापूर्वी स्त्री-पुरुषांनी स्नान करणे आवश्यक असते. काखा आणि जांघेतील केस आवर्जुन काढलेले असावेत. त्यामुळे लैंगिक स्पर्शसुख छानपैकी अनुभवास मिळते.

६. वातावरण निर्मिती

बेडरूममधील वातावरण प्रसन्न असावे. रूमफ्रेशनरचा वापर करावा.मंद प्रकाशाचा नाईट लॅम्प लावावा. बेड व्यतिरिक्त इतर ठिकाणी समागम करणे टाळावे

७. समागमाचा उत्कटबिंदू पर्यंत सावकाश जा.

पुरुषांना थेट संभोग हवा असतो, तर याउलट स्त्रीचे उत्तजेन बिंदू सर्वांगीण पसरलेले असल्याने तिला कामपूर्वक्रीडा, प्रणयक्रीडा हव्याशा वाटतात. आणि समागमाच्या उत्कट बिंदू पर्यंत सावकाश गेलेलं तिला आवडते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon