Link copied!
Sign in / Sign up
47
Shares

लैंगिक जीवन अधिक सुखी करण्याचे मार्ग . . .


  लैंगिक सुख घेणे म्हणजे आपण काही पाप करतो का ? पुरुष इंद्रिय व योनीमार्ग ह्यांचे मिलन झाले म्हणजे प्रेम हे समाप्त झाले काय? कोणत्या प्रकाराने तुम्हाला आनंद मिळतो हे सांगण्याची तुम्हाला भीती वाटते का ? ही प्रश्न पडणे म्हणजे वाईट नव्हे. आपल्याकडे याविषयी सार्वजनिकपणे बोलले जात नाही. पण मनातल्या आत ह्या सर्व गोष्टी दाबून ठेवल्या जातात आणि त्यामुळे वैवाहिक जीवन दुःखद व कटकटीपूर्ण व्हायला लागते. त्यामुळे ह्या गोष्टी मनमोकळ्या बोलून, संवाद करून त्या अस्वस्थपणातून बाहेर पडा. व वैवाहिक जीवन सुखकर बनवा.

१) समागमाचे (सेक्स) पूर्णपणे सुख मिळवण्यासाठी तुमच्या लैंगिक वृत्तीच्या ज्या काही नकारात्मक बाजू असतील त्या मनातून अगोदर काढून टाका. तुम्हाला जे करायचे आहे ते सोपे व चांगले व आनंदपूर्ण असायला हवे, ते दुःखद व भावनांचा छळ करणारे नसायला  पाहिजे. तुमच्या जोडीदाराला जे आवडत नसेल त्यासाठी दबाव टाकून तसे करायला भाग पाडू नका. एका व्यक्तीला आवडेल ते दुसऱ्याला आवडेल असे नाही होत. तुम्ही समजून घेऊन सहनशील व्हा, विचारी व कोमल व्हा. हळूहळू जोडीदारही साथ देईल.

२) आपण विचारी माणसे आहोत हे बऱ्याचदा विसरून जातो आणि एकदम पशूसारखा लैंगिक व्यवहार करू लागतो. तसे काहीही करू नका. वासना व लैंगिक सुख यात खूप फरक आहे त्याबद्धल जोडीदाराला त्रासदायक वाटेल असे करू नका. त्यामुळे जोडीदाराच्या मनावर कायमचा परिणाम होऊ शकतो.

३) स्त्रीच्या बाबतीत सर्व योनीमार्गाचा क्षेत्र, योनिलिंग, ह्याला फार महत्व असते. त्यामुळे योनिलिंग हळुवारपणे हाताळा. योनिलिंग खूप उत्तेजित करू नका तिला त्यामुळे त्रास होतो. व ती यातून नंतर सुख घेतही नाही व देतही नाही.

४) स्त्रीचा उत्कट बिंदू येईपर्यंत पुरुषाने संभोग लांबणीवर टाकावा. स्वतः संभोग लांबवून पत्नीला अनेकदा सुखद बिंदूकडे आणून सुख देता येते व घेताही येते. पण जर पुरुषाचा उत्कट बिंदू प्रथम आला तरी पुरुषाने संभोग लांबवावा.

५) जोडीदार एकमेकांना उत्तेजित करून मग संभोग लुटल्याने त्यांना खूप आनंद वाटत असतो. आणि लैंगिक सुख मनासारखे घ्या त्याला शरीरासारखे घेऊ नका. त्याने अनेक गोष्टी साध्य करता येऊन वैवाहिक जीवन सुखकर होते. आणि जीवनात आनंदाचे तरंग उठतात आणि मनाला स्पर्श करून जीवन सुखकर होते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon