Link copied!
Sign in / Sign up
28
Shares

होणाऱ्या आईने होणाऱ्या बाबांना या गोष्टी नक्की समजून सांगा


बदलत्या काळात पुरुषांनीही प्रत्येक गोष्टीसाठी तयार असले पाहिजे अशीच अपेक्षा असते. मात्र आपली पत्नी गर्भवती असताना काय करणे अपेक्षित असते याचे काही प्रशिक्षण त्यांना मिळत नाही. त्याचबरोबर गर्भारपणात स्त्रीचे भावनिक होणे तिच्यासाठी सर्वसाधारण गोष्ट असेल पण पुरुषांचे भावनिक होणे काही सहजपणे स्वीकारले जात नाही. या सर्व दबावानंतरही पुरुष सर्व गोष्टी कशा हाताळतात आणि एवढा छान पिता कसा होऊ शकतो याचे आश्चर्य नक्कीच वाटू शकते.

 

गर्भारपणासंबंधी कोणत्या गोष्टी ज्यांच्याविषयी पुरुषांना जाणून घ्यायची इच्छा असते पाहूया

 

* प्रेम करणे थांबवू नका 

लग्नानंतरचे काही आठवडे किंवा महिने अगदी प्रेमातूर आणि आनंदी असतात. त्या काळात सातत्याने एकमेकांच्या साथीने बाहेर फिरणे, नवनवीन पदार्थ करुन पाहणे आणि सतत एकमेकांना गूज सांगितले जाते. पत्नी गर्भवती राहिल्यानंतर मात्र लग्नामधील प्रेममयी काळ कमी होतो ही काही असामान्य गोष्ट नाही. मग कारणेही अनेक मिळतात जसे खूप दमलोय, आत्ता इच्छा नाही अशी काहीशी. मात्र गर्भारपणातच जोडपे म्हणून भरपूर वेळ एकमेकांबरोबर घालवला पाहिजेच हेच आपल्याला माहित नाही. एकदा बाळाचे आगमन झाले की जोडप्यांना त्यांचा असा वेळ आणि भरपूर मोकळा वेळ मिळतच नाही. अर्थात पत्नीला काय खावे काय खाऊ नये यावर काही मर्यादा निश्चितच येतात पण याचा अर्थ जोडीने बाहेर जाऊच नये असे नाही. हॉटेल मध्ये जाऊन थोडा आरोग्यकारी आहार घेऊ शकता आणि एकमेकांची साथीने मज्जा करु शकता.

 

* पत्नीलाही असते चिंता

       बहुतेकदा बाबा लोक पत्नी गर्भवती राहिली की चिंताग्रस्त होतात. त्यांना काय अपेक्षित आहे हेच कळत नाही आणि त्यांना जसा पिता व्हायचे आहे तसा ते होऊ शकतील का हे देखील माहित नसते. त्यांना वाटते की पत्नीला आई होणार म्हणून सर्वच गोष्टी माहिती आहेत आणि त्यामुळे बाबा म्हणून तयार होण्यासाठी त्यांच्यावर दबाव असल्याची जाणीव त्यांना होते. पण अगदी खूप नसली तरीही त्यांच्या बायकोला त्यांच्या इतकीच काळजी वाटते हे बाबा लोक समजून का घेत नाही. थोडक्यात पालक म्हणून भेडसावणाऱ्या या चिंतेला एकेकटे सामोरे जाण्यापेक्षा जोडीने सामोरे जा.

* पतीच्या जागी लागतील उशा

आता पत्नी झोपताना जवळ घेईल किंवा प्रेमाने कुरवाळेल अशी अपेक्षा तिच्याकडून करु नका. पत्नी झोपायला जाईल तेव्हा ती तिच्याभोवती उशा, लोड यांची भिंतच करले. कदाचित गादीवर पतीला झोपायला जागाही मिळणार नाही. त्यामुळे पतीला एकतर आरामशीर सोफ्यावर स्वतःला झोकून द्यावे लागेल किंवा स्लिपिंग बॅगचा वापर करावा लागेल.

* पत्नीच्या मनोवस्था ओळखायला शिका

गर्भवती असणाऱ्या प्रत्येक स्त्रीची मानसिक आणि शारिरीक ओढाताण होतच असते त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नसते. मात्र होणाऱ्या आईला कोणत्याही मदतीची आवश्यकता असली तरीही स्पष्टपणे सांगण्याची त्यांची वृत्ती नसते ही एक गोष्ट बहुतांश पुरुषांना माहित नसते किंवा त्यांना ती जाणवत नाही. पत्नी कदाचित नाराज असेल पण तसे ती सांगणार नाही पण तिच्या कपाळाला किंवा पाठीला मालिश करून आपण (पती) करु शकतो त्यामुळे तिला आराम मिळेल. अर्थात मालिश करताना आपला फोन जरा बाजूला ठेवून द्या आणि तिच्याकडेच पूर्ण लक्ष द्या. कदाचित आपण पत्नीकडे किंवा तिच्याकडे संपूर्ण लक्ष देत आहोत हे तिला कळल्यानंतर चांगला सुसंवाद साधण्याचा प्रयत्न पत्नीकडून होऊ शकतो आणि अगदी मालिश करून देण्यासारखी लहान गोष्टींतूनही आपण पत्नीची काळजी घेतो आहोत हे तिला समजून येते.

* आपल्या भावना बोलून दाखवा 

आपण जर नाराज असू, घाबरलेले असू किंवा qचता वाटत असेल तर जोडीदाराशी म्हणजे पत्नीशी मोकळेपणी संवाद साधा. आणि तिलाही काय वाटते ते स्पष्टपणे बोलायला सांगा. काही वेळा आपल्याला काय वाटते आहे ते पत्नीलाही सांगायची इच्छा नसेल असेही होऊ शकते मात्र आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट जरूर सांगा. उदा. समजा आपले बाळ आजारी पडल्यावर काय करायला हवे हे आपल्याला माहित नाही याविषयी भीती वाटत असेल तर त्याविषयी योग्य वाटत असेल तर आपल्याच आईशी याविषयी संवाद साधा. वास्तविक आपल्याला भेडसावणाऱ्या गोष्टी कधीही मोकळेपणाने बोलण्यासाठी पत्नी ही अगदी योग्य व्यक्ती आहे पण काही गोष्टींमध्ये सल्ला हवा असे वाटत असल्यास एखाद्या अनुभवी व्यक्तीला याविषयी विचारणा केल्यास बरे वाटेल.

* बाबा होण्यास तयार झालात 

आपण काहीही विचार केला तरीही वडील होण्यासाठी आपण अगदी तयार आहात. आपल्याला कल्पना नसेल याची कदाचित किंवा आपण अजून स्वीकारले नाहीये. पण बाबा होण्यासाठी तयार आहात. कदाचित तुम्हाला स्वतःवरच शंका येईल काही वेळा एकदम चिडाल पण शेवटी सर्व गोष्टी नीट होणार आहेत. जर कधी टाईम मशीन तयार झाले तर आपण योग्य तèहेनेचे गोष्टी करत असल्याचे सांगून ते मशीन आपल्याला आश्वस्त करेल.

 

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon