Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

लहान बाळे का का हसतात ? जाणून घ्या त्यांच्या वाढीच्या टप्प्यानुसार

एक बाळ कसे आणि का स्मित करते?/ किंवा हसते ? हा एक अत्यंत मनोरंजक विषय आहे, दोन्ही दृष्टीने अभ्यासाच्या आणि कुतुहूल म्हणून देखील. संशोधनातून असे दिसून आले आहे की बाळाचे सहा महिन्यांनंतर, हसणे हे सामाजिक म्हणजे प्रतिक्रियात्मक किंवा भावनात्मक म्हणजे भावना दर्शवणारे असू शकते. बाळाच्या वाढीनुसार त्याच्या हसण्यामागे काय अर्थ असू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत.

१. शाररीक प्रक्रिया (० ते ६ आठवडे )

नवजात बाळ ज्यावेळी हसते, ते हसणे म्हणजे शाररिक क्रियेला प्रतिक्रिया देणे होय.बाळाचे शरीर शारीरिक बदल घडत असते. ज्यामुळे बाळ काही प्रतिक्रिया देत असते, जसे की हसणे या टप्प्यात, हास्य केवळ शारीरिक प्रतिक्रिया असते. त्यास कोणतीही भावना जोडलेली नसते.

२. प्रतिक्रियात्मक हसू  ६ ते ८ आठवडे 

बाळाची वाढ होत असताना, गोष्टीं बाळाला आनंददायक वाटतात त्या गोष्टींना बाळ हसून प्रक्रिया देण्यास सुरुवात होते - जसे आवाज, चेहरे, चुंबने, इत्यादी. या टप्प्यामध्येही  हास्य एक संवेदनेचा प्रतिसाद असते, सामाजिक हसू नसते. म्हणून, बाळाकडून जास्त अपेक्षा करू नका. बाळाला आवाज,चेहरे जाणून घेण्याची संधी द्या. आणि त्यांना त्यांना प्रतिसाद द्यायला शिकु द्या.

३. संदर्भ लावायला शिकू लागते. २ - ३ महिने

या टप्प्यापर्यंत आपल्या प्रतिक्रियांमुळे बाळाच्या चेहऱ्यावरील हास्य हळूहळू वाढते. या टप्प्यावर, बाळांना गोष्टीचा संदर्भ लावायला शिकु लागते . ते आपल्याला पाहतील तेव्हा ते हसतील आणि आवाज किंवा हातवारे करुन प्रतिक्रिया व्यक्त करतील. ते हसून त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयन्त करतील.

४. ओळखचे हास्य -सुमारे 9 महिने

या वयात, बाळाला कळते की तुम्ही दररोज पाहत असलेल्या चेहरा आणि नवीन यातला फरक जाणवू लागतो तुम्हांला हळू-हळू ओळखू लागते. तर दुसरीकडे, यामुळे बाळाच्या अनोळखी व्यक्तींना पाहिल्यावर अस्वस्थ होते.म्हणजे ते ओळखीच्या चेहऱ्याकडे बघून आनंदी होते आणि हसते.

५. विनोदी हास्य / भावनात्मक हास्य -सुमारे १२ महिने 

१ वर्षाचे होईपर्यंत, ज्याप्रमाणे बाळाला भाषा कौशल्य विकसित होण्यास सुरुवात होते त्याप्रमाणे, विनोदाची भावना देखील बाळामध्ये निर्माण होते . जेव्हा आपण विचित्र चेहरे आणि आवाज तयार करता तेव्हा ते खूप हसतात. जेव्हा बाळाला काहीतरी विनोदी वाटेल आणि ते हसते तेव्हा त्यांना तुम्ही पण हसावे असे वाटत असते. म्हणून त्यांच्यासोबत हसा. या काळात बाळ प्रतिक्रि द्यायला शिकलेले असते. त्यामुळे त्याला हसण्याची आणि बहुतांशी सर्वसामान्य भावनांची जाणीव व्हायला लागलेली असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon