Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

व्हॅक्युम पंपाच्या सहाय्याने डिलिव्हरी बाबत तुम्हांला माहिती आहे का ?


व्हॅक्युम पंपाच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या प्रसुतीला व्हॅक्युम एक्स्ट्राक्शन किंवा व्हेन्टॉउस असेही म्हणतात. या प्रक्रियेत बाळाच्या प्रसुतीसाठी एक व्हॅक्युम यंत्र वापरले जाते. त्याला व्हॅक्युम एक्स्ट्राक्टर म्हणतात. हा धातूचा किंवा प्लास्टिकचा एक मऊ कपाच्या आकाराचा असतो निर्वात पोकळीमुळे तो बाळाच्या डोक्याला चिकटतो. योग्य प्रकारे व्हेन्टाऊसचा वापर केला तर फोरसेप्स वापरून केली जाणारी प्रसुती किंवा सी सेक्शन म्हणजे सिझेरियन पेक्षा नक्कीच चांगला पर्याय असतो कारण त्यात कमी धोका असतो.

व्हॅक्युम यंत्राच्या मदतीने प्रसुती कधी केली जाते?

१. सर्वसाधारणपणे प्रसुतीकळांच्या दुसरा टप्प्यात जास्त वेळ लागला आणि गर्भाशय पिशवीतील पाणी संपले असेल आणि तरीही बाळ बाहेर येत नसेल.

२. खूप तास कळा देऊन बाळ योनीमार्गात खाली सरकत नसेल तर

३. आईचा शक्तीपात- खूप वेळ कळा देऊन आई थकून गेली असेल तर.

४. एखाद्या वैद्यकीय समस्येमुळे (हृदयाचे आजार, काचqबदू, धमनीचा आजार) कळा आल्यावर जोर लावणे धोकादायक असेल तर

५. बाहेर येताना बाळ थकल्याच्या खुणा दिसत असतील तर बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांची गती बदलते

कशी होते प्रसुती

वेदना बंद करण्यासाठी एपिड्युरल किंवा भुलीचे औषध किंवा योनीमार्गाला बधीरत्व देणारे औषध लावले जाते. त्यानंतर बाळाच्या डोक्यावर प्लास्टीक सक्शन कप ठेवला जातो हा कप बाळाच्या डोक्यावरची त्वचा खेचून त्या कपात खेचून घेतो. व्हॅक्युम एक्स्ट्राक्शन यशस्वी होण्यासाठी हा कप बरोबर डोक्याच्या वक्रभागी चिकटला पाहिजे. त्यानंतर आकुंचनातून ढकलल्याने बाळ हळुवारपणे बाहेर खेचले जाते. बाळाचे डोके एकदा बाहेर आले की आईला आणखी जोर लावायला सांगून संक्शनच्या मदतीशिवाय बाळ बाहेर ढकलायला सांगितले जाते.

व्हॅक्युम एक्स्ट्राक्शन निरुपयोगी ठरले किंवा अयशस्वी ठरले तर फोर्सेप्स लावून किंवा सी सेक्शन म्हणजेच सिझेरियन करून प्रसुती केली जाते.

व्हॅक्युम एक्स्ट्राक्शनचे फायदे

१. (योनीमार्ग विस्तारित करण्यासाठी योनीमार्ग आणि गुदद्वाराजवळचा भागाला काट दिला जातो त्याला एपिसिओटोमी म्हणतात. ) व्हॅक्युम एक्स्ट्राक्शनमुळे कदाचित एपिसिओटोमीची गरज भासणार नाही.

२. फोर्सेपचा वापर करून प्रसुती केली जाते त्यापेक्षा व्हॅक्युम एक्स्ट्राक्शनमध्ये कमी जोर लावला जातो. त्यामुळे बाळाच्या डोक्यावर व्रण पडण्याचे अगदीच कमी शक्यता असते.

३. बाळाच्या जन्मादरम्यान आई सक्रीय सहभागी होऊ शकते आणि सी सेक्शन प्रसुतीमध्ये ज्या प्रमाणे ती भुलीच्या अमलाखाली राहते तशी राहात नाही.

धोके काय आणि कोणते ?

व्हॅक्युमच्या मदतीने केलेली प्रसुती योनीमार्ग किंवा बाह्य जननेद्रियांना इजा करू शकते, ते अवयव फाटू शकतात.

२. बाळाच्या डोक्याला इजा होऊन तिथे रक्तस्राव होण्याची शक्यता असते पण थोडा वेळाने ते बंद होते आणि त्यामुळे कोणतीही गंभीर समस्या होत नाही.

३. बाळाच्या डोक्यावर तात्पुरती गाठ येऊ शकते ज्याला चिग्नॉन म्हटले जाते.

४. फोर्सेप्सच्या मदतीने केल्या जाणाऱ्या प्रसुतींच्या तुलनेत व्हॅक्युम एक्स्ट्राक्शनच्या मदतीने केल्या जाणाऱ्या प्रसुती अयशस्वी होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचाच अर्थ असा शेवटी सी सेक्शन किंवा सिझेरियन प्रसुतीच करावी लागते.

व्हॅक्युमच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या प्रसुतीविषयी आपल्या डॉक्टरांशी बोला आणि या प्रकारे आपली प्रसुती करण्याविषयी त्यांचे काय मत आहे ते अवश्य विचारात घ्या.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon