Link copied!
Sign in / Sign up
80
Shares

उत्तम शुक्राणूंसाठी(स्पर्म) काही टिप्स


 

स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे मिलन झाल्यावर त्याचे फळं झाल्यावर एक नवा जीव जन्माला येतो. जसे गर्भ राहण्यासाठी उत्तम स्त्रीबीजाची आवश्यकता असते,तसेच उत्तम पुरुष बीजाची म्हणजेच उत्तम शुक्राणूंची गरज असते. स्त्रीबीज उत्तम असेल आणि शुक्राणूंची संख्या आणि त्याची प्रत किंवा गुणवत्ता चांगली नसेल तर मुल होण्यास समस्या येऊ शकतात. या समस्या निर्माण होऊ नये म्हणून काही सामान्य टिप्स देणारा आहोत.

पोटाच्या जवळ वाढलेली चरबी कमी करा.

उत्तम शुक्राणूंसाठी वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. पुरुष अधिक बारीक किंवा अधिक लठ्ठही नको.तसेच पोटाजवळील चरबी कमी असायला हवी: यासाठी सिक्स पॅकची आवश्यकता नाही. तुमचे पोट सुटलेले नसल्यास तुमचे स्पर्म्स हेल्दी आहेत. The journal Human Reproduction च्या अभ्यासानुसार पोटाजवळ अति प्रमाणात चरबी असल्याने सेक्स हार्मोन्स स्त्रवण्यास व स्पर्म्सच्या निर्मितीत अडथळा येतो.

लॅपटॉपचा अति वापर.

पुरुष वंध्यत्व संदर्भात झालेल्या अभ्यासानुसार लॅपटॉप आणि वाय-फायमुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत असल्याचे समोर आले आहे. फोन नंतर लॅपटॉप हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे हा उपाय कालबाह्य वाटले पण आरोग्यासाठी करणे आवश्यक आहे. लॅपटॉप हा या शरीरापासून जेव्हढा लांब ठेवता येईल तेव्हढा ठेवण्याचा प्रयन्त करा. लॅपटॉप हा लॅप वर ठेवण्यासाठी असला तर तुम्ही हल्ली उपलब्ध असलेली छोटी टेबल वापरू शकता किंवा काम करताना साधारणतः गुप्तांगला आणि आसपासच्या भागाला लॅपटॉप स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.

बाईकचा अति वापर वापरणे कमी करा.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यास हानिकारकच असतो त्याच प्रमाण बाईकचा अति वापराने तुमच्या शुक्राणूची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते. तेच सायकलच्या बाबतीत सायकल चालवणे आरोग्यासाठी चांगले असले तरी शुक्राणुंच्या गुणवते बाबत काही जणांच्या बाबतीत अति सायकल चालवणे हे एक कारण ठरले आहे. पण हे कारण सगळ्यांच्या बाबतीत खरे ठरेल असे नाही.

अति घट्ट पॅन्टस

अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की जे पुरुष अति घट्ट अंडरवेअर आणि पॅन्ट घालतात त्यांच्या स्पर्मची मोबिलिटी कमी होते. त्यामुळे स्पर्म्स अंड्यापर्यंत पोहचून फलित होण्यास अडथळा येतो

स्टीम बाथ/अति गरम पाण्याने अंघोळ.

आठवड्यातून एकदा सॉना बाथ किंवा अति गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे परंतू 40 डि.से. किंवा याहून अधिक तापमानापर्यंतही वाफ किंवा गरम पाणी आपल्या स्पर्मची संख्या कमी करतं.त्यामुळे सहसा अति गरम पाण्याने अंघोळ न करता माध्यम प्रमाणात गरम पाण्याने अंघोळ करावी.

व्यायामाचा अभाव.

जे पुरुष व्यायाम करत नाही त्यांच्यात शुक्राणूंची संख्या कमी आढळते. तसेच आठवड्यातून ५ दिवस कठोर परिश्रम घेऊन व्यायाम करणाऱ्या पुरुषांचा शुक्राणूंची संख्या अजिबात व्यायाम न करण्याऱ्यांच्या तुलनेत उत्तम असते.

प्रक्रिया केललं अन्न अति प्रमाणात खाणे.

जे पुरुष प्रक्रिया केलेलं अन्न  ( प्रोसेस्ड फूड )अति प्रमाणात खातात त्यांच्या शुक्राणूंची संख्या असे अन्न न खाणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत कमी असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon