Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

उत्तम सासुबाईंकडून या गोष्टी सुनेला शिकायला मिळतात.


लग्न हे तुमच्या जोडीदारबरोबरच अजून इतर नाती देखील तुमच्या आयुष्यात घेऊन येत. काही नाती आवडणारी असतात तर काही स्विकारावी लागतात. बहुतेक वेळा स्विकारावी लागणाऱ्या नात्यामध्ये सासूबाईंचा सहभाग असतो. परंतु हल्ली बऱ्याच सासूबाई या आपल्या सुनेशी जुळवून घेण्याचा प्रयन्त करतात. त्यावेळी बऱ्याच वेळा अनेक गोष्टी सुनेला सासूबाईंकडून शिकायला मिळतात. घरात नविन आलेल्या सुनेला कोण-कोणत्या गोष्टी सासुबाईंकडून शिकायला मिळतात हे आपण पाहू

1. नवीन पाककृती

निर्विवादपणे तुम्हाला अनेक पदार्थ माहित आहेत आणि तुम्ही अनेक वेळा केले देखील असतील, परंतु काही पदार्थ आणि पाककृती आहेत ज्या सासूबाई तुम्हाला शिकवतील, ज्या तुम्ही आधी पाहिलेले किंवा ऐकल्या देखील नसतील.

२. पतीबद्दल गोष्टी

तुम्ही आताच सहजीवनाला सुरवात केली असेल, तुम्हांला अजून पती विषयी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर सासूबाई सारखी व्यक्ती कोणीच नाही. पतीच्या लहानपणीच्या गंमती,किस्से, तसेच आताच्या आवडी-निवडी याबाबत अनेक गोष्टी तुम्हांला सांगतील. तसेच काही बाबतीत तुमच्या पतीशी कसे वागायचे हे देखील सांगतील.

३. सर्व गोष्टीचे व्यवस्थापन

मान्य करा किंवा नाही, आपल्या आईच्या घरी आपल्याला अधिक स्वातंत्र्य होत. आणि तुम्हांला काहीच करावे लागत नव्हते. पण आता गोष्टी वेगळ्या आहेत आणि आपल्या कामाच्या जबाबदा-यांसह आपण आपल्या घरच्या कामात देखील लक्ष घालावे लागण्याची शक्यता आहे. अश्यावेळी अचानक अशा संकटांत आल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे. हे अवघड आणि तणावपूर्ण असू शकते. अश्यावेळी आपली सासूबाई दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळण्यात मदत करतील आणि हळूहळू तुम्ही त्यांच्याकडून हे व्यवस्थापन शिकाल.

नातेवाईकांशी संबंध ठेवणे

बऱ्याचवेळा आपण कामात आणि नेहमीच्या दिनचर्येत व्यस्त असतो व्यस्त कार्यक्रमात आम्ही नातेवाईक आणि घरातील कौटुंबिक मित्रांच्या संपर्कात राहणे अवघड जाते. अशा परिस्थितीत तुमच्या सासूबाई तुम्हांला तुमचे काम आणि नातेवाईकांशी संपर्कात राहण्यास आणि त्यांच्याशी संबंध ठेवण्यास मार्गदर्शन करतात.

५. मुलांना सांभाळणे

वरील गोष्टीपैकी सगळ्याच गोष्टी बरोबरअसतील असे नाही परंतु तुमच्या कामासोबतच मुलांना कसे सांभाळावे याचे मार्गदर्शन त्या नक्कीच योग्यरीत्या करतीलराहते. मुलांसोबत, नवीन सर्वकाही सांभाळताना अशा परिस्थितीत,आपल्याला मदत करतात. आणि मुलांना कश्याप्रकारे सांभाळावे आणि त्यांचे सांगोपन करावे हे शिकवता

६. मौल्यवान सल्ले

बऱ्याचवेळा विविध बाबतीत त्यांचे सल्ले हे उपयुक्त ठरतात. त्याच्या अनुभवाततुन मिळणारे अनेक सल्ले हे तुम्हांला मदत करतात. बऱ्याच वेळा सल्ले हे त्रासदायक वाटतात परंतु त्या सल्ल्या घेऊन तसे वागल्यावर त्यांचे म्हणणे बरोबर होते असे जाणवते. त्यामुळे त्यांचं सल्ल्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon