Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

उसाच्या रसाच्या सेवनाने होणारे आरोग्यविषयक फायदे


हल्ली शुगर केन ज्यूस नावाने मिळणार आपल्या गुऱ्हाळयांतला उसाचा रस याच्या सेवनाने आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.उसाचा रस लवकर खराब होतो त्यामुळे तो ताजा असतानाच प्यावा.

१. पित्तशामक

उसाचा रस हा पित्तशामक असल्याने पित्तचा त्रास असणाऱ्याने उसाचा रस नक्की प्यावा.

२. लघवीविषयक समस्यांवर गुणकारी

ऊस लघवीचे प्रमाण वाढवणारा असतो,उसाचा रस आणि ऊसाच्या सेवनाने लघवी साफ होते. तसेच मूतखडा, लघवीच्या वेळी होणारी जल-जळ देखील यावर देखील उसाचा रस गुणकारी आहे.

३. काविळीवर उपाय

काविळीवर उसाच्या रसासारखा आणि उसासारखा उपाय नाही. काविळ झालेल्या व्यक्तीने रोज जेवणापूर्वी दोनवेळा ऊस खावा. फरक जाणवतो ( हा उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

४. उन्हाळ्यात उपयुक्त

उन्हाळ्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे डीहायड्रेशनची भिती सतत असते. उसाचा रस इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याची कमतरता पूर्ण करतो त्यामुळे उसाचा रस हा उन्हाळ्यात उपयुक्त ठरतो.

५. गुणकारी एनर्जी ड्रिंक

उसाच्या रसामध्ये ग्लूकोजची मात्रा मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने ऊर्जा मिळते.

या समस्या असणाऱ्यांनी उसाच्या रसाचे सेवन टाळावे किंवा प्रमाणात करावे.

१. मोठ्या प्रमाणात कॅलरी व कार्बोहायड्रेट असते त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर उसाचा रस सेवन करणे टाळा.

२. उसाच्या रसात साखरेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मधुमेही व्यक्तीं व्यक्तींनी उसाचा रस पिणे कटाक्षाने टाळावे.

३. ज्या व्यक्तींची ब्लड शुगर लेव्हल अचानकपणे वाढत असते अश्या व्यक्तींनी

४. कफाचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही उसाचा रस पिणे टाळावे.

उसाचा रस पिताना या गोष्टी लक्षात ठेवा.

१. फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणं टाळावं.

२. उसाच्या रसामध्ये इतर कोणताही रस मिक्स करू नये. बरेच वेळा आपल्याला वेगवेगळे पेय मिक्स करून पिण्याची सवय असते

३. दिवसातून आपण 3-4 ग्लास उसाचा रस पिणे पसंत करतो पण केवळ दोनच ग्लास उसाचा रस प्यावा. .

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon