Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

उपवासासाठी सुरणाचा किस

बटाटयाच्या,रताळ्याचा असे अनेक प्रकारचे किस उपाससाठी करण्यात येतात असचा एक उपवासाचा पदार्थ सुरणाचा किस कसा करायचा याची कृती आम्ही सांगणार आहोत. 

साहित्य:

१. २ कप सुरणाचा किस

२.  चमचे  तूप

३. १/२ टिस्पून जीरे

४. २-३ हिरव्या मिरच्या, मध्यम तुकडे

५. २ ते ३ चमचे  दाण्याचा कूट

६. चवीपुरते मीठ आणि साखर

७. थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं

कृती:

१.  सुरणाचा किस थोडावेळ आमसुलाच्या पाण्यात घालून ठेवावा. यामुळे सुरणाची खाज निघून जाते. नंतर पिळून घ्यावा.

२. कढईत तूप गरम करून त्यात जीरे, मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात सुरणाचा किस घालावा. शेंगदाण्याचा कूट, आणि मीठ घालावे.

३. मंद आचेवर वाफ काढावी. सुरण शिजले की साखर घालावी. कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून मिक्स करावे.

.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon