Link copied!
Sign in / Sign up
81
Shares

अशी करा उन्हाळ्यातील वाळवणे भाग-१ (सांडगे आणि पापड-पापड्या)

उन्हाळा आला की सगळ्यांना वाळवणाची आठवण नक्कीच येते. हल्ली वाळवणं घरी करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ज्यांना हे वाळवणं स्वतः करायची असतील त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. 

सांडगे 

 

हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे

साहित्य

अर्धा किलो हरभरा डाळ, हळद, हिंग, आवडीनुसार तिखट, मीठ, जिरे,तेल

कृती

रात्री साधारणतः ४०० ग्राम ते अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्या.ही हरभऱ्याची डाळ चांगली धुवून घ्या. एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घालून ही डाळ भिजत घाला.या भांड्यावर घट्ट झाकण ठेवा.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर भांड्यावरचे झाकण काढून हरबरा डाळीचे पाणी काढून टाका. त्यानंतर परत एकदा डाळ धुवून घ्या. नंतर ही डाळ मिक्सरवर जाडसर वाटून घ्या किंवा मिक्सरमधून काढून घ्या. या वाटलेल्या डाळीमध्ये हरबरा डाळीत हळद हिंग तिखट मीठ, जिरे थोड तेल घाला आणि मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. नंतर एका प्रतीवर किंवा मोठ्या ताटला तेल लावा आणि त्यावर.छोटे छोटे गोळे केले. सांडगे तयार करा. ही ताटे उन्हात ठेवा आणि हे सांडगे कडकडीत वाळू द्या.

मिश्रा डाळीचे सांडगे

साहित्य 

अर्धा किलो चणा डाळ, १ वाटी मटकीची डाळ,१ वाटी उडीद डाळ, १ वाटी मूग डाळ आवडीनुसार लाल तिखट(साधारण २ चमचे ),हळद १चमचा हिंग, आवश्यकतेनुसार मीठ ३ चमचे जिरे,दोन चमचे तेल

कृती 

सर्व डाळी दोन ते अडीच तास भिजत घालाव्यात नंतर पाणी काढून टाकून, जिऱ्या बरोबर मिक्सरमधून जाडसर काढून घ्याव्यात नंतर त्यात हिंग तिखट आणि मीठ घालावे आणि थोडेसे तेल घालावे आणि सगळं मिश्रण नीट मिक्स करून घ्या आणि छोटे छोटे सांडगे प्लॅस्टिकच्या कागदावरकिंवा ताटात किंवा पराती मध्ये घातले तरी हरकत नाही. चांगले कडकडीत वाले पर्यंत उन्हात ठेवावेत.

मटकी आणि मुगाचे सांडगे

साहित्य 

मटकी डाळ आणि मुगाची डाळ- प्रत्येकी पाव किलो, तिखट,मीठ,हिंग,हळद,जिऱ्याची पूड,धण्याची पूड

कृती 

रात्री मटकीची डाळ आणि मुगाची डाळ भिजत घालावी. चांगली भिजल्यावर सकाळी जाडसर वाटावी. त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, जिऱ्याची पूड, धण्याची पूड घालून परातीत किंवा ताटात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर अगदी छोटे छोटे सांडगे घालावे.

बाजरीचे सांडगे

साहित्य

अर्धा किलो बाजरी, १ वाटी ताक, मीठ, दोन चमचे लसूण पेस्ट, लाल तिखट आणि कोथिंबीर.

कृती

बाजरी निवडून तीन-चार तास पाण्यात भिजत घालून नंतर पाणी काढून टाकावे आणि नंतर मिक्सरवर जाडसर फिरवून घ्यावे. रात्री ताकात बाजरीचा भरडा भिजवून रात्रभर पीठ आंबू द्या. दुसऱ्या दिवशी चार वाटय़ा पिठाला आठ वाटय़ा पाणी घेवून गॅसवर मोठय़ा भांडय़ात पाणी उकळू द्यायचे. त्यात लसूण पेस्ट, लाल तिखट व मीठ घालावे. पाणी चांगले उकळल्यावर त्यात बाजरीचे आंबवलेले पीठ घालून चांगले शिजू द्यावे. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे पिठाला दाटपणा आल्यावर चांगले हलवून गॅसवरून खाली उतरवून जरा थंड झाल्यावर ताटात किंवा परातीत सांडगे करावे.

सांडगे वाळायला ३-४ दिवस देखील लागू शकतात. त्यामुळे दिवसभर उन्हात ठेवले आणि संध्याकाळी घरात आणावे असा क्रम सांडगे पूर्ण कडकडीत वाले पर्यंत करावा. एकदा सांडगे कडकडीत वाळले कि मग डब्यात घालून ठेवावे. अर्धवट वाळल्यावर जर डब्यात भरून ठेवले तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते.

कसे खावेत- सांडगे हे तळून देखील खातात किंवा भिजवून त्याची आमटी किंवा पातळसर भाजी देखील करतात.

पापड

 

उडदाचे पापड

साहित्य

१ किलो उडदाच्या डाळीचे पीठ, १०० ग्रॅम पापडखार, २ चमचा बारीक मीठ, १० ग्रॅम पांढरे मिरे, २० ग्रॅम काळे मिरे, , १ वाटी तेल, थोडा हिंग.

कृती

उडदाची डाळ दळून आणावी, २ वाटया पीठ बाजूला काढून ठेवावे, ५ वाटया पाणी पातेल्यात घ्यावे त्यात पापडखार व मीठ घालून उकळावे. पाणी गार झाल्यावर गाळून घ्यावे.मिऱ्याची व हिंगाची पूड करावी. उडदाच्या डाळीच्या पिठात मिरपूड, हिंग घालून पापडखार व मिठाच्या उकळून गार केलेल्या पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. पीठ शक्यतो २-३ तास आधी भिजवून ठेवावे हल्ली तयार पीठ देखील मिळते. पाटयाला व वरवंटयाला तेलाचा हात लावून पापडाचे पीठ कुटावे.किंवा मऊ होई पर्यंत मळावे पीठ कुटून त्याचा मऊ गोळा झाला पाहिजे. पीठ कुटताना अधून मधून पिठाचा गोळा हाताने ताणून लांब करून परत गोळा करून कुटावा. पिठाचा गोळा मऊ झाला की, तेलाच्या हाताने सारख्या आकाराच्या लाटया करून झाकून ठेवाव्यात व एक एक लाटी उडदाच्या डाळीच्या पिठीवर पातळ लाटावी व पापड तयार करावे. तयार झालेले पापड कडकडीत उन्हात वळवावेत.

साबुदाण्याचे पापड( पापड्या )

 

साहित्य

एक किलो साबुदाणा, मीठ, पाणी.

कृती

साबुदाणा धुऊन रात्रभर भिजत घालावा. दुसऱ्या सकाळी साबुदाणा बुडेल इतक्या आधणात चवीपुरते मीठ घालावे व त्यात भिजवून ठेवलेला साबुदाणा  घालून चांगला शिजवावा आणि प्लॅस्टिकच्या कागदावर पळीने किंवा चमच्याने, हव्या असतील, तशा लहान किंवा मोठ्या पापड्या घालाव्यात.

ज्वारीचे पापड

साहित्य

एक किलो ज्वारी, २ मोठे लसूण, दोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ, तिखट तीन चमचे.

कृती

ज्वारी तीन दिवस भिजवावी. तिसऱ्या दिवशी धुवून थोडावेळ सावलीत वाळवून व मिक्सरवर बारीक करावा आणि एका सूती कापडात घट्ट बांधून ठेवावी. चौथ्या दिवशी ज्वारीच्या दुप्पट पाणी गरम करून त्यात मीठ व वाटलेली लसूण, जिरे, तीळ, तिखट घालावे. नंतर वाटलेले ज्वारीचे पीठ हळूहळू सोडावे, ते हलवत राहावे.पीठ शिजायला लागले की शिजवताना पीठात बुडबुडे आले की पीठ शिजले असे समजावे. मग ओला रुमाल करून त्यावर थोडे पीठ घालून हाताला पाणी लावून पातळ थापावे व कडकडीत उन्हात वाळवावे. चांगल्या कडकडीत वळण्यासाठी २-३ दिवस तरी लागतात.

हे पापड टाळून किंवा भाजून खावेत, ज्वारीची पापड तळून खावेत आणि आणि साबुदाण्याच्या पापड्या या तुपात तळाव्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon