Link copied!
Sign in / Sign up
42
Shares

उन्हाळ्यातील गर्भावस्थेत अश्या प्रकारे काळजी घ्या.

गर्भावस्थेचा काळ सुखद अनुभव देणारा असला तरीही जसे जसे महिने वाढू लागतात अवघडलेपण वाढू लागते. कधी एकदा प्रसुती होते असेही वाटू लागते. त्यातून गर्भावस्थेतील तिसरी तिमाही आणि प्रसुती जर ऐन उन्हाळ्यात येणार असेल तर हे दिवस काढणे निश्चितच कठीण होते. हल्ली होणाऱ्या आया अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही काम करतात किंवा काही वेळा ९व्या महिन्यात विश्रांती घेतात. की असे म्हणूया गर्भावस्थेत अॅाक्टीव्ह किंवा चालते फिरते राहण्याचा सल्ला स्त्रियांनी फारच मनावर घेतला आहे. तर ते असोच पण उन्हाळ्यातील प्रसुती किंवा गर्भावस्था ही नक्कीच होऊ घातलेल्या आईसाठी त्रासदायक ठरते.

उन्हाळा त्रासदायक का

गर्भवती स्त्रीच्या शरीरात गर्भधारणेपासून बदल घडू लागतात. सुरुवातीच्या काळात ज्या गोष्टींचा मॉर्निंग सिकनेस किंवा कोरड्या उलट्या, थकवा, वेदना आणि क्रॅम्स किंवा स्नायू आखडण्याचा त्रास होतो तो उन्हाळ्यात हा त्रास अधिक जाणवू शकतो. तसेच गर्भावस्थेत रक्तदाबही अनियंत्रित असू शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तसेच उकाडा आणि हवेतील दमटपणा यामुळे आपल्याला अधिक गरम आणि अस्वस्थ वाटू शकते.

गर्भावस्था किंवा प्रसुती वेळी कोणती काळजी घ्यावी

१. शरीरातील पाण्याचे प्रमाण

गर्भवती स्त्रियांनी शरीराची जपणूक करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात जास्त घाम येऊन शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण नियंत्रित राखले पाहिजे. पाण्याच्या कमतरतेमुळे मुदतपुर्व प्रसुती होण्याचा धोका असता. शरीरातील पाणी कमी झाल्याने मळमळणे, चक्कर येणे, स्नायू आखडणे आणि थकवा इत्यादी त्रास होतात. या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी विशेषतः उन्हाळाच्या काळात भरपूर पाणी प्यायले पाहिजे.

२. सूज येणे

गर्भावस्थेत तिसऱ्या तिमाहीत स्त्रीच्या पायावर थोडीफार सूज येते. थोडा आराम केल्यानंतर ती बरी होते. या काळात गर्भवतीने आहारात मीठ कमी घेतले पाहिजे त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. मात्र उन्हाळ्यात शरीरावर सूज येण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याने अस्वस्थता वाढते. तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शक्यतो पाय उंच करून ठेवावे. तसेच योग्य मापाचे शूज घालावेत.

३. अति थकवा

उन्हाळ्याच्या काळातील गर्भारपण थोडे त्रासदायक ठरते. अगदी साध्या साध्या गोष्टी करतानाही थकवा येणे, अतिघाम येणे असा त्रास होतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.

अतिउष्णता असल्यास गर्भवतीच्या शरीराचे तापमानही वाढते. ते जवळपास १०५-१०६ अश फॅरेनहाईट पर्यंत असते त्यामुळे योग्य वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

४. थंडावा मिळण्यासाठी

उन्हाळ्यात गर्भवती स्त्रीला थंडावा असलेल्या आरामदायी जागेवर रहावे. शक्यतो उन्हात बाहेर पडूच नये. कारण गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत जर स्त्रीचे तापमान १०२ पेक्षा अधिक असल्यास गर्भामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. फॉलिक अॅतसिडची कमतरता भासल्याने असे दोष उत्पन्न होतात. त्यामुळे शक्यतो उन्हात जाणे टाळावेच. त्याशिवाय थंड पाण्याने अंघोळ करावी.

५. कॅफेनचे सेवन टाळा

गर्भवतीने आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता अधिक असते त्यामुळे पाण्याचे भरपूर सेवन करावे मात्र चहा, कॉफी यासांरखे कॅफिन असणारी पेये, एरिएटेड पेये, कोल्डqड्रक्स घेणे टाळावे.

६. भूक न लागणे

उन्हाळ्यामध्ये भूक मंदावणे हे सर्वसाधारण लक्षण असते. मात्र गर्भवतीच्या बाबतीत आहाराकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे ताजी फळे, फळांचे रस, काकडी सारख्या भाज्या यांचा समावेश आहारात करणे जरुरीचे असते. उन्हाळ्याच्या काळात तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावे. तसेच थोडा थोडा आहार घ्यावा. एकाच वेळी खूप जेऊ नये त्यामुळे चयापचय क्रिया योग्य होते आणि बाळाच्या वाढीसाठी फायदा होतो. अति प्रमाणात एकाच वेळी जेवल्यास शरीरातील उष्णता वाढते.

७. घामोळे, पुरळ

अतिघामामुळे पुरळ येणे, खाज सुटणे असे त्रास होतात. त्यामुळे उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने कपड्यांची निवड ही गर्भावस्थेतील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी सुती सैलसर कपडे या काळात घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गाऊन किंवा मॅक्सी सारखे ड्रेस घालता येतील. घट्ट कपडे घालणे टा‹ळावे. तसेच अंगाला व्यवस्थित पावडर लावावी. तसेच उन्हाळ्याच्या काळात प्रसुती येणार असेल तर केसही मानेपासून वर बांधावेत किंवा छोटे कापावेत. त्यामुळे घाम कमी येईल शिवाय केसाची काळजी घेणे सोपे जाईल.

८. त्वचा कोरडी पडणे 

गर्भावस्थेमध्ये त्वचा खूप संवेदनशील असते त्यामुळे ती कोरडी पडते. उन्हामध्ये बाहेर पडताना एसपीएफ क्रीम जरुर लावावे. त्यामुळे त्वचा ओलसर राहाते आणि कोरडी पडण्यापासून बचाव होतो. त्याशिवाय गॉगलही घालावा. तसेच ओठही उन्हाळ्यात कोरडे पडतात त्यासाठी लिप बाम, तूप आदीचा वापर करावा

९. अतिव्यायाम, कष्ट नको

चालणे, पोहणे, योग आणि काही इतर गर्भावस्थेतील व्यायाम करावेत पण अति ताण घेऊ नका. सकाळच्या वेळात उन्हे डोक्यावर येण्याआधी पुरेसा व्यायाम करावा. खूप जास्त शारिरीक श्रम पडणारे व्यायाम करु नये. मोकळ्या हवेत फिरणे हा देखील उत्तम व्यायाम आहे त्यामुळे ताजेतवाने वाटते. पण उन्हाळ्यात मात्र उन व्हायचा आत आणि संध्याकाळी उन्हे उतरल्यावर फिरायला जावे.

या व्यतिरिक्त गर्भवतीने भरपूर आराम केला पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्यात येणारा थकवा कमी होईल. वरील गोष्टी लक्षात ठेवल्या तर उन्हाळ्यात गर्भारपणातील त्रासापासून सुटका होण्यास मदतच मिळेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon