Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

अशी करा उन्हाळ्यातील वाळवणे भाग-२(शेवया आणि कुरड्या)

उन्हाळा आला की सगळ्यांना वाळवणाची आठवण नक्कीच येते. हल्ली वाळवणं घरी करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ज्यांना हे वाळवणं स्वतः करायची असतील त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.

अश्या बनवा कुरडया

साहित्य 

१ किलो गहू, मीठ, १ चमचा हिंग,थोडी तुरटी.

कृती 

एक किलो गहू ३ दिवस पाण्यात भिजत घालावे. प्रत्येक दिवशी गव्हातील पाणी बदला. तीन दिवसानंतर भिजवलेल्या गव्हातील सत्व काढून घ्यावे. हे सत्व काढून घेण्यासाठी गहू वाटून घ्या. हे सत्व  रात्रभर झाकून ठेवावे. नंतर सकाळी या सत्वाच्या भांड्यात वर आलेले पाणी काढून टाका. त्यानंतर जे जाडसर सत्व राहिले ते घ्यावे. या जाडसर सत्वात जेव्हडे ते सत्व असेल तेवढेच पाणी घ्या. ते पण गॅस वर उकळायला ठाव आणि त्यामध्ये  हिंग आणि थोडी तुरटीची पावडर अंदाजे घाला. त्यानंतर  पाण्याने एक उकळी आल्यावर एका बाजूने हळू हळू गव्हाचे सत्व त्या पाण्यात घाला. आणि लाकडी चमच्याने हलवत राहा. या मिश्रणात गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण शिजत आले की जाडसर आणि पारदर्शक व्हायला लागते. असे मिश्रण शिजले की ते कुरडयाच्या सोऱ्याला किंचित तेल लावून कुरडया करा. एक मोठं प्लॅस्टिक किंवा वापरात नसलेल्या साडीवर कुरडया घाला.

अश्या करा शेवया 

साहित्य 

साहित्य - १ कि. गव्हाचा रवा, अर्धा कि. मैदा, चवीला मीठ आणि थोडं तेल.

कृती 

रवा व मैदा एकत्र करून मीठ घालून चार तास  भिजवून आणि झाकून ठेवावं. चार तासांनी हे पीठ चांगले मळून घ्या. त्यानंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे करून दोन्ही हातांच्या साह्याने हातांवर लांबवा किंवा हल्ली शेवयांची मशीन देखील मिळते त्यावर शेवया करा हे दोन्ही पर्याय शक्य नसल्यास सोऱ्याच्या विव्ह्ड ताटल्यांच्या साहयाने शेवया करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon