Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

या घरगुती उपायांनी उन्हाळ्यात त्वचेची अशी काळजी घ्या.


थंडीप्रमाणे उन्हाळ्यात देखील त्वचेची काळजी घेणं आवश्यक असते. पुढील काही घरगुती उपायांनी त्वचेची अशी काळजी घ्या .

१. सारख्या प्रमाणत मध आणि लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि हे मिश्रण १० मिनटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर धुवा.यामुळे उन्हामुळे काळवंडलेला चेहरा उजळण्यास मंद होईल.

२. काकडीचा रस जा उन्हात गेल्यावर गरम झालेल्या त्वचेला थंडावा देण्यास मदत करेल तसेच चेहऱ्यावरचे पिंपल आणि काळे डाग घालवण्यास मदत करते आणि त्वचा मऊ बनवते. यासाठी कोशिंबीरसाठी काकडी चोचल्या नंतर उरणारे काकडीचे पाणी किंवा काकडी मिक्सरमधून काढून किंवा किसून रस चेहऱ्याला लावा. तसेच हाताला  देखील लावू शकता जर काकडी मिक्सरमधून किंवा किसनणारा असाल तर त्याचा जाडसर ठार जरी चेहऱ्याला लावला तरी चालेल. (सर्दी झाल्याने हा प्रयोग करू नये सर्दी वाढू शकते)

३. डाळीच्या पिठामध्ये काही थेंब  दूध आणि काही थेंब लिंबाचा रस घाला आणि अगदी थोडा पाणी घालून मिश्रण तयार करा. आणि हे मिश्रण चेहऱ्यावर १५ मिनटे असेच राहू द्या आणि नंतर धुवा.

४.संत्र्याच्या सालीची पावडर किंवा संत्र्याच्या रस चेहऱ्याला लावल्यास चेहरा स्वच्छ आणि मऊ होण्यास मदत होते 

५. गाजराची  पेस्ट चेहऱ्याला लावल्यावर चेहरा उजळण्यास मदत होते आणि गाजराची पेस्ट अँन्टी टॅनिगचे काम करते .


Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon