Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून

 उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमानही वाढते. तसेच शरीरातील पाणीही कमी होते. मनुष्याच्या शरीराच्या आकारमानानुसार ५५ टक्के ते ७० टक्के पाणी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राखणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. त्यामुळ दिवसभरात ७-८ ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते. इतक्या प्रमाणात पाणी प्यायले नाही तर शरीराला पाण्याची कमतरता भासते. शरीराकडून पाण्याची पातळी कमी झाल्याची काही लक्षणेही दर्शवली जातात.

शरीराचे निर्जलीकरणाची लक्षणे-

लघवीचे प्रमाण कमी होणे

गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे.

तोंड कोरडे पडणे

डोकेदुखी, अस्वस्थता

चक्कर येणे

त्वचा कोरडी पडणे

उलट्या, जुलाब होणे

पाण्याची कमतरता टाळण्यासाठी-

भरपूर पाणी

शरीराचे डिहायड्रेशन होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे. दहा ते बारा ग्लास पाणी प्यावे. तहान लागत नसेल तर थोडे थोडे पाणी पित रहावे.

सरबत

अशक्तपणा आला असेल तर लिंबू सरबत, कोकम सरबत, साखर मीठ पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडरचे सरबत प्यावे. शहाळ्याचे पाणी देखील पिता येते.

ताक

जेवणामध्ये मधुर ताकाचे सेवन करावे. त्यामुळे उर्जा मिळते.

पाणीदार फळे-

मोसमी फळे जसे संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी ह्या सर्व फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यांचे सेवन अवश्य करावे.

भाज्या, कडधान्य

सलाडच सेवन अधिक प्रमाणात करावे कारण त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्याशिवाय प्रथिने, ओमेगा थ्री, तंतुमय पदार्थ, लोह आणि अँटी ऑक्सिडंट हे घटक भरपूर प्रमाणात असतात. काकडी. टोमॅटो, कोबी, बीट तसेच मोडाची धान्ये आहारात असावीत.

फळाचे रस

ताजे फळांचे रस प्यावेत तसेच उसाचा रसही प्यायला जाऊ शकतो. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून उसाच्या रसात पुदीना घालून पिता येऊ शकते.

दही

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यास दही हा उत्तम पर्याय आहे. त्यात पाण्याचे ८५ टक्के प्रमाण असते. तसेच त्यात पचनासाठी आवश्यक जीवाणू असतात. म्हणजे प्रोबायोटिकचे भरपूर प्रमाण असते. दह्यामुळे आरोग्याचे अनेक फायदे होतात. त्यामुळे उन्हाळ्यात थंडावा देण्याबरोबर पाण्याचे प्रमाण वाढवते शिवाय प्रथिने, बी जीवनसत्व आणि कॅल्शिअम ही मिळते. दह्याचे ताक, लस्सी असेही प्रकार तयार करता येतात.

ब्रोकोली-

ब्रोकोलीमध्ये ८० टक्के पाणी असते तसेच पोषकही असते. ती नैसर्गिक अॅटी इन्फ्लमेटरी गुण असतात. त्यामुळे उन्हाळ्यात होणाèया अॅलर्जीपासून बचाव करते. याचा वापर सलाडमध्ये कच्चाही करता येतो. तसेच भाजी करूनही खाता येतो.

सलाड ची पाने

सलाडच्या पानात ९५ टक्के पाणीच असते. त्याचा वापर सँडविच मध्ये करता येतो. प्रथिने आणि ओमेगा ३ यांचे प्रमाण भरपूर असते. तसेच चरबी नसल्याने कॅलरीही खूप कमी प्रमाणात असते.

भात -

भातामध्येही ७० टक्के पाणी असते. त्यामुळे शिजवलेला तांदुळ उन्हाळ्यात नक्कीच उत्तम आहार आहे. त्यात पुरेश्या प्रमाणात लोह, कार्बोहायड्रेट इत्यादी असतात. तसेच उन्हाळ्याच्या काळात भात खाल्ल्यास चवही लागते.

आंब्याचे पन्हे-

शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी आंब्याचे पन्हे देखील रामबाण उपाय आहे. दिवसभरात दोन भांडी आंब्याचे पन्हे प्यायल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. आंब्यात झिंक आणि सी जीवनसत्वाचे भरपूर प्रमाण असते.

काय टाळावे -

पेय पदार्थाचे प्रमाण वाढवायचे असले तरीही त्यात सॉफ्ट ड्रिंक पिऊ नयेत. तसेच डबाबंद ज्यूस पिऊन पाण्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करु नये. तसेच अतिप्रमाणात चहा कॉफी पिणे टाळावे. कारण त्यात कॅफिन नावाचा घटक असतो ज्यामुळे तहान लागत नाही.

अति तहान लागण्याची वाट पाहू नये. नियमित अंतराने पातळ पेये घ्यावीत. जेवणापुर्वी अर्धा तास पाणी प्यावे. जेणेकरून पचनसंस्था अन्नाचे पचन करण्यासाठी तयार होते. तसेच जेवणानंतर कमीत कमी २ तासांनी पाणी प्यावे.

रात्री झोपून उठल्यावर सकाळी दोन तास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत होते.

व्यायामास सुरुवात करण्यापुर्वीही पाणी प्यावे.

लक्षात ठेवा-

उन्हाळ्यात काळजी घेऊनही काही वेळा त्रास होतो तेव्हा एक दिवसापेक्षा जास्त वेळा उलटी आणि जुलाब होत असतील तर रुग्णाला ताबडतोब डॉक्टरकडे न्यावे. शरीरातील पाणी कमी होण्यास काही वेळा डायरिया कारणीभूत असतो. त्यावेळचा अशक्तपणा कमी करण्यासाठी साखरमीठ पाणी द्यावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon