Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

उन्ह्याळ्यात या भाज्या आणि फळे खावीत

जसं-जसे ऋतू बदलतो तसं-तसं वातावरणात बदल होतो आणि त्यानुसार आपल्या आहार-आणि विहारात देखील बदल करण्याची गरज असते.  त्यानुसार उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात आणि खाऊ नयेत हे सांगणार आहोत प्रकारच्या भाज्या कोणत्या, कुठल्या ऋतूत खाव्यात, याविषयी खाली माहिती देत आहोत.

दुधीभोपळा 

कोणत्याही ऋतूंत चालणारी आणि पचायला हलकी असणारी भाजी 

गवार 

गवार खाल्याने अनेकांना पित्ताचा त्रास होतो त्यामुळे सहसा उन्हाळ्यात गवार टाळलेले बरे 

बटाटा 

बटाटा  हा कोणत्याही ऋतूत प्रमाणातच खावा कारण वातूळ असल्याने त्याचा अति सेवनाने अनेकी समस्या निर्माण होऊ शकतात. 

कोबी आणि फ्लॉवर

या भाज्या खाल्याने अनेक जणांना वाताचा त्रास होतो. त्यामुळे या काळात कोबी आणि फ्लॉवर सारख्या भाज्या कमी प्रमाण खाव्यात 

पालेभाज्या

उन्हाळयात पालेभाज्या खाण्यास काही हरकत नाही.

भेंडी 

उन्हाळयात मुतखडा होण्याची शक्यता असते आणि भेंडीचा भाजीने मुतखड्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे मुतखडय़ाच्या रुग्णांनी ही  भाजी कमी प्रमाणात खावी.

फळे 

प्रत्येक मोसमात येणारी फळे त्या-त्या मोसमात खावीत. त्याच प्रमाणे उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे जास्त खावीत यामध्ये , कलिंगड,खरबूज, या व्यतिरिक्त आंबा आणि इतर मोसमी फळे खावीत. 

भाज्या करताना घ्यावयाची काळजी 

१. भाज्यांना तेल कमी प्रमाणात वापरावे,

२. उन्हाळ्यात गरम मसाल्यांचा वापर कमीतकमी करावा.

३. भाज्यांमध्ये आमसूल वापरावे,पित्त होण्याची शक्यता कमी होते. 

४. धणे-जिरेपूड,चा वापर अस्वयंपाकात करावा. 

५. भाज्या खूप दिवस फ्रिजमध्ये ठेवू नये.

६. जास्त प्रमाणात मीठ वापरू नये.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon