Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

उन्हाळ्यात गुप्तांगाची आणि जवळील त्वचेची काळजी कशी घ्याल ?

 जसं जस उन्ह तापत आहे तसं-तसं घामाच्या धारा लागत आहेत. काही भागात घामाच्या धारांसारखेच चटके देणारे उन्ह देखील त्रासदायक ठरत आहे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या प्रमाणेच गुप्तांग आणि त्याजवळील त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्यास त्वचेविषयक समस्या आणि संक्रमण इन्फेक्शन निर्माण होण्याची शक्यता असते.या समस्या निर्माण होऊ नये म्हणून काही टिप्स 

१. कपडे 

घाम येणारे उन्ह असो किंवा चटके देणारे उन्ह असो या भागात घाम येतो आणि तो साचतो आणि त्यामुळे पुरळ येणे, खाज येणे किंवा इतर त्वचेविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते, अश्यावेळी जर कमी जाड पातळ आणि घाम शोषले जाणारे अंतर्वस्त्र आणि कपडे घेतल्यास  घाम टिपला जाऊन समस्या टाळल्या जाऊ शकतात. बाहेर असताना हे शक्य नसल्यास कमीत-कमी घरात असताना तरी सुती आणि सैलसर कपडे घालावे. 

२. स्वच्छता 

या काळात गुप्तांग जवळील केस काढावेत जेणेकरून घाम साचून राहणार नाही. शक्य असल्यास दिवसातून दोनदा आंघॊळ करावी किंवा तो भाग स्वच्छ धुवावा अथवा पाण्याने पुसून कोरडा करावा. 

३. आहार 

जास्त तिखट आणि जास्त मसालेदार आहार घेऊ नये. उष्ण आहार घेतल्यास उष्णतेने पुरळ येणे फोड येणे अश्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे सौम्य गुणधर्माने थंड असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा 

हे करू नका 

घाम येतो म्हणून सतत पावडर किंवा इतर कोणतेही रासायनिक घटक असणारे क्रीम किंवा स्प्रे सतत वापरू नये.

दिवसातून एकदा किंवा दोनदा साबणाने तो भाग स्वच्छ करावा प्रत्येक वेळी साबणाचा वापर करू नये.साबण आणि त्यातील रासायनिक घटकांमुळे समस्या निर्माण होऊ शकतो.

तंग आणि घट्ट अंतर्वस्त्र घालू नका, सैलसर कपडे घाला 

घाम पुसण्यासाठी किंवा स्वच्छता केल्यानंतर मऊसर कापडाचा वापर कराव तसेच ते कापड देखील स्वच्छ असावे. 

कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्या.

फोड किंवा पुरळ आल्यास नैसर्गिक घटक असलेली पावडर किंवा क्रीम वापरा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon