Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

उन्हाळ्यात असा ठेवा तुमचा आहार-विहार

हळू-हळू उन्हाळा जाणवायला लागला आहे. आणि हल्ली दरवर्षी उन्हाळा आधीच्या उन्हाळ्यापेक्षा जास्त तापातच आहे. पण उन्हाळ्यामुळे आपली रोजची कामे आणि आपला दिनक्रम काही थांबत नाही त्यामुळे जर या दिवसात काळजी तब्बेतीची काळजी घेतली नाही त्तर त्याचे परिणाम उन्हाळा संपे पर्यंत भोगवे लागतात. त्याकरता उन्हाळ्यात आहार-विहार  आणि दिनक्रम कसा असावा हे आपण पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचा उन्हाळा सुकर जाईल. 

आहार 

१. उन्हाळ्यात  पचनशक्ती मंदावते त्यामुळे पचायला सोपा,जाईल असा हलका आहार घ्यावा, तसेच वारंवार खाऊ नये. 

२. आंबट, खारट आणि तिखट तेलकट पदार्थ या ऋतूत शक्यतो टाळावेत.यामुळे पचन कार्य देखील चांगले राहते आणि पित्त देखील होत नाही.

३. रोजच्या आहारात दूध, घरचे ताजे लोणी व तूप यांचा समावेश असावा. मुख्य जेवणात तांदूळ, ज्वारी, नाचणी, गहू या धान्यांचा समावेश असावा.

डाळी, कडधान्यांमध्ये मूग, तूर, मसूर, मटकी उत्तम. 

४. या काळात  घाम खूप येत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे या करता योग्य प्रमाणात पाणी प्यावे. 

५. कलिंगड, कोहळा तसेच पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा. तसेच काकडीदेखील खावी परंतु  रिकाम्या पोटी घेणे काकडी खाऊ नये.

६. दुपारच्या वेळी जेवणानंतर भूक लागल्यास फुटाण्यासोबत थंड पाणी घेतले पाहिजे. रात्रीचे जेवण हे हलके करावे. 

७. उन्हाळ्यात बर्फाचे सेवन जास्त केले जाते. त्याने सुरवातीला छान वाटते. पण त्यामुळे दात कमजोर होतात. माठातील थंड पाणी प्यावे.

 विहार 

१. उन्हाळ्यात त्वचेचा उन्हाशी थेट येणारा संपर्क टाळावा. त्यामुळे शक्यतो उन्हात बाहेर पडताना साधारण सर्व अंग झाकले जाईल अश्या सुती कपड्यांचा वापर करावा.

२. या काळात घाम खूप येतो त्यामुळे शक्यतो घाम टिपला जाईल असे कपडे घालावे.विशेषतः फिरतीची कामे असणाऱ्याने देखील सुती घाम टिपला जाईल अश्या कपड्यांचा वापर करावा. अंतर्वस्त्रे देखील घाम टिपला जाणारी घालवी. त्यामुळे घाम साचून न राहता त्वचाविषयक समस्या निर्माण होणार नाही.

३. या काळात सतत गार पाण्याने अंघोळ करावी असे वाटते. तरीही अति थंड किंवा अति गरम पाण्याने अंघोळ न करता कोमट किंवा साधारण तपमानच पाण्याने अंघोळ करावी.

४. कमी प्रमाणात व्यायाम करवा ज्यामुळे शरीरातील जास्त ऊर्जा आणि पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही. या दिवसात पोहणे हा चांगला व्यायाम ठरू शकतो. 

५. उन्हात बाहेर जाताना डोके झाकलेले हवे असे म्हणतात ते त्यासाठीच. आपला मेंदू आणि डोळे हे खूप महत्त्वाचे अवयव आहेत. मेंदूत एकाच वेळी विविध प्रकारच्या रासायनिक क्रिया सुरू असतात. मेंदूची स्वत:ची एक प्रकारची उष्णता तिथे असते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणारे केंद्रही मेंदूतच आहे.

६. शक्य असल्यास उन्हातून आल्यावर हातापायांना कांद्याचा रस चोळणे बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालावी. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon