Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

अशी करा उन्हाळ्याची आरोग्यदायी तयारी

फेब्रुवारी महिना संपायला काही दिवसाचं राहिले आहेत आणि आता लवकरच उन्हाळा सुरु होईल. ऊन, धूळ, घाम, थकवा, यामुळे एॅलर्जी, दमा, त्वचेचे आजार, डोळ्यांचे आजार यामध्ये उन्हाळ्यात वाढ होते आणि त्यापासून कसा बचाव करायचा ह्यासाठी काही साध्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि पाळल्या तर तुमचा उन्हाळा नक्कीच सुखकर जाईल.

१. आहारातील बदल

या काळात पित्तामध्ये वाढ होते. या काळात सूर्याच्या उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतडय़ातील स्निग्धता नष्ट होते. आहारात साहजिकच हलके अन्न घ्यावे व एका वेळी जास्त आहार घेण्यापेक्षा थोडय़ा थोडय़ा वेळाने कमी आहार घ्यावा. त्यातच ज्वारीची भाकरी, सॅलाडस् व हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश असावा.त्यामुळे जड अन्न पचत नाही व शरीरात पाण्याची गरज वाढते. त्यामुळे या काळात भूक असेल तितक्या आहाराबरोबर फळ, फळांचा रस भरपूर घेणे गरजेचे असते..तसेच या दिवसांमध्ये सुका मेवा, अंडी, मसालेदार पदार्थ, चाट, मांसाहारी पदार्थ शक्यतो टाळलेले बरे

२. पाण्याचे प्रमाण

या काळात योग्य प्रमाणात पाणी प्यावे. लघवी सतत पांढरी व्हायला हवी हे ध्येय ठेवावे.जर पिवळी लघवी व्हायला लागली तर पाण्याचे प्रमाण वाढावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. या दिवसांमध्ये साहजिकच थंड पेयाकडे आपला जास्त कल असते. पण थंड पेय कटाक्षाने टाळावीत. तसेच आईस्क्रीम व फ्रीजमधील थंड पाणी पूर्णतः टाळल्यास उत्तम माठाचा पर्याय वापरावा.

३. उन्हाळ्यातील आजार

१. उष्माघात (उन्हामुळे होणारा त्रास)

हा त्रास टाळण्यासाठी योग्यप्रमाणात पाणी प्यावे, साधरणतः उन्हात बाहेर फिरणे टाळावे, बाहेर जावेच लागल्यास उन्हात जाताना छत्री किंवा टोपी घालावी, पाण्याची बाटली आणि काहीतरी गोड किंवा साखर बरोबर असावी

२. लहान मुलांमधील जंतुसंसर्ग - गोवर, कांजण्या, गलगंड

या आजाराची साथ असेल तर त्याची लास मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावा, शाळेत कुणाला संसर्गजन्य त्रास झाला असल्यास मुलांना शाळेत पाठवू नये.

३. डोळ्यांचे आजार - कंजक्टिव्हायटीस (डोळे येणे )

डोळ्याची काळजी घ्यावी, साथ असल्यास स्वतः गॉगल-चष्मा घालावा,दुसऱ्यांना होऊ नये म्हणून बाहेर जाऊ नये

४. त्वचेचे आजार

या काळात घामामुळे अनेक त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात सुती घाम टिपले जाणारे कपडे घालावे, बाहेरून आल्यावर स्वच्छ हातपाय धुवावे किंवा शक्य असल्यास अंघोळ करावी.

५. मूतखडा

या काळात पाणी योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते.

६. मायग्रेन (अर्धशिशी)

 मायग्रेन असणाऱ्या व्यक्तीने या काळात उन्हात जाणे टाळावे, हलका आहार घ्यावामी योग्य प्रमाणात पाणी पाणी प्यावे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon