Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

त्वचेविषयक अॅटोपिक डरमीटीटीस म्हणजे काय आणि त्याची लक्षणे आणि उपाय


इक्झिमा किंवा डरमीटीटीस म्हणजे त्वचेसंबंधी होणारे विकार ज्यात त्वचेवर सूज येण्याची लक्षणे दिसून येतात. यातील सर्वात सामान्य प्रकार आहे तो म्हणजे अॅटोपिक डरमीटीटीस .

अॅटोपिक डरमीटीटीस हा स्पर्शाने पसरणारा नसून सामान्यतः लहान मुलांमध्ये आणि बाळांमध्ये हा दिसून येतो. लहान मुले जशी जशी मोठी होतात तसा हा विकार पूर्णतः निघून जातो किंवा समस्या अजून गंभीर होऊ शकते. जर हा विकार गंभीर झाला तर प्रौढावस्थेत देखील हा विकार तसाच राहतो.

 या समस्येचे मूळ असे नेमके कारण अजून कोणाला माहित नसले तरी अनुवांशिक आणि कधी कधी पर्यावरणीय बदलांमधून हा विकार जडतो.

या विकारातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे खाज येणे. खाजेसोबत अजूनही अनेक लक्षणे यात दिसून येतात . ती आपण पाहू.

अॅटोपिक डरमीटीटीसची सामान्य लक्षणे.

अॅटोपिक डरमीटीटीस सामान्यतः गालावर, पायांवर किंवा किंवा हातावर आढळून येतो परंतु इतर ठिकाणी देखील तो होऊ शकतो. खाजवल्यामुळे किंवा त्वचा घासली गेल्यामुळे त्वचेचा ह्रास होऊन त्वचा काळी पडते. याची काही प्राथमिक लक्षणे म्हणजे कोरडी त्वचा, लालसरपणा, कानामागे भेगा, खूप खाज येणे, गालावर, हातांवर किंवा पायांवर रॅश येणे. त्वचेच्या उघड्या भागावर सूज येणे, भेगा पडणे इ.

या लक्षणांवर योग्य वेळी उपचार न घेतल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते. वातावरणातील बदल या त्वचेवरील विकारास अजून गंभीर करू शकतात. या विकाराची गांभीर्यता लक्षात घेतल्यास आपल्याला प्रथमतः या त्वचारोगास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची माहिती करून गरजेचे आहे.

१. कोरडी त्वचा.

कोरडी त्वचा लगेच उलते, त्वचेचे पापुद्रे निघतात आणि त्वचा कोरडी असल्यामुळे घट्टपणा येतो. त्वचेत मऊपणा राहत नाही. हा त्वचेतला ओलावा कमी झाल्यास अॅटोपिक डरमीटीटीसची समस्या अजून बिघडू शकते.

२. थंड आणि गरम तापमान.

उन्हाळ्यात घाम येतो, शरीराची उष्णता वाढते, गरम वातावरणात त्वचेवर घामोळ्या येतात. याउलट थंडीत त्वचा उलते, कोरडी पडते आणि यामुळे खाज येते.

३. तणाव.

जर तुमच्यावर कोणत्या गोष्टीचा तणाव असेल तर त्वचेसंबंधी असणाऱ्या समस्या अजून गंभीर होऊ शकतात.

४. इन्फेक्शन .

वातावरणातील बॅक्टेरियाशी संपर्क येणे, विषाणू तसेच स्ताफ किंवा हर्पिस यासारखी बुरशी अॅटोपिक डरमीटीटीसची लक्षणे अजून ठळक करू शकतात.

५. अ‍ॅलर्जी.

काही सामान्य अॅलेर्जी, जसे की धूळ, प्रदूषण, हवेतील सूक्ष्म घटक यांमुळे त्वचेच्या बाहेरील संवेदनशील आवरणात बदल घडून या विकाराची समस्या वाढते.

६. संप्रेरकीय बदल.

अनेकदा शरीरात असणाऱ्या संप्रेरकीय बदलांचा परिणाम म्हणून तुमची त्वचा , खास करून स्त्रियांमध्ये , खराब होऊ शकते.

७. सौंदर्य उत्पादने.

काही बाजारात मिळणारी त्वचेवर लावण्याची उत्पादने जसे की, साबण, फेसवाॅश, हॅन्ड सॅनिटायजर यामुळेही अॅलेर्जीचा धोका असतो. यामुळे त्वचेची जळजळ होणे, खाज येणे अशी लक्षणे दिसून येतात.

या काही कारणांमुळे अॅटोपिक डरमीटीटीस अजून गंभीर होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही वेळीच उपाय करून वरील घटकांमुळे त्वचेवर परिमाण होऊ देण्याचे टाळू शकता.

इथे आम्ही काही घरगुती उपाय दिले आहेत ज्यामुळे तुम्हाला अॅटोपिक डरमीटीटीसच्या लक्षणांचा प्रभाव कमी करण्यास मदत होईल.

१. त्वचेची रोज निगा राखा.

त्वचा निरोगी राहणे हे अत्यंत महत्वाचे आहे. रोजच्या दिनक्रमात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वेळ द्यायलाच हवा. ज्यांना अॅटोपिक डरमीटीटीसची समस्या आहे त्यांनी तर रोज त्वचेची काळजी घेण्याचे महत्व अजूनच वाढते.

रोज कोमट पाण्याने अंघोळ करा. पाणी खूप गरम नसेल याची दक्षता घ्या. अंघोळीनंतर स्वच्छ टॉवेलने त्वचा व्यवस्थित कोरडी करून त्वचेवर माॅईश्चराईजर लावा. तुम्हाला डॉक्टरांनी दिलेले माॅईश्चराईजर किंवा तुमच्या त्वचेला चालणारे तुमच्या आवडीचे माॅईश्चराईजर तुम्ही वापरू शकता. नैसर्गिक माॅईश्चराईजर म्हणून तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता.

२. तणावाचे नियोजन.

वरती सांगितल्याप्रमाणे तणाव हा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम करू शकतो. तणावाचे योग्य नियोजन आणि काळजी घेणे गरजेचे आहे. तणाव असेल तर त्वचेला तेज राहत नाही. यासाठी तुम्ही मेडिटेशन, योग आणि व्यायाम करू शकता. तवाच तजेलदार दिसावी यासाठी तुम्ही आतून फ्रेश असणे महत्वाचे. तणावाचे नियोजन अॅटोपिक डरमीटीटीसच्या विकारावर खूप उपयोगी ठरते.

३. सैल कपडे घाला.

तंग कपडे त्वचेला नुकसान पोहचवू शकतात. त्वचेवर घाम येतो, जंतू बसतात म्हणून सैल आणि काॅटनचे कपडे घालणे कधीही चांगले. पाॅलिस्टर किंवा लोकरीचे कपडे घातल्याने त्वचेवर खाज येते.

४. लॅवेंडर इसेन्शियल ओईल वापरा.

अपूर्ण झोप हे अॅटोपिक डरमीटीटीसचे महत्वाचे कारण आहे. झोप पूर्ण न झाल्यास मन शांत राहत नाही, यातून अस्वस्थता येणे, नैराश्य येणे किंवा वैतागणे अशा गोष्टी घडतात. या सर्व मानसिक अस्थिरता अॅटोपिक डरमीटीटीसला बिघडवू शकतात. लॅवेंडर इसेन्शियल ओईल तुमची झोप सुधारण्यास मदत करेल. मानसिक आरोग्य चांगले राहील. याच्या सुवासामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

तुमच्या त्वचेला साजेश्या तेलात जसे की नारळाचे किंवा बदामाचे तेल घेऊन त्यात ४ थेंब लावेणार इसेन्शिअल ओईल टाकून तुम्ही त्वचेला मालिश करू शकता. याने कोरडी आणि खाजवणारी त्वचा शांत होते.

या उपायांशिवाय जर त्वचेवर पूटकुळे नसतील तर थंड पाण्यात कापड घालून तुम्ही खाज येणाऱ्या भागावर लावू शकता.

अॅटोपिक डरमीटीटीसची समस्या असल्यास त्वचेची काळजी हा सर्वात महत्वाची आणि प्राथमिक उपाय आहे. दररोज त्वचा स्वच्छ ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेणे व दिलेली क्रीम अथवा लोशन नियमित वापरणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

घरगुती उपाय प्रभावकारक असले तरीही ते काही वेळ घेऊ शकतात. आहारात योग्य तो बदल तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. या विकाराचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही नियमित प्रयत्न करणे गरजेचे ठरते.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon