Link copied!
Sign in / Sign up
94
Shares

तूप खायला हवे ह्या कारणांसाठी. . .

 तुपामुळे वजन वाढते हा समज चुकीचा आहार शुद्ध, साजूक गाईच्या तुपामुळे आरोग्यविषयक अनेक फायदे होतात ते कोणते ते आपण पाहणार आहोत.

आरोग्यविषयक फायदे 

१. तुपाचे आहारातील सेवन हे बुद्धिवर्धक असते. तसेच तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात.त्याचा आरोग्यस फायदा होतो.

२. तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे वात आणि पित्त याचा त्रास होत नाही. तसेच उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं. व पचनक्रिया चांगली राहते त्याचबरोबर गॅसेसचा त्रास कमी होतो.

३. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.

४. डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखणाऱ्या कपाळाच्या भागावर हलकेच मालीश करावे. तुपाचे सेवन डोळ्यांवर पडणारा ताण कमी करण्यास मदत करते.त्यामुळे दृष्टि चांगली होते

५. तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.

६. कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे.

७. (शतधौत घृत म्हणजेच शंभर वेळा धुतलेले तूप त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात अत्यंत गुणकारी असते.

८. शुद्ध तुपामुळे चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं. चमकदार होतो.

सेवनानुसार होणारे फायदे

१. बद्धकोष्ठ असणाऱ्यांनी रात्री झोपताना कोमट दुधातून किंवा पाण्यातून तूप घेतल्यास सकाळी फायदा होतो

२. सकाळी व रात्रीच्या रोजच्या जेवणात २ छोटे चमचे भरून तूप घ्यावे.

३. सणावारांना भाताच्या विविध प्रकारावर तूप घेतल्यास जड पदार्थ पचायला मदत होते.

४. मुलांना अधूनमधून तूप-भात, तूप  मेतकूट भात द्यावा. त्यामुळे मुलांचे पोटात स्निग्धता राहते. 

विशिष्ठ आजार असलेल्या व्यक्तींनी तसेच गरोदर स्त्रियांनी तूप खाण्यास सुरुवात करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोणत्याही पदार्थाचे अति सेवन हे हानीकारकच त्यामुळे तूप गुणकारी असले तरी दररोज थोडे अश्या स्वरूपात खावे. एकाच दिवशी खुप खाणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. तसेच तूप योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा हृदयाला फायदा जरी होत असला तरी हृदयरोगी व्यक्तींनी आपल्यासाठी ते प्रमाण काय असावे हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा आवश्य घ्यावा

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon