Link copied!
Sign in / Sign up
84
Shares

तुम्ही रागीट पालक आहात का ?

कोणत्याही प्रकारचा हिंसकपणा भीतीदायक असतो आणि कोणाही व्यक्तीसोबत याबाबत चर्चा करणे अवघड असते; कारण हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. आणि जर तुम्ही स्वतःच हिंसक असाल; तर मग ते आणखी कठीण होऊन जाते. खरेतर जगातील प्रत्येक पालक हिंसेच्या विरुद्धच असतो. पण काही पालकांना लक्षात येत नाही की, ते हिंसक बनत चालले आहेत. तसेच जगातील सर्वांत कठीण गोष्टींपैकी एक म्हणजे आपण आपल्या मुलांबाबत हिंसक बनत चालले आहोत; हे कळून चुकणे!

बालकांबाबतची हिंसा लैंगिकच असेल असे नाही; तर ती शारीरिक हिंसेचेही रूप घेऊ शकते. जसे की- तुमच्या बालकाला मारहाण करणे वा त्यापेक्षाही भयंकर म्हणजे भावनिक हिंसा! जरी शारीरिक हिंसा लगेचच ओळखता येते; भावनिक हिंसा आणि आबाळ हे बळी ठरलेल्या बालकाचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. ते बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव टाकतात.

आज आम्ही तुमच्यामध्ये काही हिंसक प्रवृत्ती दडलेल्या आहेत का, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही मार्ग सुचवणार आहोत. तसेच जर या प्रवृत्ती तुमच्यामध्ये असतील; तर आम्ही तुम्हाला त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मदतदेखील करणार आहोत. या सर्वांतून तुम्ही तुमचा राग कसा नियंत्रित करायचा आणि तुमच्या मुलांसोबत हसत खेळत कसे राहायचे; हे शिकून घ्याल. जर तुम्ही एकटेच तुमच्या मुलांवर जास्त भडकत असाल; असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकत आहात! तुमच्या सारखेच लाखो पालक जगभरात आहेत आणि त्यांच्या वागणुकीबद्दल तेदेखील असेच चिंतित आहेत.

तुम्ही हिंसक पालक आहात हे कसे ओळखाल?

 

१. हिंसा ही एका व्यसना सारखी असते

दुर्दैवाने हे खरे आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा ही एका व्यसनासारखी असते आणि ती टप्प्याटप्प्याने घडते. ती फक्त तुमच्या एखाद्या कठोर वर्तणूकीनंतर थांबणारी नाहीये. हे दीर्घ काळापर्यंत चालू राहते आणि पालक अजाणतेपणी हे करतच राहतात; जरी त्यांना याबाबत थांबायला सांगितले तरी!बहुतांशी वेळा असे प्रसंग जेव्हा कोणीच पाहायला अथवा जाणून घ्यायला नसते; अशा एकटेपणाच्या वेळी होतात. हे तुमच्या बालकाला हातांनी मारहाण करण्याइतके सामान्य असू शकते; आणि नंतर चप्पल, बेल्ट आणि यांसारख्या भयंकर वस्तूंनी मारहाण करण्याइतक्या खालच्या थराला जाऊ शकते.

२.  तुमचे मूल तुम्हाला घाबरायला लागते.

जरी तुम्ही तुमच्या बालकांसोबत फक्त टीव्ही बघत बसला असला; तरी त्याला तुमच्या सोबत असुरक्षितता वाटू लागेल. त्यांना तुमच्या सहवासामध्ये भीती वाटू लागेल आणि ते स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्यापासून दूर राहू लागतील.

३.  तुम्ही कधीही जबाबदारी घेत नसाल

जबाबदारी घेणे ही तुम्हाला अशक्यप्राय गोष्ट वाटू लागते. जे लोक हिंसक असतात; ते त्याच्या कृतींची जबाबदारी घ्यायला खूप वेळा कचरतात. ते सामान्यतः म्हणतात, "माझा संयम ढळला" किंवा "ओह, हा माझा हेतू नव्हता" किंवा "मी काय करतोय याची मला जाणीव नव्हती."

४. तुम्ही एकांत असलेल्या जागा निवडता

ज्या लोकांमध्ये हिंसक प्रवृत्ती असतात; त्यांचा छुप्या किंवा जिथे गुप्तता आहे आणि जिथून कोणी सुटून जाऊ शकत नाही, अशा जागी कृती करण्याकडे कल असतो. अशा व्यक्तीला तेथे वाटू लागते की, त्याचे या बालकावर जास्त नियंत्रण आहे आणि कोणत्याही प्रकारची हिंसा करण्याला तेथे वाव मिळतो.

५. बहुतेक हिंसक लोकांसोबत हिंसा झालेली असते

प्रत्येकाला हे सत्य माहीत आहे की, जे लोक हिंसक असतात; त्यांच्या सोबत कधी ना कधी हिंसा झालेली असतेच! जर तुमच्या सोबत अहिंसा झालेली असेल, तर तुम्हाला हिंसा आणि शोषण कशाप्रकारे लादली जाते; हे कळून येईल. अशा प्रकारची हिंसक प्रवृत्ती पुढच्या पिढीवर लादायची आहे का, हे ठरवायचा निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.

तुमचा हिंसक स्वभाव कसा सुधारावा?

१. प्रामाणिक राहा

तुम्हाला तुमच्या बाळाला जास्त खोलात न जाता सर्व काही सांगण्याची गरज आहे; कारण हे सर्व त्यांच्यासाठी अधिक धक्कादायक असू शकते. पण त्यांना हे कळू द्या की, यामध्ये त्यांची काहीच चूक नाहीये आणि दोष तुमचा आहे. तसेच ते तुमची दुनिया आहेत आणि तुमच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालक म्हणून तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात, हे त्यांना पटवून द्या.

२. बाहेर पडा

डॉ. फिल्, एक प्रसिद्ध थेरपिस्ट, म्हणतात की, "जेव्हा तुम्ही एका तणावग्रस्त परिस्थिती मध्ये असता आणि तुम्ही स्वतः भडकणार आहे असे वाटत असेल; तर बाहेर पडा. अशावेळी म्हणा, 'मी या परिस्थितीतून बाहेर पडत आहे, म्हणजे माझा संयम ढासळणार नाही.' तुम्ही तुमच्या बालकांना त्यांच्या रुममध्ये टीव्ही पाहण्यासाठी व पुस्तक वाचण्यासाठी पाठवू शकता किंवा शक्य ते करू शकता; म्हणजे तुम्हाला थोडा एकांत मिळेल. किंवा तुम्ही स्वतः ती रूम सोडु शकता. फिरण्यासाठी जा, शॉवर घ्या- फक्त तेथून बाहेर पडा!

३. स्वतःला अहिंसकपणे व्यक्त करा

जेव्हा लोकांना भावना कशा व्यक्त कराव्यात, हे कसे कळत नाही; तेव्हा ते शारीरिक हिंसेचा मार्ग पत्करतात. विशेषतः मुले बंडखोर प्रवृत्तीची असताना पालकांना बालकांसोबत वागताना विविध अहिंसक मार्ग वापरायची गरज आहे.

४. मदत घ्या

तुम्ही एकटे स्वत:हून मुले सांभाळू शकत नाही आणि तुम्हाला त्यांचे संगोपन करताना नेहमीच कुणाची तरी मदत लागते. कोणताही मनुष्य जन्मत:च पालक नसतो; म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांकडून मदतीची याचना करणे योग्यच आहे: मग ती व्यक्ती तुमची आई, मित्र, सहकारी किंवा तुमचा/तुमची जोडीदारही असू शकते.

बालशोषण हा एक फौजदारी गुन्हा आहे आणि यामुळे तुमच्या मुलांना धक्का बसण्याची शक्यता भरपूर असते. ज्या प्रकारे आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी या मिळवण्यासाठी अवघड असतात, पण असाध्य नसतात; तसेच तुमचे मूल योग्य प्रकारे वाढवणे हेही अवघड आहे; पण असाध्य नक्कीच नाही!.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon