Link copied!
Sign in / Sign up
23
Shares

तुम्ही पण या विनोदी कारणांमुळे आपल्या जोडीदाराशी भांडता का ?

आपण आपल्या जोडीदारावर नितांत प्रेम करतो पण म्हणून आपण त्यांच्या क्षुल्लक गोष्टींवर सतत बडबड करणे थांबवत नाही. लग्न देखील याला अपवाद नाही. एकदा तुम्ही एकत्र राहिला लागलात की, तुमच्या लक्षात येते जरी आपण त्यांच्यावर प्रेम करतो तरी त्यांच्या सगळ्याच गोष्टी परिपूर्ण नाहीत. आपण त्यांच्या शुल्लक गोष्टी मनात ठेवतो. जोडप्यांमध्ये भांडणे होणे अगदी स्वाभाविक आहे. पण ते दर वेळी तेवढे मोठे किंवा वाईटच असायला हवे असे नाही. भांडणानंतर दोघे परिणामांना कसे सामोरे जातात यावर अवलंबून असते. त्यातून जर का चांगला धडा घेतला आणि एकमेकांबद्दल अभिमान बाळगला तर दोघे अजून जवळ येऊ शकता आणि एकमेकांबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. जोडपी खरंच काही हास्यास्पद गोष्टींवर भांडतात आणि ते खरंच खूप मजेशीर असते. शेवटी आपण भांडतो तरी कोणाशी जे आपल्या सगळ्यात जवळचे आहेत त्यांच्याशीच ना.

खाली काही हास्यास्पद गोष्टी आहेत ज्यावर जोडपी भांडतात.

१. टीव्ही वर काय बघायचे 

तुमच्यात बऱ्याच गोष्टी सारख्या असतील पण म्हणून टिव्हीवरली मालिका किंवा चित्रपटांची आवड सारखी असेलच असे नाही. तुम्हाला जे आवडते ते कदाचित तुमच्या जोडीदाराच्या पचनी पडणे कठीण जाऊ शकते. स्त्रियांनो (बायांनो) तुम्हाला ज्या मसालेदार चटपटीत मालिका बघायला आवडतात त्यात तुमच्या पतीला रस असेल असे नाही. त्यांना कदाचित खेळ किंवा हाणामारीचे चित्रपट बघायला जास्ती आवडत असतील. मग यावर सतत भांडणे की, कोण काय बघणार आणि सारखे चॅनेल बदलण्यापेक्षा यावर तोडगा म्हणजे तडजोड करणे. आपापल्या वेळा निश्चित करून घ्या म्हणजे दोघांना आवडणारे कार्यक्रम बघता येतील. जोडीदाराच्या आवडीचा चित्रपट बघताना कदाचित तुमची देखील आवड त्यात निर्माण होऊ शकते, तसे झाले की, तुम्ही दोघे एकत्र छान त्याचा आनंद घेऊ शकाल. दोघांकडून थोडी तडजोड तुमचे नाते खूप दीर्घकाळ टिकवू शकते. कोणाला नाही वाटणार दिवसभराच्या कामाचा सगळ्या क्षीण आपल्या जोडीदार सोबत बसून छान टीव्ही बघत घालवावा?

काय खावे 

 प्रत्येकाच्या चवी या वेगवेगळ्या असतात आणि जेवण ही एक अशी गोष्ट आहे की, त्यात कोणालाच तडजोड करायला आवडत नाही! शेवटी, आपल्या सगळ्यांच्याच काही आवडी निवडी असतात आणि एखादा पदार्थ कसा असायला हवा यावर मते ठाम असतात. पण तीच मते आपण आपल्या जोडीदारावर लादली की, त्यांना आवडत नाहीत. यातून होणारे वाद / भांडणे जर का तुम्हाला नको असतील तर तुम्हाला थोडी तडजोड ही करायलाच लागते. तुम्हाला बाहेर गेल्यावर अगदी पिझ्झाच खायचा असेल पण तुमच्या जोडीदाराला एखाद्यावेळी चायनीज खावसे वाटत असेल आणि त्याने तो खुश होणार असेल तर कधीतरी चायनीजला हो म्हणायला हरकत नाही.

सुट्टीचे नियोजन 

 सुट्ट्या म्हटले की आपल्यात नवचैतन्य येते यामुळे आपला ताण कमी होतो आणि आपल्या जोडीदारासोबत आपल्याला छान मोकळा वेळ घालवता येतो. कधी कधी याचा उलट परिणाम देखील होतो. सुट्ट्यांचे नियोजन करणे वाटते तेवढे सोप्पे नक्कीच नाही. जोडपी कुठे फिरायला जायचं इथ पासून ते कोणतं हॉटेल बुक करायचे,ट्रीपला गेल्यावर काय बघायचे या गोष्टींवर सुद्धा भांडतात. तिकडून परत आल्यावर तुम्हाला दुसऱ्या सुट्टीची गरज भासायला लागते.

एकमेकांना कुरवाळणे किंवा नाही

 ही खरंच खूप अवघड बाब आहे. काही लोकांना आपल्या जोडीदाराला कुरवाळायला आवडते आणि ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत असते. याचा अर्थ असा नाही की, तुमच्या जोडीदाराला सुद्धा असेच वाटत असेल आणि हे त्याला आवडेलच. त्याला किंवा तिला कदाचित असे कुरवाळणे आवडत नसेल आणि सारखे असे केल्याने त्यांना गुदमरल्यासारखे वाटू शकते. ज्यांना असे कुरवाळणे आवडत नाही त्यांना कायम खूप जपून पाऊल टाकायला लागते, कारण त्यांना जोडीदाराच्या भावना दुखवायच्या नसतात. यावर सविस्तर बोलून थोडी तडजोड करून तोडगा काढा म्हणजे तुमच्या सुखी वैवाहिक आयुष्यात कोणताच ताण येणार नाही.

बेडच्या मध्यभागी काल्पनिक रेषा 

 तुम्ही विश्वास ठेवा किंवा नाही, पण बरीच जोडपी झोपायच्या जागेवरून भांडतात! आपल्या बेडवरची सगळी जागा आपलीच आहे असा स्वार्थी विचार आता या पुढे तुम्हाला करण्याचे स्वातंत्र्य नाही आणि तुमचा जोडीदार सुद्धा हे तितक्याच प्रेमळ पणे समजून घेईल असे नाही. कोणालाच अगदी तोकड्या जागेत रात्रभर एकाच कुशीवर झोपायला आणि त्यातही जोडीदाराचे घोरणे सुद्धा सहन करायचे असे आवडत नाही. त्यामुळे शांत झोपेसाठी आधीच नीट जागा ठरवा!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon