Link copied!
Sign in / Sign up
61
Shares

तुम्ही खात असलेल्या पदार्थांची चव पोटातल्या बाळाला कळते का?


गरोदरपणा हा एक अद्भुत अनुभव आहे. ज्या क्षणी गर्भधारणा होते त्याच वेळी तुम्ही आई बनता. लवकरच तुमचे बाळ तुमच्या गर्भात वाढू लागते आणि हा सुंदर अनुभव फक्त एक आईच जाणू शकते. या काळात बाळाला संरक्षण आणि काळजीची गरज असते म्हणून तुमचे शरीर अनेक बदलांमधून जाते.

जसे जसे बाळ गर्भात वाढू लागते तसा गर्भाशायचा आकार देखील वाढतो. तुमचे पोट मोठे दिसू लागते. शरीरात जास्त रक्त तयार होते आणि सर्व सांधे वजन पेलण्यासाठी तयार होऊ लागतात. बाळासाठी आईचे शरीर म्हणजे त्याचे अन्न आणि सुरक्षा देणारे आरामदायी घरच असते.

जसे जसे गर्भधारणेचे दिवस जातील तसा तुमच्या बाळाचा विकास होत जाईल. त्याची इंद्रिये विकसित होत असतात आणि आई जे काही खाते त्याची चव बाळाला कळते. हो ! तुम्ही खात असलेल्या तुमच्या आवडीच्या सगळ्या डिशेस बाळसुद्धा चाखत असते.

यातून आई आणि बाळामध्ये एक अतूट नाते निर्माण होते. कदाचित हे जरा ऐकायला विचित्र वाटेल पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की बाळाला गर्भात कोणती चव लागत असेल? बाळाला तुम्ही खाल्लेल्या सगळ्याच पदार्थांची चव लागते का ? किंवा गरोदरपणात खाल्लेल्या पदार्थांचा भविष्यात बाळाच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर काही परिणाम होतो का?

बाळ जन्माआधी चव चाखू शकते का?

हो. बाळ जन्माआधी आईने खाल्लेल्या पदार्थांच्या चवीचा आस्वाद घेऊ शकते. बाळाला अन्नपदार्थांची चव कळणे १४ ते १६ आठवड्यांच्या कालावधीत सुरु होते. याच काळात त्याच्या चवीच्या ग्रंथी (टेस्ट बड्स) विकसित होत असतात.

१-८ आठवडे.

मेंदूच्या पेशी मेंदूपासून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू लागतात. यात बाळाच्या तोंडाचा देखील समावेश होतो.

८ आठवडे 

टेस्ट बड्सची रचना बाळाच्या तोंडात तयार होऊ लागते. मेंदूच्या पेशी ज्या सुरवातीला बाळाच्या शरीरात पसरलेल्या असतात त्या टेस्ट बड्सच्या संपर्कात येतात. यांना जास्त करून गोड, खारट, आंबट आणि कडू

या चावी कळतात.

१४-१६ आठवडे.

बाळाच्या जिभेवर फ्लेवर होल्स तयार झालेली असतात. फ्लेवर होल्स बाळाच्या जीभेशी संपर्कात येणाऱ्या पदार्थांना टेस्ट बड्सपर्यंत पोहोचवतात. टेस्ट बड्सकडून चव मेंदूच्या पेशींपर्यंत जाते आणि बाळालाचव कळते.

गर्भाशयात बाळाला चव कशी लागते?

गर्भात असणारे द्रव म्हणजेच ’अम्नीओटीक फ्ल्युड’ बाळ गिळते. जसे जसे बाळ मोठे होते तसे ते या द्रवाला जास्त गिळू लागते. यातूनच बाळाला चव कळते. सात महिन्यांचे असताना तर दररोज बाळ गर्भातील जवळपास लिटरभर द्रव पीत असते.

गर्भात बाळाला कशाची चव लागते?

गर्भाशयातील पाण्याची चव आणि आई खात असलेल्या अन्नपदार्थांची चव यांचा खूप जवळचा संबंध आहे. जेंव्हा तुम्ही काही खाता तेंव्हा त्यातील पोषक द्रव्ये गर्भातील द्रवात मिसळतात.

अर्थातच तुमचे अन्नपचन आणि बाळाचे अन्नपचन वेगवेगळ्या पद्धतीने होते. आईने खाल्लेल्या अन्नाचे कण गर्भाशयातील द्रवात मिसळले जातात. जरी ही चव अगदी तुम्हाला लागते तशीच नसते तरीही बाळाला मीठ, तिखट, मसाले, लसूण अशा पदार्थांची चव लागते. खास करून गोड पदार्थ बाळाला लगेच कळतात. चव कळली तरीही बाळाला त्यात जास्त फरक करता येत नाही कारण बाळाला वास येत नाही. त्याचे नाक अजून तितकेसे विकसित झालेले नसते.

गर्भात बाळाला कळणारी चव त्याच्या आहाराच्या सवयींवर परिणाम करते का?

नैसर्गिकरीत्या बाळाला गोड पदार्थांची चव जास्त आवडत असते. बाळाला स्तनातील दुधाची चव आवडावी म्हणून निसर्गतः ही मांडणी असते. गर्भात बाळाला चवीतला फरक कळतो आणि त्यामुळे इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की बाळ चवीला प्राधान्य देते. विशिष्ट चव त्याला आवडू शकते. गर्भात त्याला गोड जास्त आवडते.

जन्मानंतर सुरवातीच्या ५-६ महिन्यासाठी आपण बाळाला खाऊ घालत नाही पण काही संशोधनात असे निष्पन्न झाले आहे की मातेने गरोदरपणात खाल्लेले पदार्थ पुढे जाऊन बाळाच्या आहार निवडीवर परिणाम करतात. जसे की, आईने गर्भारपणात गाजराचा ज्यूस जास्त पिला किंवा एखादा विशिष्ट पदार्थ जास्त खाल्ला तर शक्यता आहे की बाळाला देखील गाजर जास्त आवडतात. किंवा एखाद्या स्त्रीला गोड किंवा जंक फूड आवडत असेल तर बाळाला देखील मोठेपणी गोड पदार्थ आवडतात.

तेंव्हा, तुमच्या आहाराच्या निवडीवर या काळात लक्ष द्या.

गरोदरपणात काय खायला हवे?

लक्षात असू द्या की तुमचा आहार हा चौकस असायला हवा. फळे आणि भाजीपाला यांचा तुमच्या रोजच्या खाण्यात समावेश करा. एखादा पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून त्याचे अतिसेवन करणे देखील चुकीचे आहे.

तुमचे डाइट बदलत राहा आणि बाळाला वेगवेगळ्या चवींचा आस्वाद देत रहा. जास्त मीठ, जंक फूड, प्रोसेस फूड, आणि शरीरात उष्णता निर्माण करणारे अन्नपदार्थ यांपासून दूरच रहा. गोड पदार्थ कशासोबत मिसळून खाऊ नका. प्रत्येक पदार्थ चविष्ट असेल असे पहा, कारण बाळ पण आतमध्ये त्याची चव चाखणार आहे.! 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon