घरात गर्भवती महिला असली की, नेहमी आनंदाचे वातावरण असते. विशेषत: गर्भवती राहण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर तर हा आनंद खूप मौल्यवान आणि सुंदर असतो. गर्भधारणा हा काही खेळ नाही, तर निकोप बाळाच्या जन्मासाठी योग्य महिला असणे आवश्यक असते. हा पूर्ण नऊ महिन्याचा काळ खरोखरी खूप आव्हानात्मक असतो. हा आनंद प्रत्यक्ष आपल्या हातात येईपर्यंत खूप म्हणजे तब्बल नऊ महिन्यांची प्रतिक्षा करावी लागत असल्याने अत्यंत मौल्यवान आहे. पण जर एखाद्या दिवशी म्हणजे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर शेवटी काहीच झाले नाही तर? आज अशा काही महिलांचे अनुभव वाचू या ज्यांचे पोट दिसते गर्भवतींसारखे पण गर्भाशयात काहीच नसते.
एक जोडपे होते अनेक प्रयत्न केल्यानंतर त्यातील महिलेची पाळी चुकली, लगेच तिने घरगुती तपासणी करून एका किटच्या साह्याने गर्भवती असल्याची चाचणी केली. काय आश्चर्य तिच्या किटमध्ये दोन्ही गुलाबी रेषा पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र हा आनंद अगदी अल्पकाळाचा होता, गर्भवती असल्याचे समजता ती आजारी पडली. ती आजारी असल्याने तपासणी आणि उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांच्या सल्ल्याने जेव्हा तिने सोनोग्राफी केली, अर्थातच तिला देखील हे जाणून घ्यायचे होते की, तिचे बाळ नेमके काय करत आहे. सोनोग्राफी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला दु:खद बातमी दिली. ती ऐकून तिच्या मनावर खूप परिणाम झाला.

सोनोग्राफीच्या अहवालानुसार ती तिच्या गर्भाशयात कोणताही गर्भ वाढवत नव्हती तर गर्भाशयाच्या कर्करोगासारखी गाठ आतमध्ये विकसित होत होती. ती ज्या परिस्थितीमधून जात होती त्याला ‘मोलार गर्भ’, असे म्हणतात. वैद्यकीय भाषेत ही एक अवस्था असते ज्यात गर्भामध्ये विकसित होणारी उत्तकांची असामान्य वाढ होते. तिला स्वत:चा जीव वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. तुलनेने तिला वेळीच लक्षात आले अन्यथा तिच्या प्रजोत्पादनावर परिणाम होऊन मृत्यु देखील ओढावला जाऊ शकतो.
तर महिलांनो, तुम्हाला पहिल्यांदा गर्भवती असल्याची शंका आली
तर त्वरित चाचणी करा, डॉक्टरांकडे जा. सावधपणे प्रत्येकवेळी पाऊल उचला.