Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

तुम्हांला अचानक तुम्ही गरोदर असल्याचे कळते त्यावेळी काय कराल

बहुतेक प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याची आपल्या बाळाबाबत काही स्वप्न असतात. आणि त्यानुसार ते कुटूंबनियोजन करतात, त्यामुळे साधारणतः त्यामुळे साधारणतः मूळ कधी होईल याची प्रत्येक जोडप्याला कल्पना असते. काही लग्नानंतरच्या काहीच दिवसात गोड बातमी देतात तर काही आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्याची वाट पाहत असतात तर काही जण प्रयत्न करत असतात पण प्रयत्नांना यश येत नसते तर काही जण आई-बाबा होण्याची मानसिक तयारी करत असतात. पण कधी-कधी काही हिशोब चुकतात आणि काही नियोजन चुकते आणि अचानक आपण आई - बाबा होणार आहोत असे कळते.

‘अश्यावेळी अचानक आलेल्या पालकत्वामुळे गोंधळून जातात. त्यांना मुल हवं असतं पण त्याची मनाची तयारी झालेली नसते. ही परिस्थिती फार गोंधळात टाकणारी आणि आणि भावनिक असते अश्यावेळी काय करावे हे सुचत नसते. अश्या जोडप्यांसाठी काही मागर्दर्शक टिप्स आम्ही देणारा आहोत या टिप्स तुम्हांला या गोंधळातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील .

१. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला

पहिली पायरी आपल्या जोडीदाराबरोबर शांतपणे बसा आणि गरोदरपणाबाबत चर्चा करा. आणि या चर्चेला सुरवात करण्याआधी काही नियम स्वतःला घालून घ्या कोणी-कोणाला दोष देणार नाही. एकमेकांवर आवाज चढवून बोलणार नाही. कधी-कधी आपला जोडीदार अचानक आलेल्या जबाबदारीने काहीतरी जे बोलायचे नाही ते बोलण्याची शक्यता असते. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या. घडायची गोष्ट घडून गेली आहे आता पुढे काय करायचे कोणत्या डॉक्टरांकडे जायचे आर्थिक नियोजन कसे करायचे. जर नोकरी करत असाल तर त्याचे नियोजन कसे करायचे, घरातल्या कोणा मोठ्याचा सल्ला कसा घ्यायचा या गोष्टींवर चर्चा करा.

२. तुम्ही आई होण्यासाठी आत्ता खूप लहान आहात असे वाटत असेल तर

जर तुम्हाला वाटत असेल कि आई होण्यासाठी मी खूप लहान आहे असे वाटत असेल तर हे लक्षात असू द्या तरुण वयात मुल होणार हे तुमच्या आरोग्याच्या आणि होणाऱ्या बाळाच्या दृष्टीने चांगलंच आहे तसेच तुम्ही करते असताना तुमची मुले मार्गी लागतील

३. लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत

तुम्हांला जरी असे वाटत असेल आपण मानसिकरित्या तयार नाही आहोत तर तसे कधीच कोणी तयार होत नसते आणि जर तुम्हांला मुल हवे असेल आणि जर आर्थिंक दृष्ट्या तुम्ही तयार तर हे लक्षात ठेवा हुळू-हळू सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत. अश्यावेळी येणाऱ्या गोंडस बाळाचा विचार करा. तुमचे पती या गोष्टीला तयार आहेत ना त्यांचे म्हणणे काय हाये हे जाणून घ्या. शांतपणे बसून सगळ्या गोष्टींचे नियोजन करा.

४.चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

तुमच्या गरोदरपणाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुमचे आरोग्य त्यामुळे तुम्हांला त्या करता एका चांगल्या डॉक्टरांची आवश्यकता असणार आहे. ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक शंकेचे निरसन करून घेऊ शकाल तसेच तुम्हांला योग्य तो सल्ला मिळेल. साधारण घरापासून जवळ डॉक्टर असल्यास तुम्हांला प्रत्येकवेळी सल्ल्यासाठी आणि काही अचानक समस्या निर्माण झाली तर त्यांच्याकडे जात येईल

५. पोषक आहार घ्यायला सुरवात करा

आता तुमची राहण्याची-खाण्याच्या काही सवयींमध्ये बदल करून आरोग्यदायी जीवनशैली बनवणे गरजेचे असते. ‘पोषक आहार घेणे हलका डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करणे, या वर भर देणे आवश्यक असते.

महत्वाचे

जर तुम्हांला मुल नकोच असेल तर.

जर तुम्हांला आत्ता मुल नकोच असेल आणि हा निर्णय जर तुम्ही दोघांनी मिळून घेतला असेल आणि या निर्णयावर ठाम असला तर तुमची समस्या एका चांगल्या डॉक्टरांना सांगून त्याचे मत नक्कीच घ्या

तसचे जर तुमची आर्थिक परिस्थिती सध्या खूपच हलाखीची असेल किंवा तुम्हांला आत्ता मुलाची जबाबदारी घेणे शक्य नसेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढचा निर्णय घ्या.

मुल नकोच असेल स्वतः मनाने कोणत्याही प्रकारचे घरगुती उपाय करत बसू असले उपाय कदाचित जीवावर बेतू शकतात किंवा त्यामुळे भविष्यात गरोदर होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

तुमचे पहिले बाळ काहीच महिन्याचे आहे आणि तुम्ही परत गरोदर राहिला असाल आणि तुम्हांला दुसरे मुल हवे असेल तरी तुमचे शरीर आत्ता दुसऱ्या बाळासाठी तयार आहे का याची डॉक्टरकडून माहिती करून घ्या. किंवा दुसरे मुल नकोच असेल तर काय करावे याचा देखील सल्ला डॉक्टरांकडून घ्यावा स्वतःच्या मनाने कोणतेही उपाय करू नये.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon