Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

तुम्हाला जर का जुळे होणार असेल तर या सात गोष्टी माहित असणे आवश्यक आहे

जेव्हा तुम्हाला कळते की, तुम्हाला जुळं होणार आहे तेव्हा मनात एक अनामिक ओढ निर्माण होते. जुळं होणे तसे दुर्मिळ मानले जाते. हे खरोखर अदभूत आहे की, जेव्हा आपण एकाच बाळाची अपेक्षा करत असतो तेव्हा आपल्या कुटुंबात दोन छोट्या जीवांचे आगमन होते. आज बाजारात गर्भधारणेबद्दल असंख्य पुस्तके आहेत. जर का तुम्हाला जुळं असेल तर या विषयावर देखील तेवढीच पुस्तके उपलब्ध आहेत.

जुळं असणे हे सामान्य गर्भधारणेपेक्षा वेगळे असते. जर का तुम्हाला जुळं असेल तर अशा अनेक गोष्टी आहेत जे डॉक्टर तुम्हाला मुद्दाम सांगत नाहीत, पण या गोष्टी तुम्हाला इंटरनेटवर आणि त्या असंख्य पुस्तकातून सहज उपलब्ध होतात.

जर तुम्हाला जुळं असेल तर तुम्हाला या सात गोष्टी माहित असणे गरजेचे आहे :

१.  मोठा धोका किंवा जोखीम ?

हे सांगण्यामागचा उद्देश्य तुमच्या मनात भीती निर्माण करणे असा नाहीये तर सावध करण्याचा आहे. जुळं असले की, त्यात खरंच खूप जोखीम असते. जसे की, वेळेपूर्वी प्रसूती, प्रीक्लॅम्पसिया (गर्भावस्थेच्या शेवटच्या अवस्थेत होणारा रोग), गर्भधारणेतील मधुमेह, इ. म्हणूनच तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे.

२. नाळेची काळजी 

जर का तुम्हाला एकसारखे दिसणारे जुळे (आयडेंटिकल ट्विन्स) असतील तर ते दोघे एकाच नाळेने जोडलेले असतात, पण जर तसे नसेल तर मात्र त्यांची नाळ वेगवेगळी असते. काही प्रकरणात असे देखील होऊ शकते की, एक बाळ नाळेच्या छोट्या भागाने जोडला गेला आहे अशा वेळी गुंतागुंत होण्याची शक्यता जास्ती असते आणि तुम्हाला थोडी जास्ती काळजी घ्यावी लागते कारण दोन्ही बाळांना योग्य प्रमाणात सगळी जीवनसत्वे मिळायला हवीत.

३ वेळेपूर्वी प्रसूती 

ज्यांना जुळं होणार आहे त्यांच्या बाबतीत वेळेपूर्वी प्रसूती होणे हे अगदीच स्वाभाविक आहे. ही जरी सामान्य गोष्ट असली तरी डॉक्टर पुरेशी दक्षता घेतात जेणे करून ती बाळं जन्माला आल्या नंतर त्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये.

४. सतत डॉक्टरांच्या भेटी 

इतर गर्भवती स्त्रियांच्या तुलनेत डॉक्टर तुम्हाला तपासणीसाठी सारखे का बोलावतात याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण या मागचे कारण अगदी उघड आहे, तुमच्या पोटात एकाच वेळी दोन बाळं आहेत. यामुळे कदाचित तुमची थोडी चीड चीड होईल पण हे तुमच्या आणि बाळांच्या तब्येतीसाठीच आहे हे लक्षात ठेवा.

५.  पोट खूप लवकर दिसू लागते 

बऱ्याच गर्भवतींचे पोट अगदी तिसऱ्या महिन्यातही दिसत नाही, त्यामुळे त्या गर्भवती आहेत की, नाही कळत देखील नाही. पण जर का तुम्हाला जुळं होणार असेल तर मात्र तुमचं पोट खूप लवकर वाढायला आणि दिसायला लागते. पर्यायाने गर्भारपणात लागणाऱ्या कपड्यांची तजवीज थोडी आधीच करावी लागते.

६. एकदम खाण्यापेक्षा थोड्या वेळाने थोडे खावे 

 सकाळी उठून पहिल्यांदा नाष्टा, मग दुपारचे जेवण आणि मग रात्रीचे जेवण ही जुनी संकल्पना विसरा, आता तुम्हाला फक्त या २ किंवा ३ वेळच्या खाण्यावर अवलंबून राहून चालणार नाही. तुम्हाला आता तिघांसाठी खायला लागणार आहे त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे सारखे पौष्टिक काही तरी खाणे गरजेचे आहे ज्यामुळे तुमची आणि पर्यायाने बाळांची भूक भागेल व तुम्हा तिघांना योग्य पोषक तत्वे मिळतील.

७. मिश्र भावना 

बहुतेक सगळ्याच गर्भवती स्त्रियांच्या भावना सारख्याच वर खाली होत असतात, त्यात जर का तुम्हाला जुळं होणार असेल तर या भावना अजूनच तीव्र होत जातात. जुळं असतानाची गर्भधारणा कायमच अत्यंत अस्वस्थ करणारी असते आणि यामुळे तुमच्या मनात सकारत्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारच जास्ती येतात. अशा वेळी लगेच कोणाची तरी मदत घ्या आणि आपले मानसिक तसेच शाररिक स्वास्थ्य नीट जपा.

हे सगळे तुमची काळजी किंवा भीती वाढावी म्हणून नाही तर तुम्ही स्वतःची आणि येणाऱ्या बाळांची नीट काळजी घ्यावी म्हणून आहे. सुरक्षित राहा आणि त्या बाळांचे या जगात छान स्वागत करा!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon