Link copied!
Sign in / Sign up
145
Shares

तुम्हाला गरोदर व्हायचंय ना ! तर ह्या गोष्टी करा


जेव्हा संतती प्राप्तीसाठी विचार केला जातो. तेव्हा बऱ्याच जणींना असे वाटत असते की समागम केला की काम झाले. आता मी गरोदर राहणार ! पण तुम्हाला माहित आहे का की हे वाटते तितके सोप्पे नसते. तुम्हाला तुमच्या अंडचयन प्रक्रियेवर लक्ष ठेवावे लागते आणि त्यानुसार नियोजन करून पाउल उचलावे लागते.

तुम्हाला माहित आहे का की तणाव देखील तुमच्या होणाऱ्या बाळाच्या जीवासाठी धोकादायक असू शकतो आणि त्यामुळे तुमच्या गरोदर राहण्याच्या शक्यताही कमी होऊ शकतात.

पण काळजी करू नका मैत्रिणींनो, इथे गरोदर होण्यासाठी व १० उपाय दिले आहेत ते नक्कीच तुमच्या उपयोगात येतील. 

१) तुम्ही काय पिताय ह्याकडे लक्ष दया

एका संशोधनानुसार मद्यपान तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करते. शरीरातील एस्ट्रोजन नावान्या संप्रेरकाच्या पातळीवर याचा परिणाम होतो आणि त्यामुळे बीज रुजण्यात अडचणी येऊ शकतात. सोबतच कॉफी सेवन कमी करा जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुम्ही गरोदर राहण्याचा विचार करत असाल तर, कारण कॅफेन संप्रेराकांमध्ये मध्यस्ती करते आणि तुमचे गरोदर राहणे अवघड होऊ शकते.

२) आहार

जीवनसत्वे, पोषकद्रव्ये, जीवनसत्व सी, ई आणि डी यांचा आहारात पुरेपूर समावेश करून घ्या. लोह आणि झिंक यांचे शरीरात प्रमाण योग्य असायला हवे. या घटकांची कमतरता पाळीचे दिवस वाढवते म्हणजेच तुमचे मासिक चक्र जास्त दिवस चालते आणि अंडचयानाची प्रक्रिया कमी दिवस घडते. यामुळे तुमच्या प्रेग्नंट होण्याच्या संधी हुकतात आणि सोबतच अशाने गर्भपात होण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे आहार योग्य हवा.

३) जास्त जाड नाही आणि जास्त बारीक पण नाही

तुमचे वजन नियंत्रित असले की तुमचे मासिक चक्र योग्यरीतीने चालते.   तुमचे वजन तपासून घ्या. तुमचा BMI १९-२४ असला पाहिजे. यापेक्षा जास्त किंवा कमी असल्यास ते आरोग्यासाठी नकारात्मक ठरते.

यासाठी करावे लागणार बदल आत्मसात करा. थोडासा व्यायाम आणि योग्य आहार तुमची मदत करु शकतो.

तुमच्या गर्भाशयात असणाऱ्या शेल्म्याच्या पोतावरून तुम्हाला अनेक माहिती करू शकते. याचा पोत तुमच्या दोन मासिक चक्राच्या मध्ये बदलत असतो. जसे की हा शेल्मा पातळ असेल तर आतमध्ये अंडचयन प्रक्रिया चालू आहे आणि तुम्ही प्रजनन काळात आहात आणि हा कमी होतो जेंव्हा तुमची पाळी नुकतीच संपलेली असते.

अंडचयन प्रक्रिया संपली की हा शेल्मा जाडसर होतो.

५) पाणी प्या

तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवा. जेणेकरून शक्राणुला गर्भाशयात रुजण्यास मदत होईल. पाणी पिणे केंव्हाही चांगले. तुमची लघवी फिकट पिवळ्या रंगाची होत असेल तर हे एक चांगले चिन्ह आहे. भरपूर पाणी पिल्याने तुमची प्रजनन क्षमता वाढेल.

६) डेन्टिस्ट कडे जा

तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला हिरड्यांची समस्या असेल तर तुमच्या गर्भातील बाळ मुदतपूर्व जन्माला येऊ शकते आणि त्याचे वजन गरजेपेक्षा कमी देखील भरू शकते. तुमच्या तोंडाचे आरोग्य तुमच्या गरोदरपणाविषयी बरेच काही सांगू शकते. तेंव्हा तुमच्या बत्तीशीची काळजी घ्या !

७) तणावाचे नियोजन

जितका तणाव तुम्हला प्रेग्नंट होण्यासाठी असतो तितकाच आजूबाजूचे देखील तुम्हाला देत असतात. तणाव तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतो. मन शांत ठेवा. एखाद्या शांत ठिकाणी जा. मेडीटेशन करा. अक्यूपंचरद्वारे ताणाचे नियोजन ही तुम्ही करू शकता. तुमचे मन शांत आणि तणावमुक्त असले तर गरोदर राहणे सोपे जाईल.

८) ल्युब चा वापर करू नका

संभोगावेळी स्नेहन निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे ल्युब्रीकंट शुक्राणुला अंडाशयापर्यंत पोहोचण्याआधीच मारून टाकतात. तुमचे शरीर तुमच्यासाठी पुरेसे स्नेहन बनवत असते. त्यामुळे याचा वापर टाळा .

९) समागम 

तुमचे कामजीवन स्फुरत राहू दया. सेक्स जास्त प्रमाणात केल्यास तुमचे मन तणावमुक्त राहील आणि सोबतच वारंवारतेमुळे तुमच्या गरोदर राहण्याच्या संधी वाढतील.

१०) संभोग केल्यानंतर हे करू नका

संभोगादरम्यान किंवा नंतर घाम येणे ठीक आहे. पण लगेच त्यानंतर अंघोळ करू नका. संभोगानंतर गरम पाण्याने अंघोळ करणे किंवा पाळायला जाणे केल्यास तुमच्या शरीराचे तापमान वाढते. यामुळे तुम्हाला गरोदर राहणे अवघड होऊ शकते.  

 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon