Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

तुम्हाला अति भयानक स्वप्न पडत असतील तर...!

           तुम्ही शांतपणे झोप घेत आहात आणि अचानक रात्री तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडले की, तुमचा गर्भपात झाला आहे. तुमचे बाळ खाली पडून त्याला चांगलेच लागले आहे. किंवा डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले की, तुम्ही कधीच गरोदर होऊ शकत नाही. असे स्वप्न तुम्हाला पडली असतील किंवा पडू शकता. तेव्हा अशावेळी तुम्ही खूपच दरदरून घबरून जातात. आणि ह्याचाही तुम्ही बराच विचार करत असल्याने त्याचा गरोदर होण्यावर किंवा बाळाच्या संगोपनावर परिणाम होत असतो. तेव्हा ह्याविषयी जाणून घेऊ.  ज्यावेळी आपण झोपतो तेव्हा आपले संपूर्ण शरीर शांत असते. दुसऱ्या दिवसासाठी ते उर्जा तयार करत असते. पण त्याचवेळी आपला मेंदू मात्र सक्रीय असतो. दिवसभर झालेल्या घटनांची तो क्रमवार नोंदणी करत असतो. 

१) तज्ज्ञांच्या मतानुसार सतत वाईट स्वप्न पडण्यामागे अनेक कारणं असतात. उदाहरणार्थ एखादे गंभीर आजारपण, तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यानेही मेंदूत रसायनं निर्माण होतात. जी मेंदूला उद्दीपित करतात. तसेच उच्च रक्तदाब आणि भूतकाळातील अप्रिय घटनांमुळेही वाईट स्वप्न पडत असल्याचे तज्त्रांचे म्हणणे आहे.

२) अनेक शारीरिक व्याधींबरोबरच वाईट स्वप्न पडण्यामागे टेन्शन हे देखील एक कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबरोबरच योगा करणे, आवडीचा छंद जोपासणे गरजेचे आहे. तसेच बेडरुममधील वातावरणही नेहमी प्रसन्न ठेवावे. यामुळे हवेत प्रसन्नता निर्माण होऊन शांत झोप लागेल.

३) मोबाईल मधून येणाऱ्या किरणांचा सुद्धा काही प्रमाणात मेंदूवर दुष्परिणाम होतो. यामुळे शांत झोप लागत नाही. झोप येत नसल्याने व्यक्ती नको नको ते विचार करू लागते. त्यानंतर ते विषय स्वप्नांमध्ये विविध आकृत्यांच्या रुपात दिसू लागतात. मनावर दडपण येतं आणि झोपेतच रक्तदाब वाढतो. यामुळे झोपताना मोबाईल दूर ठेवावा.

४) मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. यामुळे झोपताना नेहमी चांगला व सकारात्मक विचार करा. दिवसभरात झालेल्या अप्रिय घटना मुळीच आठवू नका. त्यांच्या जागी उद्याचा दिवस कशाप्रकारे आनंदात जाईल याचा विचार करा. आवडता रंगाचा विचार करा. त्या रंगाच्या कपड्यात तुम्ही किती आकर्षक दिसू शकतात. याची कल्पना करा. मग बघा शांत झोप तर लागेलच पण दुसरा दिवसही आनंदात जाईल.

५) काहीजणांना अंथरुणात पडल्या पडल्या भयानक स्वप्न पडू लागतात. यामुळे अनेकजण रात्रभर जागे राहतात. पण असे करणे चुकीचे असून यामुळे अनेक व्याधी मागे लागू शकतात. अशावेळी एखाद्या तज्ज्ञांचा अथवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. मन मोकळं केल्याने तुमचा ताण कमी होतो. 

६) तुमच्या नवऱ्याशी ह्याविषयी मोकळेपणाने बोला. आणि तुमच्या बाळाला काहीच होणार नाही. असाच विचार करत राहा. आणि गरोदर नसल्याने स्त्रीनेही "आपण गरोदर होऊ असाच सकारात्मक विचार करा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon