Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

या प्रकारे तुम्ही प्रत्यक्ष किंवा नकळत स्वतःच्या किडनीला इजा पोहचवत असता...

अनेकदा आपल्या दैनंदिन जिवनातील  काही सवयी किंवा गोष्टी या प्रत्यक्ष किंवा नकळत पाने आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आणि या विषयक आपल्याला त्यावेळी काळात नाही आणि अचानक काही त्रास सुरु होतात. तसेच काही  सवयी आणि काही गोष्टी ज्या आपल्या  किडनीवर आणि किडनीच्या कार्यावर लगेच किंवा भविष्यात परिणाम करतात या गोष्टी आणि सवयी कोणत्या हे आपण जाणून घेणार आहोत 

१. प्रोटीनचे अतिरिक्त सेवन

 

 

निरोगी आरोग्यासाठी आहार प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते. परंतु ज्यावेळी तुमची किडनी म्हणजेच मूत्रपिंड योग्यप्रकारे काम करत नसेल किंवा किडनीविषयक काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या काळात जास्त प्रमाणात प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा प्रोटीन घेणे हे तुमच्या किडनीला इजा पोहचवू शकते. अश्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. किंवा कमी प्रमाणात प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

२. जास्त प्रमाणातील मिठाचे सेवन

 मिठाचे अतिरिक्त सेवन इतर वेळी देखील आरोग्यास घातक असते. जास्त प्रमाणातील मिठाचे सेवन हे रक्तदाब वाढवते सतत जर रक्तदाब वाढत राहिला तर त्यामुळेकिडनी निकामी होण्याची देखील शक्यता असते . तसेच जास्त मिठाच्या सेवनाने मुतखडा म्हणजेच किडनीस्टोन होण्याची देखील शक्यता असते आणि यामुळे लघवी करताना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

३. धूम्रपान

 

 धूम्रपानाने फक्त रक्तदाबच वाढतो असे नाही तर यामुळे टाईप २ चा मधुमेह होण्याची शक्यता असते. आणि ही किडनीविषयक (मूत्रपिंडविषयक ) आजार किंवा समस्या निर्माण होण्याची मुख्य कारणे आहेत.धूम्रपानाचे अनेक आरोग्यविषयक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे धूम्रपान केव्हाही टाळणे योग्यच

४. मद्यपान

 जी व्यक्ती आठवड्यात १४ पेक्षा जास्त ग्लास (१४ ड्रिंक्स ) घेते त्या व्यक्तीला सामान्य व्यक्तीपेक्षा किडनीविषयक आजार होण्याची शक्यता दुप्पट असते. तसेच जर एखादी व्यक्ती २ तासांत ४ किंवा पाच ग्लास मद्य रिचवत असेल तर अश्या व्यक्तीला व्यक्तीला भविष्यात किडनीविषयक मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची तीव्र शक्यता असते. कधी-कधी अश्या व्यक्तीला किडनी निकामी होणे अश्या समस्येला देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

५. सोडा किंवा सोडायुक्त पेयं

जर तुम्ही दिवसाला एक किंवा दोन डाएट सोडा किंवा सोडायुक्त पेयं असाल तर तुम्हांला भविष्यात नक्कीच किडनीविषयक आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता खूप जास्त असते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे किंवा रोज डाएट सोडा पिणाऱ्या महिलेच्या किडनी २० वर्षानंतर इतर महिलांच्या तुलनेत ३० टक्के कमी कार्यरत होती .

६. कमी पाणी पिणे /डिहाड्रेशन

किडनीला तिचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी शरीरात पाण्याची पातळी योग्य असणे अत्यंत गरजेचे असते. जर तुम्ही पुरेसे पाणी पीत नसाल तर किडनीला तिचे कार्य करण्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता असते. आणि हळू-हळू याचा परिणाम म्हणून किडनीविषयक समस्या निर्माण होतात. आपण योग्य प्रमाणात पाणी पीत आहोत कि नाही हे कसे ओळखाल.. तुम्हांला होणारी लघवी हि फिकट पिवळसर रंगाची असावी जर ती गडद पिवळ्या रंगाची असेल तर तुम्ही कमी पाणी पीत आहात असे समजावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पाण्याचे प्रमाण वाढवावे

७. वेदनाशामक औषधे (पेनकिलर)

जर तुम्ही कोणत्याही दुखण्यावर सतत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधें घेत असला तर त्याच परिणाम हळू-हळू किडनीवर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पेनकिलर औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते

८. अति व्यायाम

अति प्रमाणातील व्यायाम हा देखील किडनीवर परिणाम करू शकतो त्यामुळे व्यायाम करताना देखील अतिशयोक्ती करू नये तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रमाणात व्यायाम करावा. तसेच व्यायाम करताना पाणी देखील योग्य प्रमाण जर तुम्ही व्यायाम जास्त प्रमाणत करत असाल आणि तुमची लघवी जर गडद पिवळ्या रंगाची होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

९. बॉडीबिल्डिंग करत असताना घेण्यात येणारी औषधे (स्टिरॉइड )

 

बॉडीबिल्डिंग करताना अनेक लोकं स्टिरॉइड युक्त औषधांचा वापर करतात आणि हे स्टिरॉइड किडनीवर परिणाम करतात अनेक दिवस सतत स्टिरॉइड घेण्याने किडनी निकामी होण्याची शक्यता देखील असते

१०. ऍसिडीवरील औषधे

काही ऍसिडीवरील औषधे तुमची ऍसिडिटी तात्पुरती कमी करतात आणि त्याच परिणाम कायमचा किडनीवर होतो. त्यामुळे ही औषधें देखील सतत आणि डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेऊ नये . 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon