Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

तुमच्या परिवाराच्या आहारात या पोषकद्रव्याची कमतरता तर नाही ना ?

निरोगी राहण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पोषकद्रव्ये! आपण निरोगी आयुष्य जगण्याची सुरुवात योग्य आहाराने करू शकतो. तुम्ही आजकाल संतुलित आहाराविषयी पुष्कळदा ऐकले असेल; कारण सगळेच आता आरोग्याविषयी जागरूक झालेले दिसतात! आपण अनेकदा लोकांना वजन नियंत्रित करण्यासाठी व्यायाम करताना आणि योग्य आहार घेताना पाहतो.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला बहुतेकदा पौष्टिक आहार घ्यायचे जमत नाही.

आपल्या शरीराचे चयापचय इतके जलद असते की, पुष्कळदा आपली शक्ती संपते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटू लागते. आपण लगेचच खाण्याजोगे असणारे पदार्थ खातो आणि शक्ती मिळवतो; जी लगेचच संपून जाते आणि धावपळीच्या जीवनात अनेक पोषकद्रव्ये घ्यायचे राहून जाते; ज्याचा परिणाम आपल्या नंतरच्या आयुष्यावर होतो.

पोषकद्रव्यांबाबतची पाच महत्त्वाची आव्हाने; ज्यांचा तुम्ही दैनंदिन सामना करता:

जीवनसत्त्वांची आणि खनिजांची कमतरता ओळखता येत नाही आणि त्यांचे प्रमाण खूपच कमी झाले; तरच ते आपल्या नजरेत येते. म्हणून प्रत्येकाला आपल्या शरीराच्या पोषकद्रव्यांविषयीच्या गरजांबाबत जागरूक राहिले पाहिजे.

१. खनिजे

कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि झिंक ही अशी काही आवश्यक खनिजे आहेत; जी शरीराचे पोषण करतात. यापैकी कोणत्याही पोषकद्रव्यांच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रथम डोकेदुखी आणि थकव्याची भावना येते आणि नंतर त्याची निष्पत्ती ठिसूळ हाडे, रक्तक्षय, अनियमित हृदयाचे ठोके यांसारख्या गंभीर आजारांमध्ये होऊ शकते; ज्याचा परिणाम नंतर मृत्यूमध्ये होतो!

२. जीवनसत्त्वे

जीवनसत्त्वे ही शरीराचे नियंत्रण करण्यास आणि विविध क्रिया पार पाडण्यास मदत करतात. म्हणूनच दैनंदिन खनिजे आणि जीवनसत्त्वाचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आहारातील फळे आणि भाज्यांच्या कमतरतेमुळे शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण कमी होते. जीवनसत्त्वांच्या प्रमाणावर परिणाम करणारे बाकी घटक म्हणजे डायटिंग, मद्याचे सेवन, लठ्ठपणा- जो जीवनसत्त्वांच्या पातळीवर मोठा प्रभाव पाडतो.

३. प्रथिने

प्रथिने ही आपल्या शरीरातील शक्तीचे भांडार असतात. जेव्हा आपण थकलेले असतो; तेव्हा ते आपणास ऊर्जा प्रदान करतात. म्हणूनच जर दिवसाच्या शेवटी तुम्हाला अतिशय थकलेले, ऊर्जारहित वाटत असेल; तर तुमच्यामध्ये प्रथिनांची कमतरता असू शकते. सांधे आणि स्नायुंमधील तीव्र वेदना, रात्री झोपताना त्रास होणे- या सर्वांमुळे आपला तणाव वाढतो. एकदा आपण राखीव असलेली शक्ती खर्च केली की, मग आपल्याला अजून थकल्यासारखे वाटते. म्हणून प्रथिनांचे प्रमाण भरून काढण्यासाठी दूध, मांस आणि बाकी दुग्धजन्य पदार्थ खाणे गरजेचे आहे.

४. तंतुमय पदार्थ

तंतुमय पदार्थ हे तुमच्या शरीरासाठी विशेषतः पचनक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेचा अकार्यक्षमपणा, वजन अतिशय वाढणे, रक्तातील साखरेवर अनियंत्रितपणा आणि बाकी हृदयविषयक आजार होऊ शकतात. 

५. आयोडीन

थायरॉईड आणि हार्मोन्सचे योग्य प्रमाण राखण्यासाठी आयोडीन महत्त्वाची भूमिका बजावते. ते मेंदू आणि हाडांच्या विकासामध्ये मदत करते. ते चयापचय देखील नियंत्रित करते! आयोडीनची कमतरता ही सामान्यतः लहान मुलांमध्ये आढळते आणि त्याला 'गॉईटर' असे संबोधतात.

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon