Link copied!
Sign in / Sign up
196
Shares

तुमच्या न ऐकणाऱ्या मुलांशी कसे वागाल ?


पालकत्व निभावणे ही जगातील सर्वांत अवघड भूमिका आहे. आपले मूल एक चांगला माणूस बनविण्यासाठी खूप वेळ आणि श्रम, सहनशक्ती वाढविण्याचे काम असते. पण कधी कधी असे घडते की, मुले मनाने खूप कठीण होऊन जातात. दिसामासाने वाढताना त्यांच्यात शाररिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात आणि जर ते योग्यरित्या होत नसतील तर ते असभ्य आणि कोणाचाही अनादर करतात. असे विशेषत: तेव्हाच घडते जेव्हा एखाद्या परिस्थितीत त्यांना काही आवडलेले नसते किंवा एखादी घटनेत कसे वागायचे हे त्यांना कळत नसते.

बऱ्याचदा ते आपले लक्ष वेधून घेण्यासाठी आणि तुमच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी असे वागतात. तुम्ही मात्र नेहमी आपल्या मुलाच्या बाबतीत सकारात्मक राहिले पाहिजे तर तुमची मुले परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरी जाऊ शकतील. आज या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे असभ्य मुलांशी पालक म्हणून कसे वागाल याची कल्पना येईल.

१) त्यांची चूक शांतपणे सांगा 

जर तुमचे मूल चुकीच्या पध्दतीने वागत असेल तर त्याला त्याची जाणीव करून द्या. जर तुम्ही मुलांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष केले तर मात्र ते या वागण्याला तुमची मूक संमती मानतील. तथापि, पालक म्हणून तुम्ही योग्य प्रकारे त्याला त्याची चूक दर्शविणे आवश्यक आहे. मुलांना त्यांचे काय चूक आहे आणि त्याऐवजी काय करायला हवे हे सांगावे. तुम्ही अधिकृत असणे आवश्यक असते पण अनावश्यक कठोर नसावे.

२) त्यांना परिणाम सांगा

जर तुम्ही तुमच्या मुलाशी बोलुन देखील ते असभ्य वागत असतील तर त्यांना त्याच्या परिणांमांची ओळख करून द्या, आणि तरी ते असे वागण्यापासुन परावृत्त होत नसतील तर तुम्ही तसे परिणाम योग्य वेळी घडवून आणा, नाहीतर त्यांना त्यांच्या असभ्य वर्तनाचे गांभीर्य लक्षात येणार नाही. असभ्य वर्तवणूकीचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहेत हे त्यांना दर्शवत रहा.

३) योग्य शिस्त लावा

मुलांना शिस्त लावताना योग्य पध्दतीने लावावी. प्रत्येक चुकीसाठी शिक्षा हा एकमेव उपाय नसतो. मुलाच्या परिपक्वतेनुसार आणि त्याच्या चुकीनुसार शिक्षा करणे आवश्यक असते. मुलाचे वय आणि शिक्षेचे गांर्भिय लक्षात घेऊन त्याला शिक्षा द्यावी. शाररिक शिक्षा किंवा त्यांना वाळीत टाकणे अशा शिक्षा भविष्यात खूप धोक्याच्या ठरू शकतात. यामुळे ते तुमच्यापेक्षा जास्त दूर जाऊ शकतात. अशा शिक्षांमुळे मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. मुलांची कमकुवत मनावर, विकासावर, नवीन शिकण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो. शिक्षा नेहमी अशी असावी ज्यातून त्यांना धडा मिळेल, इतरांशी त्याविषयी बोलू शकतील, नकारात्मक विचारांतून मार्ग शोधतील.

४) मुलांनी काय करायला हवे हे त्यांना पटवून द्या

असभ्य वर्तणूक करणारी मुले पाहिली की, पालक मुलांना काय करू नये हे सांगण्यात प्रचंड उर्जा,शक्ती, वेळ घालवतात. याउलट पालकांनी त्यांना शिष्टाचार, सभ्य वर्तना बद्दल आणि कसे वागावे याविषयी सांगावे. खरं तर ही वर्तणुकीविषयी मुलांना अचूक माहिती न दिल्याने ते गोंधळून जातात.

५) उदाहरणे द्या पण तुलना करू नका 

मुलांना योग्य वर्तणुकीची माहिती मुलांना दिल्यास ते चांगले वर्तणुक करू शकतील. हे समजावून सांगताना त्यांना एखादे उदाहरण द्या आणि तुम्ही दिलेला दुसरा पर्याय कसा चांगला आहे हे पटवून द्या.

६) मुलांना समजून घेणे खूप महत्वाचे 

पालकत्वामधील सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे सकारात्मक राहा.नेहमी मुलांशी बोलताना जितके शक्य असेल तितके सकारात्मक पध्दतीने बोला.सकारात्मक वक्तव्याने मुलांच्या मनावर चांगला परिणाम होतो व त्यांना असे वाटते की, आपण त्यांना आदर देत आहोत आणि एखाद्या प्रौढ व्यक्तीसारखे वागवत आहोत. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
22%
Wow!
78%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon