Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

तुमच्या मुलाला झोपेत चालण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा.

 

मध्यरात्रीची वेळ आहे,तुम्ही अगदी गाढ झोपेत आहात आणि अचानक जाग येताच तुमचे मूल अगदी गोंधळलेल्या अवस्थेत झोपेत चालत असलेले पाहिले आहे?काय तुमचे मूल मध्यरात्री डोळे बंद असलेल्या अवस्थेत अचानक उठून बसते आणि तुम्ही,"काय झाले" असे विचारून हि काहीच उत्तर देत नाही? तर मग तुमच्या मुलाला झोपेशी संबंधित एका सामान्य समस्या - झोपेत चालणे, असू  शकते.  

"झोपेत चालणे" म्हणजे काय?

झोपेत चालणे म्हणजेच पूर्वी somnambulism या नावाने ओळखली जाणारी हि एक वर्तणूक समस्या आहे,ज्यात गाढ झोपेत चालणे आणि इतर गुंतागुंतीचे वागणे आढळते. प्रौढांमध्ये कमी प्रमाणात आढळणारी हि समस्या लहान मुलांमध्ये सामान्यपणे दिसून येते.

काय आहेत झोपेत चालण्यामागची कारणे:

मुलांच्या झोपेवर परिणाम करणारे आणि या समस्येला कारणीभूत असणारे अनेक घटक आहेत,जसे कि-

-थकवा /अपुरी झोप

-झोपेच्या सवयीत अनियमितता

-तणाव/अस्वस्थता

-झोपेचे नेहमीचे वातावरण बदलणे

-आजार/ताप

-काही औषधे

या घटकांशिवाय, अनुवांशिकतेचा हि यात बऱ्याच प्रमाणात सहभाग असतो.जसे कि,कुटुंबातील एखाद्याला हा आजार असणे.

काय आहेत झोपेत चालण्याची लक्षणे :

झोप लागल्यानंतर साधारणपणे झोपेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत चालण्याचा प्रकार दिसून येतो. झोपेत असतांना चालण्यासोबतच तुमच्या मुलांत इतर हि काही लक्षणे दिसून येतात. जसे कि:

-झोपेत बोलणे

-या बद्दल खूप कमी किंवा काहीच न आठवणे

-या अवस्थेत मुलाला जागे करणे अवघड असणे

-किंचाळणे

-मुलाचे झोपेत आक्रमक होणे

काय आहेत झोपेत चालण्यावर उपाय:

झोपेत चालण्याच्या समस्येचे पूर्णतः समाधान नसले तरीहि काही युक्ती आणि तंत्रांचा अवलंब करून तुम्ही हा त्रास वारंवार होणे कमी करू शकता. या युक्ती अशा आहेत:

- तुमच्या मुलास वेळेत झोपावा

- शाळेबद्दल किंवा इतर काही त्रास होतोय का या बाबत मुलासोबत बोला

-झोपण्याआधी हळुवार संगीत ऐकवा

- तुमचे मूल घेत असलेल्या औषधांच्या वाईट परिणाम बाबत माहित करून घ्या

-हा त्रास होत असताना मुलास हळुवारपणे अंथरुणात घेऊन जा

- स्वतःच्या या स्थितीची जाणीव होण्यासाठी मुलास जागे करण्याचा प्रयत्न करा

इतर आजारांना बरे करण्याचा आपण प्रयत्न करतो तसाच दृष्टिकोन या समस्येबद्दल हि ठेवा आणि कुठलाही किंतु ठेऊ नका . झोपेत चालण्याची हि समस्या कुठल्या हि मुलास किंवा प्रौढांनाही होऊ शकते.मुलाच्या सुरक्षेचे उपाय करणे आणि या समस्येची जाणीव त्यास करून देणे जास्त महत्वाचे आहे. झोपेत चालण्याची हि समस्या धोकादायक पातळीवर पोहचली असेल तर कोणताही विचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon