Link copied!
Sign in / Sign up
259
Shares

तुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व

 

खूप आईंचा प्रश्न होता की, नाचणीचं सत्व कसं काढायचं ? आणि मराठी आईंना नाचणीचं सत्व हे बाळगुटी इतकेच महत्वाचे वाटते. बाजारात रेडिमेड सत्व मिळते पण बऱ्याच मॉम्सना बाजारातले सत्व आवडत नाही. बाजारातले नाचणीचे सत्व हे साखर विरहित आणि साखरयुक्त असते. त्यात तुम्ही निवड करू शकता किंवा घरीच तयार करण्याचा निर्णय घेऊ शकता. त्यांना घरीच बनवायला आवडते. त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीने बनवू शकता.

नाचणीचं सत्व ह्याप्रकारे काढू शकता

बाजारातून आणलेली नाचणी आधी व्यवस्थित चाळून, निवडून स्वच्छ धुवून घ्या तिला रात्रभर म्हणजेच साधारण ७-८ तास साध्या पाण्यात भिजत टाकावी. सकाळी थोडी फुगल्यावर पाणी निथळावे आणि मऊ कापडात बांधून ठेवावी. अगदी घट्ट बांधू नका. आणखी तुम्ही वेताच्या टोपलीत कापड पसरून त्यावर भिजलेली नाचणी घाला आणि हाताने मोकळी करा म्हणजे दाणे दाणे एकमेकांना चिकटणार नाहीत. त्या टोपलीवर एखादे पसरट झाकण ठेवा. उबदार वातावरण असल्यावर मोड येतात. सध्या तर पावसाळा आहे. किंवा तुम्ही गॅस सिलेंडरच्या वरती किंवा डाईनिंग टेबलखाली किंवा बंद मायक्रोवेव्ह मधे हे टोपलं ठेवावं. तिथे गार हवा लागत नाही आणि ऊब मिळेल. तुम्हाला १० ते १२ तासांनी छोटे छोटे मोड आलेले दिसतील. आणखी अजून २-३ तास ठेवल्यावर मोड नेहमीसारखे होतील. पुरेसे मोठे मोड आले की वापरण्यास घ्यावी. मोड आलेली नाचणी सावलीत एका कापडावर किंवा मोठ्या ताटात पसरवून ठेवावी. ही नाचणी सावलीत वाळवायची आहे. ७-८ तासात पूर्ण कोरडी होईल. हाताने अलगद पसरावी म्हणजे मोकळी होईल. जाड तळाच्या भांड्यात मंद गॅसवर भाजावी. काहीजण तुपात परततात;पण खास आवश्यकता नाही. भाजताना सारखं ढवळावं लागतं. नाहीतर नाचणीचा गोळा गुठळ्या होतो. भाजका वास आला की थांबावे. नाचणी पटकन दळली जात नाही. बराच वेळ मिक्सर चालवावा लागतो. किंवा बाहेरून दळून आणावी. मोड आलेल्या नाचणीचे पीठ म्हणजेच नाचणी सत्व.

ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता

* दुधातील नाचणी सत्वाचे साहित्य

* नाचणीचे सत्व १ चमचा (घ्यायचे असेल)

* दूध घ्या दीड कप

* साखर घ्या १ चमचा

* दुधामध्ये नाचणीचे सत्व कसे तयार करायचे

* पातेल्यात किंवा भांड्यात दूध घ्या त्यात चमचाभर सत्व टाका.

* जर त्या मिश्रणात गुठळ्या असतील तर मोडून घ्या. सत्व दुधात एकत्रित होऊन मिश्रण एकजीव होईल. त्यानंतर भांड्याला गॅसवर ठेऊन, बारीक मंद आचेवर सतत ढवळत रहा. साधारणतः ३-४ मिनिटांत जसजशी नाचणी शिजेल, तसे दीड कप दूध घट्ट होत येईल आणि एक कप राहील. ढवळणे थांबवल्यावर लगेच गुठळ्या तयार होतात. त्यामुळे सतत ढवळत रहा. दुधातील नाचणीचे सत्व लहान बाळांसाठी खूप सकस आणि पोषक असते. ज्यावेळी तुमच्या बाळाला सहा महिने होतील त्यानंतर स्तनपान झाल्यावर द्यावयास सुरु करू शकतात. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon