Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

तुमच्या बाळाच्या बाटलीमधून त्याला या पाच गोष्टी पाजणे टाळा!

तुम्ही अगदी पहिल्यापासूनच बाळाला बाटलीमधून दूध पाजत असाल, वा पहिल्या सहा महिन्यांनंतर चालू केले असेल; स्तनपानापासून बाटलीकडे संक्रमण हे अपरिहार्य आहे. तुम्ही त्या बाटलीमधून बाळाला कोणती पेये पाजता, हे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण त्याचा तुमच्या बाळाच्या आरोग्यावर लगेचच परिणाम होतो. येथे आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टींबद्दल माहिती देत आहोत, ज्या तुम्ही कधीही बाटलीमधून बाळाला पाजू नये.

१.  ग्राईप वॉटर

 

ग्राईप वॉटर हे सामान्यतः शिशुंमधील अपचन आणि पोटांविषयक समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. परंतु हे तुमच्या बाळावरही परिणामकारक ठरेलच, याचा कोणताही सबळ वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही. हे जरी त्यांना झोपवू आणि शांत करू शकते; पण ग्राईप वॉटरची शक्ती इथवरच सीमित आहे. म्हणून याची तुमच्या बाळाच्या बाटलीमध्ये भर घालण्याचे खरेतर काहीच कारण नाही.

२. दूध घट्ट करणारे पदार्थ

काही पालक दूध घट्ट करण्यासाठी मक्याचे पीठ किंवा तांदळाचे धान्य यांसारखे पदार्थ वापरतात. जनमाणसांमध्ये असा गैरसमज आढळतो की, असे पदार्थ बाळांमधील आम्लांच्या कमतरतेच्या समस्येवर गुणकारी असतात. पण खरेतर यांमुळे ही समस्या अधिकच बळावू शकते. याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे, यामुळे तुमच्या बाळाला बद्धकोष्ठता वा सततच्या खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

३. मनुक्याचा रस/फळांचा रस 

असे मानले जाते की, मनुक्याच्या रसामधील तंतुमय पदार्थांच्या उपलब्धतेमुळे ते बाळांमधील बद्धकोष्ठतेचे निवारण करू शकते. परंतु तंतुमय पदार्थांच्या अतिसेवनामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात- जसे की पोषकद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता घटणे. जर तुमच्या डॉक्टरांनी बाळाच्या आहारामध्ये खासकरून मनुक्याचा रस समाविष्ट करण्याचा सल्ला दिला नसेल; तर त्यापासून दूरच राहा.

४.  कॉर्न सिरप (मक्याचे सरबत)

कॉर्न किंवा कॅरो सिरप हे शिशुंमधील सामान्य आजारांवर गुणकारी असते; असा रूढ समज आहे. परंतु एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की, कॉर्न सिरपमुळे खरोखर बोटुलिझम- एका प्रकारची विषबाधा होऊ शकते. म्हणून पोटाच्या आजारावर घरगुती उपचार म्हणून कॉर्न सिरपचा वापर शक्यतो टाळा.

५. पाणी

हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो; कारण वरवर पाहता पाणी हे निर्धोक वाटते. पण नवजात अर्भकांसाठीच्या आहारामध्ये पाण्याची भर घालण्याचे काही कारण नाही. उष्ण आणि दमट दिवसांमध्ये सुद्धा आईचे दूध हे त्यांच्यासाठी पुरेसे असते. तसेच बाजारात मिळणाऱ्या दुधातही आवश्यक तितकेच पाणी मिसळा; आणि त्याला नंतर पाणी मिसळून पातळ करू नका.

जेव्हा तुम्ही गर्भारपणात तुमचे बाळ गर्भाशयात सुरक्षित राहावे यासाठी इतकी काळजी घेत असाल; मग ते जन्मल्यानंतर आणखी थोडे महीने का नको? रूढ प्रथा आणि गैरसमजांवर विश्वास ठेवू नका; तुमच्या बाळाच्या आहारात कोणत्याही गोष्टीची भर घालण्याआधी वा हटवण्यासाठी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon