Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

तुमच्या बाळांची शब्दसंपदा कशी वाढवाल

ज्याचे भाषेवर प्रभुत्व असते त्याला कोणतीही माहिती आणि ज्ञान मिळण्यात अडचण येत नाही आणि तुमच्या मुलामध्ये भाषेबद्दल आयुष्यभरासाठी प्रेम निर्माण होऊ शकते जर त्यांना शब्द आणि त्यांचे अर्थ व्यवस्थितपणे समजत असतील.कोणत्याही शब्दाचा अर्थ कळण्यासाठी-वेगवेगळे शब्दांशी परिचय ,त्यांना सतत ऐकणे आणि व्यवहारात त्यांचा वापर करणे आवश्यक असते. मुलांचा शब्दसंग्रह  चांगला असेल तर त्याचे अनेक फायदे होतात जसे कि-  प्रभावीपणे संवाद साधता येणे,वाचन आणि आकलन क्षमता सुधारणे तसेच शैक्षणिक आणि सामाजिक आघाडीवरही पुढे राहता येते.तुम्ही जे वाचत आहेत किंवा ऐकत आहात याचे आकलन होण्यासाठी तुम्हाला जेवढ्या जास्त शब्दांचे अर्थ माहित असतील तेवढे जास्त फायद्याचे ठरते.

खालील मार्गांचा अवलंब करा आणि तुमच्या मुलांची शब्दसंपदा वाढवा.
१. रोजच्या संभाषणात मोठ्या शब्दांचा वापर करा  

तुम्ही काय बोलत आहात किंवा तुम्हाला काय सांगायचे आहे हे तुमच्या मुलाला कळावे यासाठी काही नवीन आणि मोठ्या शब्दांचा वापर करा जेणेकरून,मुलांना नवीन शब्द शिकता येतील. अशा पद्धतीने,मुलांना नवीन शब्दांबद्दल उत्सुकता वाटेल आणि त्यांचा वापर कसा करावा हे हि समजेल. जेव्हा मुले या शब्दांचा अर्थ तुम्हाला विचारतील तेव्हा त्यांना शांतपणे समजावून सांगा आणि प्रोत्साहित करा. सोपे आणि साधे शब्द वापरण्या ऐवजी मुलांना मोठ्यांसारखे बोलायला शिकवा. तुमचे मूल बोलत राहील असा प्रयत्न करा.

२. गोष्टींमध्ये रमवा

एखाद्या रात्री तुमच्या मुलाला गोष्ट सांगायला तसेच भरपूर वाचन करायला प्रोत्साहित करा. जेव्हा सर्वांसमोर गोष्ट सांगायची असेल तेव्हा मुले प्रयत्नपूर्वक आपण काय बोलतो आहोत याकडे लक्ष देतील.कधी कधी मुलांना स्वतः गोष्ट रचून सांगू द्या,यातून त्याची कल्पनाशक्ती कशी आकार घेते हे तुम्हाला लक्षात येईल.या दरम्यान,तुम्ही त्यांना प्रश्न हि विचारू शकता ज्यामुळे त्यांना नवीन शब्द सुचतील!

३.  शब्दांचे खेळ!

स्क्रॅबल,हंगमन,पिक्श्नरी-या सर्व खेळांतून मुलांचे शब्दांचे आकलन वाढते हे सिद्ध झालेले आहे.जेव्हा तुमच्या मुलाला कंटाळा आलेला असेल तेव्हा इंटरनेट आणि प्ले स्टोअर वर उपलब्ध असणारे विविध प्रकारचे शब्दांचे खेळ त्याला खेळायला द्या.याने त्यांच्या मेंदूला चालना मिळेल आणि नवीन शब्द हि शिकता येतील.

४. घरकामात मदत

घरात लागणाऱ्या रोजच्या सामानावर त्या वस्तूच्या नावाची चिट्ठी चिकटवून ठेवा,याने त्यांना खूप नवीन शब्द कळतील.जी मुले नुकतीच निशब्द शिकू लागली आहेत त्यांना घरातील वस्तूंचे नाव ओळखायला सांगणे हा नवीन शब्द शिकण्याचा उत्तम मार्ग आहे. या वेळी मुलांकडून होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी त्यांच्याशी बोलत रहा.

५. चुकांमधून शिकणे

मुलांना स्वतः प्रयत्न करून शिकू देणे गरजेचे असते.शब्दांचा योग्य वापर कसा करावा हे सांगण्यासाठी तुम्ही नेहमी त्यांच्या सोबत असू शकत नाही यासाठी त्यांना चुका करू द्या आणि स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या. त्यांच्या चुका सुधारतांना संयमपूर्वक आणि हळुवारपणे त्याना शब्दांचे योग्य उच्चार आणि अर्थ/व्याख्या समजावून सांगा.अशा सकारात्मक अनुभवातून मुलांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि मुलांची शब्दसंपदा वाढत राहील.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon