Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

तुमच्या बाळाच्या वाढीतील असे ५ क्षण, जे तुमच्या नजरेतून सुटता कामा नयेत


बाळाच्या वाढीतील टप्पे खरोखर महत्त्वपूर्ण असतात. बाळाला हे विकासाचे टप्पे ओलांडताना पाहणे, ही पालकांसाठी एक पर्वणीच असते. त्याचे ते पहिले हास्य, चालण्यासाठी पहिले पाऊल उचललेला तो दिवस; किंवा तुम्हाला चमच्याने घास भरवण्याचा त्याचा प्रयत्न- असे जादुई क्षण दुर्मिळच असतात. अशा वाढीतील छोट्याछोट्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहतो, जे उत्साह आणि भरपूर आनंदाने ओतप्रोत असतात. तुमच्या बाळाच्या आयुष्यातील घडणारे हे मोठे बदल आपल्याला त्यांच्या वाढीची आणि विकासाची मनोहर झलक बहाल करतात. तुमच्या बाळाच्या वाढीचे भान ठेवण्यासाठी आम्ही इथे असे क्षण देत आहोत, जे तुमच्या नजरेतून सुटता कामा नयेत. 

१) पहिला हास्याचा उद्रेक

असे मोजकेच क्षण असतात, जे आयुष्यभरासाठी तुमच्या हृदयात कैद होऊन जातात. तुमच्या बाळाचे हास्य हा असाच एक क्षण आहे, जो तुमचे पूर्ण आयुष्य सार्थक करतो. तो तुम्हाला घट्ट बसणाऱ्या जीन्समध्ये जिगल डान्स करताना पाहत असेल वा मांजर उंदरामागे पळताना पाहत असेल- अशी कोणतीही मजेशीर घटना तुमच्या बाळात हास्याची लाट आणू शकते. तुमच्या बाळात हास्याचा उद्रेक होतो आणि ते जमिनीवर लोळायला लागते. हे हास्य खरोखर आकर्षक असते आणि नेहमी तुमच्या हृदयात घर करुन राहते.

२) गोड हसू

बाळे ही आनंदाची प्रतीके असतात आणि ते तुमच्या आयुष्यात भरभरुन सुख आणतात. ते छोटेसे जादूगारच असतात आणि चेहऱ्यावरचे त्यांचे पहिले हसू खरोखर अमूल्य असते. हे लहान बदमाश तुमच्या उदास जीवनात चैतन्य आणू शकतात आणि तुमचे काम दुप्पट गतीने पूर्ण करण्यास ऊर्जा प्रदान करु शकतात. हसू हे त्यांचे पहिले सामाजिक कौशल्य असून, ते अतिशय संसर्गजन्य असते आणि सगळीकडे आनंदाची लहर पसरवते .

३) पहिले आलिंगन

जेव्हा तुमचे लहान बाळ तुम्हाला मिठी मारते, तेव्हा तुम्हाला तुमचे हृदय आनंदाने भरुन आल्यासारखे वाटते. तुम्ही तुमच्या भावनांवर काबू ठेवू शकत नाही आणि तुम्हाला त्या नेहमी हृदयात जपून ठेवाव्याशा वाटतात. जेव्हा तुमचे बाळ तुमची प्रेमाने गळाभेट घेते, तेव्हा तुमच्या आयुष्यातून सर्व दुःख आणि नैराश्य ओसरुन जाते. जेव्हा तुम्ही त्याचे आवडते गाणे म्हणत असता, त्याचे आवडते खाणे बनवत असता किंवा हसवत असता; तेव्हा मिळणारे एक सुखी आलिंगन हे तुमची मोठी दुःखे वा वेदना पुसून टाकू शकते.

४) दृश्ये आणि आवाज ओळखता येणे

बाळे भरपूर वेळा अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजाने घाबरुन जातात. मग तो अलार्म क्लॉक चा आवाज असो अथवा मोबाईलचा- बाळे असा अचानक आवाज ऐकून रडू लागतात. ते त्या आवाजाला प्रतिसाद द्यायलाही सुरु करतात आणि जिथून आवाज आला तिथे जिज्ञासेने पाहायला लागतात. तसेच त्यांचे आवडते खेळणे त्यांच्यासमोर नसले तर ते शोधायलाही चालू करतात. ते सर्व नावडते आणि आवडते आवाज ऐकून घ्यायला शिकू लागतात आणि त्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टींकडे टक लावून पाहू लागतात.

५) चुंबने देऊ लागतात

जेव्हा तुमचे बाळ त्याच्या अडखळत्या पायांवर स्वतःला नियंत्रित करते आणि त्याचे गुबगुबीत हात तोंडाजवळ नेऊन 'मुआह' चा आवाज करते; तेव्हा ते तुमच्यासाठी जगातील सातव्या आश्चर्यासारखेच अद्भुत असते. जेव्हा तुमचे बाळ आपल्या लहान हातांनी तुमच्याकडे चुंबनाचा इशारा करुन आपले प्रेम व्यक्त करते, त्यापेक्षा गोड गोष्ट कोणतीही असू शकत नाही. पहिल्या वेळी ते पूर्णपणे यशस्वी होईलच असे नाही; पण त्याचे प्रयत्नच तुमच्या ओठांवर हसू आणते. परिपूर्ण नसलेल्या त्या चुंबनासाठी तुमचे ते हास्य म्हणजे अमूल्यच!

असे छोटे क्षणच तुमच्या आयुष्यात आनंदाचे भांडार घेऊन येतात. प्रत्येक वेळी तुमचे बाळ असे क्षण घेऊन येते; तेव्हा तुम्हाला कळून येते की तुमचे तान्हुले योग्य मार्गावर आहे. वरीलपैकी सर्वाधिक आवडता क्षण तुमच्यासाठी निवडणे अवघड असू शकते; पण हे सर्व क्षणच तुम्हाला परमानंदाची परिपूर्ण झलक देतात.


Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon