Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

तुमच्या बाळाचे वजन जास्तच कमी होत चाललेय का?


प्रत्येक पालकासाठी बाळाचे स्वास्थ्य आणि निरोगी असणे ही सर्वाधिक प्राधान्याची गोष्ट असते. बाळाचा अगदी छोटासा आजारही त्याच्या आईची अनेक रात्रींची झोप उडवू शकतो. बाळांचे वजन कमी होणे ही काही विशेष घटना नाही. तथापि, अचानक आणि भरपूर वजन कमी झाले असेल, तर योग्य वैद्यकीय उपचार घेणे अगत्याचे ठरते. बाळांमधील वजन कमी होण्यामागील घटक पुढीलप्रमाणे आहेत:

१. संसर्ग/ इन्फेक्शन 

 कितीही काळजी आणि खबरदारी घेतली, तरी सूक्ष्मजीव आणि परजीवी जंतूंमुळे होणारे रोग (विशेषतः वेगवेगळे पोटाचे आणि आतड्यांचे रोग) हे अटळ असतात; आणि अनेकदा बाळांवर आणि अर्भकांवर परिणाम करतात. हे संसर्ग तीव्र स्वरूपाचे असतात आणि आजारी व्यक्तीमध्ये शारिरीक अस्वस्थता निर्माण करतात. आतड्यांचा संसर्गसुद्धा आहारातील पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात आणि बाळाच्या वजनाचा ऱ्हास करतात.

२. वाढत्या शारीरिक हालचाली

जेव्हा बाळ रांगायला किंवा चालायला सुरुवात करते, तेव्हा त्यांना एकाच जागेवर स्वस्थ बसवणे अशक्यच होऊन जाते. तुम्हाला ते सर्वत्र एका कोपऱ्यातून दुसरीकडे पळताना, काहीतरी खेळताना आणि मजेत हुंदडताना आढळतील! अशा सक्रिय बाळांची चयापचय क्रिया जलद असते आणि त्यामुळे सुद्धा वजनात घट होते, असे मानले जाते. अशा स्वरूपात वजनात घट (मध्यम प्रमाणातील) ही सामान्य आणि स्वास्थ्यपूर्ण असते.

३. दुधातील आवश्यक घटक न मिळाल्याने 

आईच्या दुधावर अवलंबून असलेल्या बाळांमध्येही वजनाची घट आढळून येते. स्तनपानाच्या शेवटी येणाऱ्या (हिंडमिल्क) दुधामध्ये फॅट्स आणि कॅलरीज चे प्रमाण भरपूर असते. तथापि, अशा दुधाला बाहेर यायला सुरवातीला येणाऱ्या (फोरमिल्क) दुधापेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणून, असे शेवटी येणारे दूध आवश्यक प्रमाणात न मिळाल्याने वजन कमी होऊ शकते.

४. पोषक आहाराची कमतरता 

आईचे दूध हे पोषकद्रव्यांचे ऊर्जाकेंद्र मानले जाते आणि बाळासाठी अत्यंत लाभदायक असते. दुग्धपानानंतर काही बाळांमध्ये पोषकद्रव्ये आणि संतुलित आहार यांच्या कमतरतेमुळे वजनात घट होऊ शकते. म्हणून दुग्धपानाच्या टप्प्यानंतर बाळाच्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त नाही ना, याची काळजी घ्यावी (तंतुमय पदार्थ हे वजनातील जलद घटीचे कारण असतात).

५. शरीरातील पाण्याची कमतरता 

नवजात शिशूंमध्ये, वजनातील प्रमाणापेक्षा जास्त घट ही बाळाच्या शरीरातील पाण्याची कमतरतेमुळे देखील होऊ शकतो. यावर वेळेत  उपचार न केल्यास पाण्याच्या कमतरतेमुळे  अर्भकांना धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक आहे.

६.अनुवंशिकता 

काही वेळा, तुम्ही बाळांना कितीही आरोग्यदायी आणि संतुलित आहार दिला; तरी त्यांच्यातील जनुकांमुळे त्यांचे वजन घटू शकते. संशोधना नुसार, शरीराचे कमी वजन हे अनुवांशिक गुणधर्मांमुळे असू शकते, जे पाठोपाठच्या पिढ्यांमधून हस्तांतरीत होतात (बाळाला त्याच्या दोघा पालकांमधील कोणाकडूनही हे गुणधर्म येऊ शकतात).

७. दोन आहारमधील अंतर 

जर तुमचे बाळ खूप सक्रिय हालचाली करणारं  असेल, तर तुम्हाला त्याला काही नियमित काळानंतर खाऊ घातले पाहिजे. दोन क्रमागत जेवणांमधील  जास्त अंतर बाळाच्या वजनातील घटीमागील एक कारण असू शकते.

बाळाच्या वजनातील घटीकडे वैद्यकीय लक्ष कधी पुरवावे?

जर वजनातील घटीमुळे खालील लक्षणे आढळून आली, तर त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या:

१.बाळ अशक्त आणि थकलेले वाटते. तसेच कधीकधी चंचलपना वाढतो.

२. भूक लागणे अचानकपणे कमी होते.

३. पोटात दुखणे, तसेच नेहमीपेक्षा जास्त वेळ अंगात ताप राहणे.

४. लघवीच्या वारंवारितेमध्ये मोठया प्रमाणात ऱ्हास होणे, तसेच लघवी घट्ट आणि तीव्र होते.

५. विष्ठेमध्ये रक्त किंवा श्लेष्माची उपस्थिती असते आणि तसेच खराब दुर्गंधी जाणवते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon