Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

जाणून घ्या तुमच्या बाळाला प्रथिनांची किती आवश्यकता आहे?

प्रथिने ही वाढीसाठी, स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी आधारस्तंभ असतात. शिशुंसाठी प्रथिने ही अत्यावश्यक असतात; कारण त्यांची वाढ वेगात होत असते आणि मोठ्या मुलांपेक्षा त्यांची प्रति किग्रॅ वजना मागील प्रथिनांची गरज जास्त असते. अमिनो ऍसिड्स हे एन्झाइम्सच्या विकासाचा भाग असतात आणि ते आरोग्य आणि वाढ नियंत्रित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

सुदृढ हाडे, केस आणि त्वचा हेदेखील उच्च प्रतीचे पचण्याजोगे प्रथिन शोषले गेल्यामुळे संतुलित राहतात.

शिशुसाठी प्रथिनांची किती आवश्यकता असते?

एका अभ्यासानुसार बाळाला 0-6 महिने वयापर्यंत साधारणपणे 9.1 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. ही गरज स्तनपानाने देखील पुरी होऊ शकते. आईने बाळाला योग्य ती पोषकद्रव्ये मिळावीत: म्हणून चौरस आहार घेण्याबाबत सतर्क राहिले पाहिजे.

सहा ते बारा महिने वयाच्या शिशूंना योग्य वाढीसाठी 11 ग्रॅम प्रथिनांची गरज पडते. आहारातील पदार्थ पचण्यास सोपे असण्यासाठी योग्यप्रकारे कापलेले आणि शिजवलेले आहेत ना, याची काळजी घेतली पाहिजे.

सहा महिने वयाच्या बाळासाठीची प्रथिने

बाळाला खाण्याजोगे असणारे भरपूर शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ उपलब्ध असतात. या वयात आवश्यक असणारी पोषकद्रव्ये ही पातळ सूप (जसे की पालकचे किंवा डाळीचे) यांतून मिळवता येतात. आहारात थोडेसेच मीठ असावे आणि प्रक्रिया केलेली साखर किंवा मीठ टाळा. घरगुती लोणी आणि दही हेदेखील योग्य पर्याय आहेत. यामध्ये प्रोबायोटिक्स असते आणि ते बाळाला निरोगी ठेवते.

आठ महिन्याच्या बाळासाठी प्रथिने

आठ महिन्यांची बाळे चवी ओळखू शकतात आणि त्यांच्यासाठी पदार्थ निवडू शकतात. त्यांचा आहार हा अधिक जटिल आणि स्थायू असू शकतो. तुम्ही त्यांना बिनधोकपणे खिचडी, सुजी हलवा किंवा उपमा, बेसन हलवा, लापशी, कापलेले केळे आणि बाकी पदार्थ देऊ शकता. यासाठीदेखील बाळाला दुधापासून निम-स्थायू पदार्थांची सवय लावण्यासाठी कापलेल्या आणि शिजवलेल्या पदार्थांना पसंती द्या.

दहा महिन्याच्या बाळासाठी प्रथिने

दहा महिने वयाच्या शिशूंना दररोज जवळपास 11-13 ग्रॅम उच्च प्रतीच्या प्रथिनांची गरज असते. जलद विकासास चालना देणाऱ्या जटिल प्रथिनांचा वापर सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. उकडलेले गोड मक्‍याचे दाणे, रवा इडली आणि उकडलेले अंड्याचे बलक यांद्वारे तुम्ही चव आणि पोषकद्रव्ये वाढवू शकता. वेगवेगळ्या चवी आणि प्रकार आजमावण्याकरिता बाळाला विविध प्रकार खाण्यास उत्तेजन द्या.

बारा ते पंधरा महिन्यांच्या बाळाकरता प्रथिने

या वयात बाळ चालायला आणि पळायला शिकते आणि त्याच्या ऊर्जेची गरज प्रचंड प्रमाणात वाढते. वेगवेगळे पदार्थ आणि विविध चवी असलेले पदार्थ (जसे की उकडलेली फुलकोबी, ओटमील, मटार, पीनट बटर आणि वाफवलेली कडधान्ये) खाणे सुरू करण्यास ही योग्य वेळ आहे. जर तुमचे बाळ खाण्यामध्ये जास्त चोखंदळ असेल; तर प्रथिनांनी युक्त असलेले बेबी फूड हे पॅकेट्समध्ये देखिल उपलब्ध असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon