Link copied!
Sign in / Sign up
30
Shares

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार तुमचे वैवाहिक जीवन आहे का ?

           आकाशात असणारी ताऱ्यांची रचना किती अप्रतिम असते ना ? आणि त्यांची आणखी आश्चर्यकारक एक अशी गोष्ट आहे की या ताऱ्यांचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनवर प्रभाव पडत असतो तसाच यांचा आपल्या वैवाहिक आणि कौटूंबिक जीवनावर देखील प्रभाव पडत असतो. जरी तुमचा या राशी-भविष्यावर विश्वास नसेल तरी या गोष्टी वाचायला मजेदार असतात. या राशींच्या आधारे तुमचा आणि तुमच्या पतीचा स्वभाव कसा असेल, या राशीच्या मुलीला आपल्या पतीमध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित असतात हे आपण पाहणार आहोत.

१. मेष (२१ मार्च - २० एप्रिल)

आपण एक यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी पुरुषाला आपला जोडीदार म्हणून प्राधान्य द्याल. आपण नेहमी आपल्या पतीच्या पाठीशी उभे राहतात. तसेच स्वत: च्या स्वप्नांसाठी देखील जे काही करता येईल ते प्रयन्त करता.तसेच आपल्या स्वप्नांच्या मागे पळत असताना कौटूंबिक जबाबदाऱ्यांकडे कडे देखील दुर्लक्ष करत नाही

२. वृषभ (२१ एप्रिल ते २० मे )

जर आपण आई असल्यास, मुलांची खूप काळजी घ्याल त्यांच्यावर अतिशय प्रेम कराल. तसेच तुम्ही खूप प्रामाणिक आणि आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असता. तुम्ही तुमच्या पतीकडून काही प्रकारचे आर्थिक पाठिंबा देण्याची अपेक्षा बाळगता, परंतु ते जर आपल्याला मिळालं नाही तर आपण स्वत: च्या पायावर उभे राहता करियर वूमन आणि गृहिणी या दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पडता

3. मिथुन (२१ मे - 20 जून)

या राशीच्य पत्नीसाठी तुमचे पती हे तुमच्यासाठी अगदी उत्तम जोडीदार असतात.तुमच्या दोघांमध्ये एक छान नाते असते आणि तुम्ही एकमेकांचे विचारांचा आदर करणारे असता. आणि जर दोघांची रास मिथुन असेल तर मग सोन्याहून पिवळं. दोघांमधले नाते हे अतिशय सुंदर असते. आणि या व्यक्ती प्रत्येक कामात एकमेकांची साथ देतात.

४. कर्क रास (जून २१-जुलै २२ )

आपण परंपरागत मूल्य जपणाऱ्या असता. आणि तुमच्यातील आईची वृत्ती ही आश्चर्यकारक असते, आणि तुम्ही खूप विश्वासू देखील असतात . जेव्हा आपण आपल्यास असुरक्षित वाटतं त्यावेळी तुम्हांला तुमच्या पतीने आधार द्यावा असे वाटते.

५. सिंह (२३ जुलै ते २२ ऑगस्ट)

आपण सुव्यवस्थित, वेळापत्रकानुसार चालणारे आणि महत्वाकांक्षी असता . आपण यशस्वी होण्यास प्रत्येक संघर्षास सामोरे जाता. तुम्ही कौटूंबिक जीवनात बरेच निर्णय तुम्ही घेत असता आणि आपले पती या सगळ्या गुणांची प्रशंसा करतात आणि आपल्याकडून प्रेरणा घेतात

६. कन्या (२३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर)

आपण हुशार आहात आणि त्याचप्रकारे अत्यंत प्रेमळ आणि काळजी घेणारी पत्नी असता. आपल्याला कधीकधी आपल्या नातेसंबंधांवर नियंत्रण ठेवण्यास त्रास होतो परंतु आपण तश्याच विश्वासू आणि व्यावहारिक देखील आहात आणि अधिक चांगल्याबद्दल विचार करता . आपल्या भावनांच्या आधारे घालून आपल्या पतीच्या भावनांचे सतत विश्लेषण करण्याचा प्रयत्न असता.

७. तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

या राशीच्या स्त्रियां आकर्षक आणि विषयासक्त असतात या गोष्टीच्या आणि आपल्या फायद्यासाठी ते वापरण्यास घाबरत नाहीत (आपल्याला काय म्हणायचे आहे हे आपल्याला माहित असल्यास). आपण आपल्या विवाह समतोल आणि एकोपा आपण आणि आराम अनुभवत असाल तरी, आपल्या पतीबरोबरचा आपला संबंध भौतिक वस्तूंवर आधारित नसतात तर केवळ उत्कटतेने आणि प्रेमवर आधारलेले असतात. आपण सतत आपले नाते विनोदी खेळकर ठेवण्याचा प्रयत्न करता

८. वृश्चिक ऑक्टोबर 23 - नोव्हेंबर 21)

तुम्ही तुमच्या नात्याला गंभीरपणे घेता आणि आणि आपल्या पतीने देखील असेच करावे असे वाटत असते. तसेच आपले पती तुमच्यासाठी कुटुंबाच्या आनंदासाठी जे काही करतात याच तुम्हांला कौतुक असते आणित त्याबद्दल तुम्ही त्यांचा आदर करतात. तुमच्यात कायम ऊर्जा असता

९. धनु (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्ही चांगल्या स्वभावाच्या आहात. आणि खुल्या दिलाच्या आहेत आणि आपल्या पतीच्या एक उत्तम मैत्रीण असता घडपणे आणि आपल्या पतीसाठी एक उत्तम मित्र आहे. जेव्हा आपला पती विनोद करतो त्यावेळी तुम्ही त्याची साथ देता. आपल्या लग्नाला कायम चांगल्या प्रकारे टिकेल याची कालजी घेता तुम्हांला स्वतंत्र आवडतं आणि ते अपेक्षित असत

१०. मकर (डिसेंबर २२- जानेवारी १९)

तुम्हांला तुमच्या पतीने तुमच्या स्वातंत्र्यच आदर कराव असं वाटत असतं. आपण स्वातंत्र्य आणि निष्ठावान आहात तरीही जर आपल्या पतीने आपल्याला जर दुखावले तर आपण शांत राहता शकता. आपण वर-वर कठीण दिसत असाल तरी, आपण प्रत्यक्षात खूप संवेदनशील आहात. म्हणून तुमचे पती तुम्हांला दुखावत नाहीत.

११. कुंभ (२० जानेवारी-फेब्रुवारी१८ )

तुम्ही नेहमी नवीन अनुभवासाठी आणि नवीन गोष्टीसाठी नेहमी तयार असता आणि तुम्हांला तुमच्या पतीसाठी आणि समाजासाठी अनपेक्षित असणाऱ्या गोष्टी करायला आवडते. तुम्हांला साहसाने तुमच्या आयुष्यात बदल करायला आवडतात. कधी-कधी खूप अनपेक्षित होता

१२. मीन (फेब्रुवारी १९ - मार्च २० )

तुमचा लग्न व्यवस्थेवर खूप विश्वास असतो. तुम्ही तुमच्या लग्नाला सांभाळण्याचा खूप प्रयन्त करता. तुम्हांला तुमची स्पेस आवडते आणि तुम्ही तुमच्या पतीला देखील त्यांची स्पेस देता. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon