Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

सकाळची अशी सुरुवात केल्यावर दिवस भन्नाट जाईल


      दिवसाची सुरवात चांगली करणे हे अत्यंत महत्वाचे असते. दिवसातील महत्वाचा भाग असलेली सकाळ​,​मूड चांगला ठेवल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसाची सुरवातच जर तुमची खूप उशीरा झाली तर दिवसभर चीडचीड होते, जर दिवसाची सुरवात चांगली झाली तर नियोजीत दिवस, तणाव रहित आणि उत्साहात जातो. आज आपण काही टिप्स घेऊ ज्यामुळे तुमचा रोजचा दिवस खूप छान आणि उत्साहवर्धक जाईल.

१) झोपेतून उठणे 

 बऱ्याच लोकांना चांगल्या रात्रीच्या झोपे नंतर सकाळी येणारा उत्साह किती महत्वाचा असतो याची जाणीव नसते. जेव्हा आपण उशीराने झोपतो आणि दिवाणावर पडल्या पडल्या स्मार्टफोनचा वापर करतो जसे की, मेसेज करणे आणि सोशल मीडियावर सर्फिंग करणे, असे केल्यास शरीराचे संतुलन बिघडते. परिणामी झोपेचे तंत्र बिघडते. याचा परिणाम सकाळी उठल्या उठल्या येणाऱ्या थकव्यामध्ये होतो. झोप आल्यावर लगेच झोपावे जबरदस्ती जागे राहण्याचा अट्टाहास करू नये त्यामुळे सकाळी उत्साह वाटत नाही.

२) आरोग्यदायी नाश्ता घ्यावा 

 आपल्या सर्वानाच माहीत आहे की, दिवसभरात नाश्ता काय घेता याला खूप महत्व असते. आपले ​पोट रात्री झोपल्यानंतर जवळपास आठ ते नऊ तास रिकामे असते. दिवसाच्या सुरवातीला शरीराला एखादे आरोग्यदायी खाद्य पदार्थ किंवा पेय योग्य प्रमाणात मिळाल्यास शाररिक क्रिया सुरळीत राहतात. नाश्त्यानंतर केवळ शाररिक क्रिया नव्हे तर मेंदूचे कार्य देखील त्यामुळे उत्तम सुरू होते. त्यामुळे नाश्ता घेयला कधी ही विसरू नका. दिवसाभरात तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांना पार करण्यासाठी नाश्ता आरोग्यदायीच असला पाहिजे.

३) व्यायाम 

 तुम्ही खूप फिटनेस प्रेमी नसाल पण सकाळी व्यायाम करून घाम गाळून नंतर त्यावर प्रथिनेयुक्त आहार (प्रोटीन्स) घेण्याइतके उत्सुक नसाल ​तरी ​सुद्धा आपल्या शरीराला दिवसभर सक्रिय ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे.रोज व्यायाम करण्यासाठी दहा मिनिटे ट्रेडमिलवर धावणे, वीस पुश अप्स मारणे, यासारख्या काही चार-पाच व्यायाम प्रकार केल्यास पुरेसे असते.

४)  नित्यक्रम करा 

रोज सकाळी उठल्यावर आपण जी कामे करतो त्याच्या योजना बनवा, ​अगदी छोट्या गोष्टीपासून सुरवात करा, जसे की, दात घासणे,आंघोळ करणे, आवरणे, नाष्टा करणे इत्यादी, गोष्टी​ नित्यक्रमाने करा जेणे करून या गोष्टी आपोआप घडतील आणि याचा ​विचार करण्या ऐवजी तुमचा मेंदू दुसरा विचार करेल. या गोष्टींमुळे निश्चितच तुमचा वेळ वाचेल. मेंदूची शक्ती ज्या छोट्या छोट्या गोष्टीत वाया जाते ती यामुळे जाणार नाही. जेव्हा हे पूर्ण होते तेव्हा आपण एका विशिष्ट कार्यावर लक्ष केंद्रित करू शकता जे खूप जास्त महत्वाचे असते.

५)  दिवसाचे नियोजन करा 

सकाळी उठल्यानानंतर दिवसभर काय काय कामे करायची याचे नियोजन करा. सकाळी मेंदू चांगला ताजातवाना असतो हा सर्वात चांगला वेळ असतो जेव्हा सर्व क्रिया चांगल्या होतात परिणामी तुम्ही उत्तम कामगिरी बजावू शकता. तुमच्या कामांचा प्राधान्य क्रम ठरवा. यासाठी एक यादी करा आणि प्राधान्यक्रम निश्चित करा.

६)  महत्वाचा संवाद साधा 

 जेव्हा तुम्हाला एखाद्या महत्वाच्या विषयावर काही व्यक्तींशी विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा करायची असते तेंव्हा ते मुद्दे टिपून ठेवा. बैठकीत कसे मांडायचे याचे नियोजन करा. असे महत्वाचे संवाद जर तुम्ही ताज्या मानाने नाही केलेत तर तुमच्या हातातून हे काम निसटू शकते. व्यवसायाशी संबंधित किंवा वैयक्तिक संभाषणे करायची असल्यास सकाळी पूर्ण करावीत म्हणजे दिवस तणाव रहित जगता येतो. हे विसरू नका की,आपला मेंदू सकाळी ताजा आहे आणि हेच आपल्या एक प्रभावी संवाद साधण्यास मदत करते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon