Link copied!
Sign in / Sign up
44
Shares

तुमचे नाते कंटाळवाणे बनले आहे ? हे वाचा

           तुमच्या नवऱ्यासोबतचे तुमचे नाते कंटाळवाणे बनत चालले आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कधीकधी जेव्हा तुम्ही तुम्हा दोघांबद्दल विचार करता, तेव्हा तुम्हाला उदास आणि कंटाळवाणी भावना आलीच असेल!

जर तुम्ही असा विचार करत असाल तर हो, हे नक्कीच भीतीदायक आहे. तुम्हाला एक उदासवाणे दांपत्य बनायचे नाहीच, ज्यात एकमेकांविषयी काहीच ओढ नाही. सामान्यतः जेव्हा मधुचंद्राचा काळ ओसरतो, तेव्हा असे घडायला चालू होते.

आतापर्यंतचा तुमच्या दोघांमधला उत्साह आणि उत्स्फूर्तता जेव्हा गायब व्हायला चालू होते, तेव्हा तुम्ही स्वतःबद्दलच साशंक होत जाता- जसे की तुमचा शारीरिक बांधा, तुम्ही बनवलेले जेवण, इ. याचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि तुम्ही इतका अतिविचार करता की, तुमच्या पतीला आता तुम्ही आवडत नाही आणि तो बहुतेक तुम्हाला धोका देत आहे; असा तुम्ही निष्कर्ष काढता. पण घाबरु नका, कारण अशा प्रकारच्या प्रकारच्या अवस्थेतून जाणाऱ्या तुम्ही एकट्याच नाही आहात.

 

१. तुमच्यामधील रोमांच ओसरला आहे ?

पूर्वी जेव्हा सगळे नवे होते, तेव्हा तुम्ही किती रोमांचित असायचात! आता तर ते सर्व कंटाळवाणे बनलेय आणि तुम्हाला याची सवयच झालीय! त्याच्या अगोदरच्या चुंबनांनी तर तुम्हाला आभाळ ठेंगणे व्हायचे; पण आता त्यात काहीच चैतन्य उरलेले नाहीय.

ही समस्या तुम्ही आपल्या बेडरूम मध्ये सोडवली पाहिजे आणि विक्षिप्त कामुक खेळांद्वारे नात्यात नाविन्य आणले पाहिजे. एकमेकांवर काही गोष्टींचा प्रयोग करणे सर्वथा योग्य आहे. बदल कधीच कुणाचे नुकसान करत नाही. काय माहित, असे करणे तुमच्यातील नाते पुन्हा फुलवू शकते! तुम्हाला फक्त योग्य पावले उचलायची गरज आहे.

२. योग्य लक्ष न देणे

जेव्हा तुमच्यातील रोमांचक आणि सुखद भावना हळूहळू गायब व्हायला लागते, तेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार बेडरूममध्ये एकत्र येणेही टाळू लागता. हे तुमची एकमेकांमधली रुची कमी झाल्याचे स्पष्ट लक्षण आहे. जेव्हा समागमानेही तुमच्यातील समस्या सुटत नाहीत, तेव्हा नक्कीच काहीतरी बिनसलेय.

यावर उपाय म्हणजे, तुम्हाला बेडवर असताना एकमेकांशी भरपूर बोलले पाहिजे. मानसिकदृष्ट्या तुम्हा दोघांना एकमेकांतील बदलांविषयी बोलले पाहिजे; म्हणजे तुम्हाला एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. हे सर्व एकाच वेळी होणे शक्य नाही; पण हळूहळू तुमचे नाते बहरताना दिसून येईल.

३. उत्स्फूर्तता

जर तुम्ही आणि तुमच्या पतीने शेवटी कधी समागम केलाय, हे तुम्हाला आठवत नसेल; तर तुमच्या नात्यासाठी हे योग्य लक्षण नाही. संभोग ही काही नियोजन करुन करायची गोष्ट नाहीच! ही आतून येणारी आणि मनस्वी भावना आहे.

यावर उपाय म्हणजे, त्याला अचानक आश्चर्याचा धक्का द्या! विश्वास ठेवा, तो याला नकार देणार नाही. वास्तविकपणे आश्चर्याचा धक्का पुरुषांनादेखील आपल्याप्रमाणेच आवडतो. शेवटी तुम्ही नैसर्गिक खुबी लाभलेल्या एक अत्यंत आकर्षक युवती आहात!

४. जेव्हा बोलायला काहीच उरलेले नसते

जेव्हा तुम्हाला खरोखर घड्याळाची टिकटिक ऐकू येते, अशी पूर्ण शांतता असलेली रात्र तुम्ही आणि तुमच्या जोडीदारासाठी भावनिकदृष्ट्या वेदनादायक असू शकते. जेव्हा तुम्हाला बोलायची इच्छा नाही म्हणून नव्हे, तर तुमच्याकडे बोलायला काहीच उरलेले नसते; तेव्हा असे घडते.

 

हे सोडवायला एकच उपाय आहे: एकमेकांच्या जीवनात रुची दाखवा. तुम्हाला मनापासून गोष्टींबद्दल बोलले पाहिजे; म्हणजे तुमच्या जोडीदाराला देखील त्यात रुची येईल. काळजी करु नका, तुमचे प्रेम संपत चालले नाहीय, फक्त त्यातील तेज तुम्हाला परत आणायचे आहे.

५. भरकटलेले मन:

जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि तुम्ही ते टिकवायचा प्रयत्न करत असताना तुमच्या जोडीदाराचे जर दुसऱ्या तरुणीवरच जास्त लक्ष जात असेल; तर तो या रिलेशनशिपमध्ये कंटाळला असण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराने तुम्हाला धोका देऊ नये यासाठी तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. सामान्यतः दोन प्रेमींमध्ये कंटाळपणा अडसर निर्माण करतो; म्हणून काही झाले तरी असे घडणे टाळा.

आता तुम्हाला ५ सतर्कतेची चिन्हे कळलीच आहेत, तर त्यांचे भान ठेवा आणि तुम्हा दोघांचे आयुष्य पुन्हा एकदा प्रेमाने ओसंडून जाऊ द्या!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon