Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

तुमचे बाळ प्रतिभावान आहे हे कसे ओळखावे?


तुमच्या बाळामध्ये प्रतिभा आहे की नाही, हे फक्त तुमच्या बाळाचा आयक्यू (IQ) किंवा त्याला परीक्षेत मिळणारे गुण यांवरुन ठरत नाही. तुमचे बाळ शाळेला जाण्यापूर्वीच तुम्ही काही संकेतांचा आधार घेऊन त्याच्यातील अलौकिक बुद्धीमत्ता हेरु शकता. बाळाच्या प्रतिभेला लवकरात लवकर जाणून घेणे हे महत्त्वाचे असते; कारण त्यानुसार तुम्ही त्यांना त्यांच्या क्षमतांचा चांगल्या प्रकारे विकास करणाऱ्या योग्य संस्थांमध्ये दाखल करु शकता.

१) चांगली स्मरणशक्ती

सामान्यतः मुले विचित्र आणि विलक्षण गोष्टी लक्षात ठेवतात, ज्या प्रौढ व्यक्ती सहजपणे विसरु शकतात. परंतु प्रतिभावान मुलांना घटना आणि लोकांना लक्षात ठेवण्याची तीक्ष्ण स्मरणशक्ती लाभलेली असते. तुमचे मूल एखाद्या व्यक्तीला प्रथमच पाहत असेल; पण अनेक महिन्यांनंतरही त्या व्यक्तीबाबत प्रत्येक तपशील त्याच्या आठवणीत राहिला असेल. ते त्यांनी पाहिलेल्या एखाद्या टीव्ही कार्यक्रम किंवा चित्रपटातील एखादा संवादही म्हणून दाखवतील. बहुतांशी प्रतिभावान मुलांना फोटोग्राफीक मेमरी (तीव्र स्मरणशक्ती) लाभलेली असते.

२) अगोदरचे विकासाचे टप्पे

जर तुम्ही तुमच्या बाळाची त्याच्या वयाच्या इतर बालकांबरोबर तुलना केली, तर तुमच्या लक्षात येईल की त्याने त्याचा पहिला शब्द लवकर उच्चारला आहे किंवा त्याने इतरांपेक्षा १ किंवा २ महिने अगोदरच चालायला सुरुवात केलीय. हे तुमचे बाळ पुढे प्रतिभावान बनणार असल्याची प्रचलित लक्षणे आहेत.

३) लक्षणीय शब्दसंग्रह

तुमचे बाळ तुमच्या दररोजच्या संभाषणांतून शब्द उचलू शकते आणि त्यांचा वाक्यांमध्ये सहजपणे वापरही करु शकते. ३ ते ४ वर्षे वय असताना जेव्हा सगळी मुले अजूनही 'कॅट' किंवा ऍप्पल यांचा उच्चार करणे शिकत असतील, तेव्हा तुम्हाला तुमचे मूल विस्तृत शब्दसंग्रहाचा वापर करताना दिसून येईल. येथे हे लक्षात घ्या की, शब्दसंग्रह हा इंग्लिशशीच संबंधित असेल असे नाही; तर तो त्याच्या मातृभाषेतील किंवा तुम्ही तुमच्या घरात वापरणाऱ्या भाषेतीलही असू शकतो.

४) प्रश्न, प्रश्न आणि अजून प्रश्न !

प्रत्येक मूल हे त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल चौकस असते आणि त्याच्या पालकांना याबद्दल प्रश्न विचारते. परंतु एक प्रतिभावान बाळ हे एक पाऊल पुढे जाऊन असे प्रश्न विचारते, जे त्यांना लोक आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचे आकलन होण्यास मदत करतील; कारण त्यांच्यामध्ये शिकण्याची उपजत प्रवृत्ती असते. ते प्रश्न 'बाबा का रागावलेत?' यांसारखे साधे असू शकतात किंवा 'गीतकाराने जेव्हा हे गाणे लिहिले तेव्हा त्याच्या मनात कोणते विचार असतील?' असेही असू शकतात.

५) भन्नाट कल्पना शक्ती 

बहुतांशी प्रतिभावान मुलांना त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी एक माध्यम हवे असते. म्हणून ते संगीत, कला किंवा नाट्यामध्ये अचानक रस दाखवू शकतात. त्यांच्या कार्यरत कल्पनाशक्तीमुळे त्यांना चित्रे काढण्यास, गाण्याची चाल रचण्यास वा स्वतःला काल्पनिक परिस्थितींमध्ये ठेवण्यास काही अडचण येत नाही.

६) सतत काही ना काही चालले असते  

तुमच्या बाळाला त्याच्या मित्रांबरोबर खेळणे आवडतही असेल; पण त्याला एकटेच त्याच्या विचारांमध्ये गुंग होणेही आवडत असेल! प्रतिभावान मुलांना लवकर कंटाळा येत नाही; कारण त्यांच्या डोक्यामध्ये खूप काही चाललेले असते. ते चित्रकला किंवा कोडी सोडवणे यांसारख्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंगवून ठेवतील.

एकदा तुमच्या बाळाने शाळेत प्रवेश घेतला की ते ज्या गतीने नवीन गोष्टी शिकते, प्रत्येक गोष्टीवर त्याची प्रश्न विचारण्याची क्षमता आणि ते वर्गामध्ये किती ध्यान देते हे तुमच्या बाळाच्या हुशारीबद्दल खूप काही सांगून जाते.


Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon