Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

तुमचे बाळ खरोखर निरोगी आहे का?


     कधीकधी तुमच्या तान्हुल्याला अस्वस्थता जाणवतीय, का ते त्याचे नेहमीचेच वागणे आहे; हे कळायला मार्गच नसतो! बाळे प्रभावीपणे संवाद साधू शकत नाहीत आणि त्यांना काय म्हणायचे आहे, याचा आपण केवळ अंदाजच बांधू शकतो. बाळे चिडली असताना किंवा भूक लागल्यावर किंवा त्यांना काही गोष्ट हवी असेल (जसे की त्यांच्याभोवतीचा तुमचा सहवास), तेव्हा सुद्धा रडू लागतात. या अशा रडण्यातील फरक ओळखायला वेळ लागतो; पण तुम्हाला ते जमून जाईल.

तुम्हाला नवजात शिशूंबद्दल काहीही माहिती नसेल, तरी घाबरण्याचे काही कारण नाही; हळूहळू तुम्ही त्यांच्या जीवनशैलीशी परिचित होऊन जाल आणि तुमच्या पालकत्वाच्या कौशल्याबाबत तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमचे बाळ खरोखर निरोगी आहे की नाही; हे जाणून घेण्यासाठी आम्ही येथे काही टीप्स देत आहोत:

१) तुमचा आवाज ऐकला की, बाळ शांत होते.

आईचा आवाज बाळाचे लक्ष वेधून घेते, हा काही सामान्य संकेतांमधील एक संकेत आहे. हे निरोगी आरोग्याचे तसेच प्रतिसादात्मकतेचेही एक चांगले लक्षण आहे; कारण बाळ हे गर्भात असल्यापासूनच आईच्या आवाजाशी परिचित असते. नवजात बालके भरपूर रडतात. हे तुमच्या बाळाची शारीरिक अवस्था सूचित करत नसेलही; पण ते नक्कीच त्याच्या मानसिक अवस्था आणि लोकांबरोबरच्या वागण्यातील प्रगती दर्शवते.

२) तुमच्या बाळाला दर दिवशी ८-१० डायपर्सची गरज पडत आहे; आणि त्याच्या वजनात वाढ होत आहे:

हे सिद्ध करते की, तुमचे बाळ पुरेसे दूध पीत आहे, त्याची पचनसंस्था पूर्णपणे कार्यरत आहे आणि त्याची निरोगी वाढ होते आहे. हे जरी चांगले चिन्ह असले, तरी त्याला नियमितपणे बालरोगतज्ज्ञाकडे नेऊन सुयोग्य वाढीचा आणि आहाराचा तक्ता बनवून घेणे फायद्याचे ठरते. तथापि हा आकृतिबंध प्रत्येकासाठी वेगवेगळ असू शकतो. या तक्त्यामध्ये वाढीचा जलद काळ तसेच मंदीचा काळही निर्देशित केलेले असतात.

३) शांतपणा आणि लक्ष देणे:

जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यांमध्ये बाळे त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात आणि आपल्या डोळ्यांचे स्नायू नियंत्रित करण्यास थोडा वेळ घेतात. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये याच गोष्टी घडतील-दूध पिणे, झोपणे, रडणे आणि अजून झोपणे. पण कालांतराने तुमचे बाळ अवलोकन करण्यास आणि वस्तूंवर ध्यान देण्यास सुरुवात करेल. हे बाळाचे वस्तूंवर विशेष लक्ष देणे आणि मनात प्रक्रिया करणे हे एक चांगले लक्षण आहे.

४)आकृतिबंध, रंग, हालचाली, आवाज- त्यांना रोमांचित करते.

जर तुमचे बाळ आकृतिबंध आणि रंगांचे अवलोकन करत असेल, तर त्यांच्या डोळ्यांचे स्नायू विकसित होत आहेत आणि ते वेगवेगळे रंग ओळखण्यास शिकत आहेत; हे सूचित होते. जर तुमचे बाळ हालचालींवर ध्यान देत असेल, तर त्याची ज्ञानेंद्रिये आणि प्रतिक्षिप्त क्रिया विकसित होत आहेत, हे ओळखावे. तसेच, आवाज त्यांची श्रवणशक्ती सूचित करते. एकूणच, तुम्हाला त्यांच्या इंद्रियांच्या विकासाबाबत आढावा मिळून जातो.

 

५) झोपण्याचा नित्यक्रम विकसित होणे:

प्रारंभी बाळाचे सर्व नित्यक्रम अनियमित असतात; पण या वागण्यामध्ये हळूहळूबदल होत जातो आणि तो क्वचितच आपल्या लक्षात येतो. तुमचे बाळ एक विशिष्ट झोपण्याचा नित्यक्रम विकसित करेल, त्याचे रडणे कमी आणि झोप जास्त होत जाईल. हा त्यांच्या चेतासंस्थेच्या नवीन ज्ञान ग्रहण करण्याचा परिणाम असतो.

६) बाळ त्याचे स्वतःचे वजन सांभाळू लागेल:

जवळपास सर्व बाळे ३ महिन्यांची होईपर्यंत त्यांच्या डोक्याला आधार देणे वा सांभाळणे शिकून जातात. जर तुमच्या बाळाने तुमच्या कुशीत असताना त्याचे डोके सांभाळले असेल आणि आपली कूस बदलत असेल; तर तुम्हाला कळून जाईल की ते आपल्या वाढत्या स्नायूंना नियंत्रित करत आहे. त्यांची थोडी हालचाल व्हावी म्हणून तुम्ही त्याला त्याच्या पोटावर झोपवू शकता (लगेच जेवणानंतर नाही).

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon