Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

तुमचा जोडीदार देखील रात्री त्यावेळी या चुका करतो का ?

         पुरुषांच्या मनात बेडमध्ये बेस्ट असण्यासाठी त्यांचे स्वत:चे असे काही प्लान्स असतात. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करतांना त्यांना भान राहत नाही की कधी कधी यामुळे तुम्हाला त्रास होतोय किंवा तुमचा सेक्स असंवेदनशीलतेकडे वळतो आहे. तुम्हाला कधीतरी ‘फौ पा’ म्हणजे प्रणय सुरु असताना दोघांमध्ये एखादी लाजिरवाणी घटना घडल्याचा अनुभव असेल. त्यानंतर तुमच्या साथीदाराचा सगळा मूड मात्र निघून जातो. यात वेगळे काहीच नाही, अनेक जणांच्या बाबतीत असे होते. कोणीच परफेक्ट नसते !

पण या वेळी बोलून आणि एकमेकांना सांभाळून घेऊन प्रश्न सोडवण्याचा उपायच योग्य असतो. तुमच्यातला रोमांच जागा ठेवणे तुमच्याच हातात आहे. आम्ही इथे तुमच्या पतीच्या बेडमध्ये होणाऱ्या काही चुका दिल्या आहेत त्यावर तुमचे लक्ष असते.

१. त्याचे कठोर वागणे.

हो. ही गोष्ट खूप बोचते जेंव्हा त्याच्याकडून सेक्स करायचा म्हणून केला जात असतो. याचे रुपांतर त्याच्या कठोर वागण्यात होते. शेवटी काही भावना आणि प्रेम त्यात ओतलं तरच त्याचा खरा आनंद तुम्हाला मिळेल. बेडमध्ये प्रणयासोबत थोडा रोमान्स आणि प्रेमाचा गोडवा देखील तुम्हाला अपेक्षित असतो.

२. तूम्हाला असंतुष्ट ठेवणे .

काहीवेळा पुरुष केवळ त्यांच्या आनंदावर भर देतात. तुमच्या मनातील इच्छांकडे लक्ष न देता, त्यांचे मन भरले की कूस बदलून झोपून जातात. अशावेळी तुम्ही संतुष्ट झाल्या नसाल तर तुम्हाला राग येणे साहजिक आहे.

३. तुमच्या मनातील फॅन्टॅसी त्याच्याकडून पूर्ण केल्या जात नाही.

तुमच्या साथीदाराने तुमच्या मनातील आवडी-निवडी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर त्याच्याशी तुमच्या सेक्स बद्दल असणाऱ्या फॅन्टसीज जरुर शेअर करा. तुमच्या दोघांमधील दुरावे आणि सेक्स मधील अपेक्षा याद्वारे पूर्ण होऊ शकतील.

४. त्याचे चुंबन घेणे.

किसिंग ही एक खूप नाजूक आणि सुंदर कला आहे असे म्हणता येईल. जगातली प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने चुंबन घेते आणि याबाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. अनेक स्त्रिया पुरुषांच्या चुंबन घेण्याच्या पद्धतीला प्राधान्य देतात. जर चुंबन घेताना तो अडखळत असेल किंवा त्याच्याकडून धसमुसळेपणा होत असेल तर ही गोष्ट तुमचा मूड घालवू शकते.

५. अपेक्षांचा ताण.

ही गोष्ट खरी आहे की स्त्रियांना बेडमध्ये प्रयोग केलेले आवडते. पण जेंव्हा त्याच्या फॅन्टसीसाठी तुम्हाला सारखे सारखे त्या गोष्टीतून जावे लागते तेंव्हा मात्र तुमच्याकडून ही गोष्ट प्रेमापलीकडे एक काम म्हणून पहिली जाऊ शकते. तुम्ही अपेक्षांच्या या ताणामुळे एका टप्प्यानंतर तुमच्या जोडीदाराशी दुरावू लागता.

६. उत्तेजित न करू शकणे. 

कधी कधी तो तुम्हाला जवळ आणण्यासाठी काही टिप्स आणि शक्कल करतो पण काही कारणामुळे त्या तुम्हाला हास्यास्पद किंवा बिनकामी वाटू शकतात. जर त्याचा सेड्युस गेम फेल झाला तर तुम्हाला हसू येऊन सेक्सचा मूड जाऊ शकतो. शक्यतो त्याच्या प्रयत्नांना भाव द्या आणि हलके-फुलके घेऊन तुमचा आणि त्याचा उत्साह कायम ठेवा.

७. फोरप्ले आणि तो.

बऱ्याचदा पुरुष संभोग करण्यापुर्वी आपल्या प्रियेला या कामक्रियेत ओढण्याची तसदी घेत नाहीत. फोरप्लेमुळे मुख्यत: तुमचा मूड बनतो. पण त्याच्याकडून लवकरात लवकर संभोग करण्याचा प्रयत्न असतो तेंव्हा तुम्हाला नक्की काय हवे आहे हे त्याला कळलेले नसते. तुमच्यासाठी फोरप्ले महत्वाचा असतो हे त्याला माहित असायला हवे.

शेवटी काय तर सेक्स चा नंद दोघांनी घेणे गरजेचे आहे. अनेकदा जर तुमच्या जोडीदाराकडून होणाऱ्या चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर यांविषयी त्याच्याशी बोलणे महत्वाचे ठरते. बेडरूम मध्ये असतांना तुम्ही एकमेकांसोबत घालवलेले क्षण तुमच्या दोघांमधील अंतर कमी करतात. याचवेळी तुम्ही तुमच्या साथीदाराच्या सर्वात जवळ तुम्ही असता. तेंव्हा ही वेळ आणि हे क्षण एन्जोय करायला संकोच करू नका.या चुका करतो का ?

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon