Link copied!
Sign in / Sign up
41
Shares

तुमचा डावा हात बघून भविष्य बघा..काय आहे तुमच्या नशिबात ?

          तुमचे हात हे तुमच्या आत्म्याचा आरसा असतात. आणि त्यातही विशेषत: तुमचा डावा हात तुमच्या भविष्याविषयी खूप काही सांगतात. त्यातून तुमचे आरोग्य, पैसा, चारित्र्य आणि व्यक्तिमत्वाविषयी अधिक माहिती मिळते. तसेच भविष्यात तुम्हा ज्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे, तेही तुम्हाला कळतात. पण त्यासाठी तुम्हाला हात पाहून बारीक निरीक्षण करणं आवश्यक आहे.

भाग्य आणि भविष्यातील घडामोडी जाणू घेण्यासाठी तुमच्या डाव्या हाताचे विशेष महत्त्व असते. डाव्या हाताचं तुमच्या आत्म्याशी खूप जवळचं नातं असतं यावर आजही अनेक लोकांचा ठाम विश्वास आहे. तसेच डाव्या हातांवरून तुमचे वर्तमानातील आणि भविष्यातील महत्त्वाचे सिक्रेट्सही समजतात. त्याने तुमच्या नशीबालाही आकार मिळू शकतो.  

हस्तरेखाशास्त्राशी हे संबंधित आहे का ?

हस्तरेखाशास्त्र हा तळहात वाचण्यासाठीचा वैज्ञानिक अभ्यास आहे. तर मुलत: तुमचा डाव हात हा तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती (आंतरिक आणि बाह्यस्वरूपात) आहात याविषयी खूप काही सांगतो. त्यातही तुम्ही आंतरिक कसे आहात हे तुमच्या डाव्या हातावरून कळून येते. तसेच तुमच्या मनात खोलवर छुप्या अलेल्या इच्छा. तुमची स्वप्न, कल्पना यांचीही माहिती मिळू शकते. तुमच्या जवळच्या मित्रालाही माहिती नसतील अशा गोष्टीही त्यातून कळतात.

तुमच्या डाव्या हातावरून हेही कळते

जगात कुणाही दोन व्यक्तीच्या हातावरील रेषा आणि हाताचे ठसे हे सारखे असू शकत नाहीत. खरं तर तुमच्या उजव्या आणि डाव्या हातावरील रेषाही पूर्णपणे वेगळ्या असतात. तसेच तुमच्या दोन्ही हातांची बोटही लहान मोठी असतात. हातावरील रेषाही लहान-मोठ्या असतात. तुम्ही तुमच्या हाताकडे नीट लक्ष देवून पाहा. तुमच्या दोन्ही हातांचे रंगही वेगवेगळे असतात.

तुम्ही तुमचा डावा तळहात कसा वाचू शकता 

१. तुमची तर्जनी जर रिंग घालायच्या बोटापेक्षा मोठी असेल तर

तुम्ही जन्मत:च नेते आहात. तसेच भविष्यातही तुम्ही एक उत्तम नेता बनू शकता. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना तुमचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा आवडतो. ते तुमच्याकडे उत्तरेचा ध्रुवतारा असल्यासारखे पाहतात. जो त्यांना अडचणीच्या काळात दिशादर्शन करू शकेल. तुमचे कुटुंबीय तुमचा सल्ला विवेकी आणि मौल्यवान समजतात.               

२. कुठेही उभ्या रेषासह मध्य बोट

तुम्ही तुमच्या कुटुंबातील नातेसंबंध खूप उत्तमप्रकारे समजू शकता. तसेच ते चांगल्याप्रकारे टिकवू शकता. त्यामुळे तुम्ही सर्वांशी प्रामाणिकपणे वागू शकता. जे तुमच्या जवळचे आहेत, ते तुमचे कौतूक करतात, तुमच्यावर विश्वास ठेवतात तसेच कठीण परिस्थितीत तुम्हाला मदत करतात.  

३. तुमचे अंगठी घालायचे बोट तर्जनीपेक्षा मोठे असल्यास

 तुम्ही कल्पक व्यक्ती आहात. त्यामुळे तुमचे मित्र आणि कुटुंबीय तुमच्या नव्या कल्पना जाणून घेण्यास उत्सुक असतात. तुम्हा पारंपरिक गोष्टी करणं आवडतं नाही, तुम्हाला त्याचा कंटाळा येतो

४. लहान बोट जर सरळ आणि अंगठी घालायच्या बोटाच्या विरूद्ध दिशेने झुकलेले असल्यास

आपण एक अद्वितीय व्यक्ती आहात. तसेच बंडखोर आहात आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या पद्धतीने तुम्हाला करायला आवडते. तुमच्यातील हे गुणं तुम्हाला अधिक रोमांचक आणि उत्साही बनवतात

५. तुमच्या डाव्या हाताविषयी काही मनोरंजक माहिती

तुमचा डावा हात मऊ आणि गुळगुळीत असल्यास, तुमच्या जीवनात खूप संकटे आहेत. तुमचे जीवन हीच एक मोठी लढाई असून, त्यातूनच तुमची ओळख निर्माण होणार आहे.  तसेच ही संकटे हातळण्यास खू़प अवघड असली, तरीही शेवटी सर्व काही योग्य होईल

६. तुमच्या नशीबात अजून काय आहे

जर तुमच्या डाव्या हातावर खूप रेषा असतील, तर तुम्ही खूप सहज भीता. तुम्ही नेहमी चिंतीत असता आणि तुम्हाला लगेच राग येतो. जर तुमचे हात मऊ असतील, तर तुम्हा आळशी आहात. तुम्हाला तुमच्यासाठी प्रेरणा आणि चिकाटी शोधणे खूप कठीण वाटू शकते. तसेच असे व्यक्ती अनैतिक गोष्टींमध्ये सहभागी असण्याची जास्त शक्यता असते.    

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon